श्राद्ध संबंधित प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे

वेदमूर्ती केतन शहाणे

प्रश्‍न : श्राद्धविधी चालू असतांना त्या ठिकाणी ‘ॐ’चा उच्चार करू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. यावर्षी (वर्ष २०१६ मध्ये) पितृपक्षाच्या कालावधीत सर्व साधकांना ‘ॐॐ श्री गुरुदेव दत्त ॐॐ ।’ असा नामजप करण्यास सांगितले होते. श्राद्धविधी चालू असतांना ‘ॐ’ लावून नामजप केल्यास ते शास्त्रसंमत होणार नाही, तर कसे असावे ?

उत्तर : श्राद्धविधी चालू असतांना त्या ठिकाणी ‘ॐ’चा उच्चार करू नये, हे योग्य आहे. नामजप मनातल्या मनात (सूक्ष्मातून) करत असल्याने त्याला हा नियम लागू होत नाही. श्राद्धविधी चालू असतांना सध्या सांगितलेला ‘ॐॐ श्री गुरुदेव दत्त ॐॐ ।’ असा नामजप मनातल्या मनात करण्यास आडकाठी नाही; परंतु वैखरीतून (मोठ्याने) नामजप करायचा असल्यास तो ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा करावा. त्या वेळी मात्र ‘ॐ’ लावून नामजप करू नये; मात्र श्राद्धकर्त्याने मनातल्या मनात अथवा वैखरीतून (मोठ्याने) ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असाच नामजप करावा.

 

प्रश्‍न : श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ?

उत्तर : शास्त्रात ज्या कृतींसाठी जो काळ नेमून दिलेला आहे, त्या त्या काळात त्या कृती करणे आवश्यक आणि महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पितृपक्षातच महालय श्राद्ध करावे. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी एखाद्याचे सांवत्सरिक श्राद्ध असल्यास ते त्याच दिवशी करावे. श्राद्धाच्या स्वयंपाकातीलच नैवेद्य श्री गणपतीला दाखवावा. सर्वसाधारणपणे सूर्य वृश्‍चिक राशीत असेपर्यंत महालय श्राद्धाचा काळ सांगितला आहे.(या वर्षी हा काळ १५ नोव्हेंबरपर्यंत आहे.) पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याविषयी निरनिराळे पक्ष सांगितले आहेत. सांप्रत मृत व्यक्तीच्या (मृत्यू झालेल्या) तिथीलाच पितृपक्षात एक दिवस महालय श्राद्ध केले जाते. ज्यांच्या घरी २१ दिवसांचा गणपति पूजला जातो, त्यांच्या घरी श्री गणपति असेपर्यंत जर श्राद्ध तिथी येत असेल, तरीही त्यांनी त्याच तिथीला महालय श्राद्ध करावे. श्राद्धाच्या स्वयंपाकातीलच नैवेद्य श्री गणपतीला दाखवावा; मात्र श्राद्धाच्या दिवशी इतर विधी, उदा. श्री गणेशयाग, लघुरुद्र इत्यादी अनुष्ठाने करू नयेत. जननाशौच किंवा मरणाशौच (सुवेर-सुतक) किंवा अन्य काही अपरिहार्य कारणामुळे एखाद्याला त्या तिथीला महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सर्वपित्री अमावास्येला करावे. अन्यथा सोयीनुसार कृष्ण पक्षातील अष्टमी, द्वादशी, अमावास्या आणि व्यतीपात योग या दिवशीही महालय श्राद्ध करता येते.

 

प्रश्न : शास्त्रशुद्ध पितृशांती कुठे केली जाते ? त्रंबकेश्वरला होते असे ऐकिवात आहे पण नक्की माहिती नाही कृपया मार्गदर्शन करावे…

उत्तर : त्रिपींडी श्राद्ध, कालसर्प शांती, नारायण नागबली या विधींना प्रचलित भाषेत ‘पितृशांती’ असे म्हणतात, हे विधी वाराणसी, त्रंबकेश्वर, गया (बिहार) येथे केली जातात. आपण वरीलपैकी कुठेही विधी करु शकता.

 

 

प्रश्न : मी माझ्या मुलांसोबत माझ्या माहेरी रहाते. माझे पति विदेशात असतात. माझे सासरे वारले आहेत, तर मी माझ्या सास-यांचे महालय माझ्या माहेरी करू शकते का ? नाहीतर मग दुसरा काही उपाय ?

