१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. त्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.
१. हा आश्रम एखाद्या ऋषींच्या आश्रमासारखा आहे ! : आश्रमाचे व्यवस्थापन, नियोजन, साधकांमधील भाव आणि आश्रमात असणारे चैतन्य या गोष्टी सत्ययुगातील गुरुकुल परंपरेहून अल्प नाहीत. हा आश्रम एखाद्या ऋषींच्या आश्रमासारखा आहे. – डॉ. अजयकुमार जैस्वाल, अध्यक्ष, भारत विकास परिषद, वाराणसी, उत्तर प्रदेश. (२०.६.२०१६)
२. जेथे सात्त्विक आणि धार्मिक कार्ये होतात, तेथे ईश्वराच्या अस्तित्वामुळे बोध हा होतोच आणि येथे तसेच आहे. – श्री. धर्मेन्द्र सिंह ठाकूर, प्रचार प्रसार प्रमुख (मंडला जिला), हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश. (२०.६.२०१६)
३. मी माझ्या आयुष्यात संपूर्ण भारत ३ – ४ वेळा फिरलो आहे. मी गोवा येथे पहिल्यांदा आलो; पण हा आश्रम पाहिल्यावर आणखी कुठे फिरावे, असे वाटले नाही. – श्री. भानू प्रताप सिंह पवार (अधिवक्ता), सदस्य, राष्ट्रीय कार्यकारिणी, भारत रक्षा मंच, उज्जैन, मध्यप्रदेश. (२०.६.२०१६)
४. आश्रमातील अनेक गोष्टी आदर्श आणि शिकण्यासारख्या आहेत ! : आश्रम पाहून पुष्कळ चांगले वाटले. येथील सर्व साधक नम्र, सेवाभावी आणि प्रसन्न वाटले. आश्रमातील स्वच्छता शुभकार्य दर्शवते. आश्रमातील कार्यालय, भोजनादी व्यवस्था परिपूर्ण वाटली. येथील अनेक गोष्टी आदर्श आणि शिकण्यासारख्या आहेत. अभिनंदन ! – श्री. सूर्यकांत पांडुरंग केळकर, अध्यक्ष, भारत रक्षा मंच, उज्जैन, मध्य प्रदेश. (२०.६.२०१६)
५. सनातनच्या साधकांप्रमाणे देशातील सर्वांनी निःस्वार्थपणे कार्य केल्यास चांगले होईल ! : आश्रमात ज्याप्रमाणे साधक सेवा करतात, त्याप्रमाणे देशातील सर्वांनी निःस्वार्थपणे कार्य केल्यास चांगले होईल. सर्व विभागांत स्वच्छता आहे. साधकांना पाहून छान वाटले. आश्रमात पावलोपावली शांत वाटले. हा आश्रम मंदिराप्रमाणे वाटतो. प्रत्येक साधकाच्या तोंडवळ्यावर शांतता आणि प्रकाश दिसतो.
– श्री. एन्. शिवा, जिल्हाध्यक्ष, संस्कृतभारती, नालगोंडा, तेलंगण. (२०.६.२०१६)
६. साधकांच्या सतत होणार्या प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्र स्थापना होणारच आहे ! : आश्रमातील शांत वातावरण आणि स्वच्छता पुष्कळ आवडली. येथील साधकांमध्ये मला हिंदु संस्कृती आणि तिचे आचरण दिसले. हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी साधक परिश्रम घेतात, हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. साधकांच्या सतत होणार्या प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्र स्थापना होणारच आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय पूर्ण होणार, असे मला येथे दिसले.
– श्री. गोपी किशन, जिल्हाप्रमुख (इंदूर), शिवसेना, इंदूर, तेलंगणा. (२०.६.२०१६)