उत्तर : पतीच्या वतीने आमान्न श्राद्ध करू शकता. यामध्ये बटाटे, तूप, तीळ, गूळ आणि तांदूळ, विडा – नारळासहीत एकाद्या पुरोहिताला किंवा देवळात अर्पण करावे.

 

प्रश्न : पितृपक्षात जर सुतक पडले तर काय करावे ?

उत्तर : पितृ पक्षात जर सुतक पडले तर, मृत व्यक्तीची तिथी जर सुतक संपल्यावर येत असेल तर तेव्हा पितृपक्षातील विधी करू शकतो, जर मृत व्यक्तीची तिथी सुतक असलेल्या दिवसांत असल्यात सर्वपित्री अमावास्याला विधी करु शकतो. यात फक्त मृत व्यक्ती जर आपले आई-वडिल यांपैकी कोणी असल्यास त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही. पुढील वर्षी करु शकतो.

 

प्रश्न : मला पण पितृदोष आहे असे म्हणतात. मला बघायचे होते आहे की नाही.

उत्तर : पितृदोष म्हणजे काय, पितृदोषाची लक्षणे, त्या मागील कारणे, पितृदोषांसाठी उपासना आणि त्या उपासनेचे लाभ यांविषयी जाणून घेण्यासाठी भेट द्या – https://www.sanatan.org/mr/a/11664.html

 

प्रश्न : का कुणास ठावूक…. पण पितृशांती केल्या वर माझा त्रास अजून वाढला. कारण काय असू शकेल ?

उत्तर : काहीवेळा त्रास कमी होताना तो वाढतो, त्यामुळे हे देखील त्रास कमी होण्याचे एक लक्षण असू शकते तसेच पितरांच्या त्रासाची तिव्रता अधिक असल्यास एकच विधी केल्याने त्याचा अपेक्षित लाभ हाेऊन त्रास दूर होईलच असे नाही, त्यासाठी नियमीत ।। श्री गुरुदेव दत्त ।। हा नामजप आणि कुटुंबियांच्या पत्रिकेनुसार अन्य विधी देखील करावे लागू शकतात.

 

प्रश्न : मी पण पितृदोष शांती केली पण काही फरक पडला नाही. चारही ब्राह्मणांना विचारले परंतु वेगवेगळी उत्तरे मिळाली. काय करावे ?

उत्तर : पितरांच्या त्रासाची तिव्रता अधिक असल्यास एकच विधी केल्याने त्याचा अपेक्षित लाभ हाेऊन त्रास दूर होईलच असे नाही, त्यासाठी नियमीत ।।श्री गुरुदेव दत्त ।। हा नामजप आणि कुटुंबियांच्या पत्रिकेनुसार अन्य विधी देखील करावे लागू शकतात.

 

प्रश्न : माझी आजी, आई यांनी आपले पूर्वज देवघरात ठेवले आहेत. बर्याच ठिकाणी चांदीचे देव बनवले जातात त्यात आपल्या पुर्वजाचा एक टाक हा असतो. तो ठेवावा का नाही ?

उत्तर : टाक ठेवणे योग्य नाही. ते विसर्जित करावे.

 

प्रश्न : जर एका व्यक्तीला चार मुले आहे व ती व्यक्ती गेल्या नंतर चारही जणांनी श्राद्ध घालावे का  ?

उत्तर : धर्मशास्त्रानुसार अनेक भावांची चूल वेगळी असेल तर सर्व कुलाचार, श्राद्ध इत्यादी स्वतंत्र करू शकतात.

 

– वेदमूर्ती केतन शहाणे, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

100 thoughts on “श्राद्ध संबंधित प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे”

  1. वर्ष श्राद्ध होण्याच्या आधी घरात शुभ कार्य केले पाहिजे नाही तर ३ वर्ष शुभ कार्य करता येत नाही हे खरे आहे का

    Reply
    • नमस्कार,

      घरातील व्यक्ती गेल्यास पहिले वर्ष दुखवट्याचे मानले जाते, त्यामुळे पहिल्या वर्षी शुभकार्ये केली जात नाहीत. पण जर काही अपरिहार्य कारणामुळे शुभकार्य करावे लागणार असेल तर सामाजिक भान राखत ती साधेपणाने करू शकता.

      Reply
      • भावकित कुणाचा मृत्यु झाल्यास पितृपक्षात श्राद्ध करता येते का

        Reply
        • नमस्कार रामकृष्ण जी

          याविषयी तुम्हाला किती दिवस सुतक लागते इत्यादी कोणाचा मृत्यू झाला आहे यावर ठरत असल्यामुळे कृपया स्थानिक पुरोहितांचा तसेच घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा अशी विनंती आहे.

          आपली
          सनातन संस्था

          Reply
          • 12 divshya divshi amchya mamiche shrdha ahe. 6 October la..maza navaratricha upavas pan असणार ahe ani ghari devichi arati pan karaychi ahe.mag mi kai karu..shrdha zalyaver dev puja ghari alyaver karu shakte na..

          • नमस्कार

            याविषयी शास्त्रीय दृष्ट्या क्लिष्ट निर्णय असल्याने आपण स्थानिक पुरोहितांकडून अथवा श्राद्ध करणाऱ्या पुरोहितांकडून बोलून निर्णय समजून घ्यावा अशी विनंती आहे.

            आपली,
            सनातन संस्था

      • नमस्कार,

        धर्मशास्त्रानुसार ज्या तिथीला निधन झाले त्या तिथीला श्राद्ध करावे. त्यामुळे एकादशीला देहांत झाले असल्यास एकादशीला श्राद्ध करावे.

        Reply
    • 17 वर्षाचा मुलगा वारलेला आहे त्याचं वर्ष श्राद्ध करता येते कां काही गुरुजींनी नाही म्हणले आहे कृपया margदर्शन करा

      Reply
      • नमस्कार दीपक जी,

        या विषयी ज्या पुरोहितांकडून या मुलाचे अंत्यविधी केले गेले त्या पुरोहितांचे मत ग्राह्य धरावे. कारण त्याचे कोणते विधी कोणत्या क्रमाने केले आहेत यानुसार हे ठरते त्यामुळे.

        आपली
        सनातन संस्था

        Reply
  2. ऋषिपंचमीच्या दिवशी वारलेल्या आई/ सासूचे वषॆ श्राद्ध कसे करावेत? फराळावर 13 सवासणी घालाव्यात का? जेवण kse बनवणे?

    Reply
    • नमस्कार,

      ऋषिपंचमीला आई/ सासू यांचे श्राद्ध असल्यास तसेच त्यावेळी घरात गणपति बसवत असल्यास दोन्हींसाठी वेगळे जेवण बनवावे.

      जर तुमच्या घराच्या परंपरेनुसार श्राद्ध करतांना सवाशणींना फराळ अथवा जेवण द्यायचे असेल तर तसे तुम्ही करू शकता.

      Reply
  3. what is special about gaya shraddha?
    is it true gaya me shraddha karne ke baad phir zindgibhar shraddha karne ki jarurat nahi rehti.

    Reply
    • Namaskar,

      It is due to the boon given to the place Gaya that pindadaan done here is immediately received by the ancestors. This is speciality of that place and hence it has gained importance.

      No, this is not true that if once shraddha is performed at Gaya then there is no need to perform Shraddha again. Shraddha performed at Gaya or similar pilgrim place is called ‘Teertha Shraddha’.

      Reply
      • नमस्ते जैदीप जी

        आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

        घरात पितरांचे टाक ठेऊ नये. ठेवले असतील तर स्थानिक पुरोहितांमार्फत त्याचे विसर्जन करावे.

        आपली
        सनातन संस्था

        Reply
          • नामसते रोहिणी जी

            तिथीला श्राद्ध करायचे राहिल्यास आपल्या कुल किंवा स्थानिक पुरोहितांना विचारून पुढील योग्य तिथीला श्राद्ध करू शकतात. शास्त्रांमध्ये त्यासाठी प्रबंध आहे.

            आपली
            सनातन संस्था

  4. भरणी श्राद्ध आणि वर्ष श्राद्ध एकाच दिवशी करू शकतो का (पितृपक्ष पंधरवड्यात) कारण वर्ष श्राद्ध पितृपक्षात येते आहे

    Reply
    • नमस्कार,

      भरणी श्राद्ध भरणी नक्षत्राच्या दिवशी तर वर्ष श्राद्ध ज्या तिथीला पितृपक्षात येते त्या तिथीला करावे.

      Reply
  5. माझे पणजोबा हे पौर्णिमेला वारले आहेत आणि आजोबा आहे पण माझे चुलते हे अमावसेला वारले आहे आणि ते अविवाहित होते तर हया दोघांचे श्राध्द कधी घालायचे

    Reply
    • नमसकार,

      एखाद्या व्यक्तीचे निधन ज्या दिवशी ज्या वेळी होते त्या तिथीला वर्ष श्राद्ध करावे.

      Reply
  6. चतुर्थीश्राद्धाच्या दिवशी संकष्टीचतुर्थीचा उपवास असतो.त्या दिवशी श्राद्ध निमित्त नैवेद्यासाठी उपवास फराळ असावा की नित्य भोजन पदार्थ असावे.
    आणि उपवास नित्य संकष्टी प्रमाणे करावा का?
    मार्गदर्शन करावे.

    Reply
    • नमस्कार,

      श्राद्ध निमित्त नैवेद्यासाठी नित्य भोजन पदार्थ असावे. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदयानंतर सोडतांना नैवेद्यातील पदार्थ प्रसाद म्हणून घेऊ शकता.

      Reply
  7. एप्रिल 2021 मध्ये आईचे निधन झाले.
    अडचनी मुळे वर्षश्राद्ध एक वर्षाने करण्या ऐवजी सहा महिण्याने करता येते का.

    Reply
    • नमस्कार,

      मृत व्यक्तीच्या लिंगदेहाला मर्त्यलोकात पोचायला १ वर्षाचा कालावधी लागतो. तोपर्यंत त्याला ‘पितर’ असे संबोधता येत नाही. त्यामुळे त्या जीवासाठी केलेले श्राद्ध त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून १ वर्ष पूर्ण झाल्यावर वर्ष श्राद्ध करावे.

      Reply
      • माझी आई 27 मे ला देवधर गेली, मग आम्ही 12 व्या दिवसी वर्षी वाळून घेतली व उदक शांती करुं घेतली. व १३ सुवासिनींना जेवण दिले आणि शृंगार साहित्य व साडी दिली. व दर महिन्याला पण द्वितीया तिथीला श्राद्ध करतो, व एका महिलेला जेवण घालतो. आता वर्ष श्राद्ध कधी करावे व कसे ? आणि आम्हाला मातरूग्या इथे श्राद्ध कर्म करावयाचे आहे ते कधी करावे ?

        Reply
        • नमस्कार,

          तुमची आई गेली त्या वेळी जी तिथी होती, त्या तिथीला प्रत्येक वर्षी श्राद्ध करावे. यालाच ‘वर्ष श्राद्ध’ म्हणतात.

          आईचे निधन होऊन एक वर्ष झाल्यावर म्हणजेच पहिले वर्ष श्राद्ध झाल्यानंतर मातृगया येथे जेव्हा जाऊ तेव्हा कधीही श्राद्ध करू शकता.

          Reply
  8. नमस्कार,
    माझ्या वडिलांचे देहावसान ९ ऑक्टोबर २०१८ रोजी अदमासे रात्री ८:०० वाजता झाले. मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. तदनंतर, सारे श्राद्धविधी केले, बाबांचे वर्षश्राद्ध झाल्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये देहावसान झाले. आईचे ही इच्छेनुसार मरणोपरांत देहदान केले . २०२० साली आईचे वर्षश्राद्ध झाले नसल्याकारणाने, कै बाबांचे वार्षिक पक्ष, श्राद्ध विधी करता येत नाहीत असे मार्गदर्शन मिळाल्या कारणाने केवळ ब्राम्हणाला पक्ष तिथीला आणि श्राद्ध तिथीला दूध, केळी, पेढे आदी देऊन त्यांचे स्मरण केले. परंतु यंदा कै बाबांचे पक्ष तिथी कोणती आणि श्राध्द तिथी एकच म्हणजे असे वाटते आहे, यावर नेमके विधी कोणत्या दिवशी आणि काय करावेत यावर मार्गदर्शन हवे आहे.

    Reply
    • नमस्कार,

      देहदान करणे शास्त्रीय दृष्ट्या अयोग्य आहे. जाणाऱ्या व्यक्तीची तशी इच्छा असली तरी असे देहदान करू नये.

      उर्वरित शंकांची उत्तरे क्लिष्ट असल्याने स्थानिक स्तरावर पुरोहितांना संपर्क केल्यास तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे साहाय्य होईल.

      Reply
  9. माझे वडील 17 एप्रिल 2021 वारले त्यानंतर काका (वडिलांचा सख्खा भाऊ) 16 सप्टेंबर 2021 वारले तर वडिलांचे पितृ पक्षातील श्राद्ध राहून गेल्याने ते केव्हा घालावे ? जर राहील्यास सर्व पित्री अमावास्या ला घालतात की वर्षेश्राद्ध च्या नंतर ?

    Reply
    • नमस्कार,

      वडील याच वर्षी गेल्याने तुम्हाला या वर्षी महालय श्राद्धाचा अधिकार नाही.

      धर्मशास्त्रानुसार, व्यक्तीचे निधन होऊन १ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्याच्यासाठी पितृपक्षात महालय श्राद्ध करता येत नाही.

      Reply
  10. नमस्कार गुरुजी, आमच्या आईला देवाघरी जाऊन एक वर्ष होत आहे. तिच्या जाण्याची तिथी कृष्ण 1 आहे. आपल्या साईट वर वाचले होते की वर्ष श्राद्ध जाण्याच्या तिथी च्या आदल्या दिवशी करावे पण आदल्या दिवशी पौर्णिमा येतं आहे तर काय करावे, कारण मी ऐकले आहे की पौर्णिमेला श्राद्ध करू नये तर कृपया मार्गदर्शन करावे.
    अश्विन कृष्ण 1 ला वर्ष होत आहे.

    Reply
    • नमस्कार,

      प्रतिवर्षी केले जाणारे श्राद्ध हे त्या तिथीलाच करावे हे योग्य आहे मात्र पाहिले वर्ष पूर्ण होताना वर्ष पूर्ण होण्याच्या आदल्या दिवशी आणि वर्ष पूर्ण होते त्या दिवशी असे दोन दिवस श्राद्धविधी केले जातात मात्र या सांगितलेल्या तिथी श्राद्ध करण्याच्या काळात म्हणजे दुपारच्या वेळेत ही तिथी असणे आवश्यक आहे.

      पौर्णिमा असताना श्राद्ध करू नये हा मुद्दा या श्राद्ध संबंधी लागू होत नाही, तरी कृष्ण 1 या दिवशी श्राद्ध करावे, तसेच आदल्या दिवशी वर्ष पूर्ण होण्याविषयीचे अब्दपूरित श्राद्ध ही शक्य त्या प्रकारे स्थानिक पुरोहितांचे मार्गदर्शन घेऊन करावे.

      Reply
      • माझे वडील वारले आहेत. आई आहे तर माझ्या आजोबा व आजी चे महाळ पुजन मी करावे का आईने

        Reply
        • नमस्कार,

          वडिलांचे श्राद्ध मुलानेच करावे.

          वडिल कधी वारले आहेत ? त्यांचे निधन होऊन १ वर्ष पूर्ण होऊन त्यांचे वर्षश्राद्ध होई पर्यंत मुलाला महालय श्राद्ध करण्याचा अधिकार नसतो. त्यांचे वर्षश्राद्ध झाल्यावर त्यानंतर प्रत्येक पितृपक्षात वडिलांच्या तिथीला महालय श्राद्ध करावे. महालय श्राद्धात आई-वडिल व त्यांच्या ३ पीढ्यांपैकी गेलेल्यांना उद्देशून श्राद्ध होत असल्याने, आजी-आजोबांसाठी वेगळे महालय श्राद्ध करावे लागत नाही.

          Reply
  11. बाराव्याच्या दिवशी जे जेवण वाढतात ते कोण जेवू शकत नाही? असं म्हणतात की ज्या मुलाचे वा मुलीचे आई वडील जिवंत असेल तर त्यांनी दुसर्यांच्या घरी श्राद्धाचे जेवण जेवु नये, हे खरे आहे का?

    Reply
    • नमस्कार,

      बाराव्या दिवशी सुतक निवृत्तीचा विधी करून मग वेगळे जेवण वाढलं असेल तर आप्तेष्टांनी जेवायला हरकत नाही, पण 12 व्या दिवसाच्या विधीमध्येच वाढलेले जेवण सर्वांना वाढू नये आणि असे केल्यास अन्यानी जेवायला जाऊ नये.
      आई वडील जिवंत असण्याचा काही संबंध नाही, परंतु वरील नियम मात्र सर्वांनी पाळावा.

      Reply
  12. माझी आई दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ स्वर्गवासी झाली आहे, तरी प्रत्येक महिन्याला व वर्षश्राद्ध कसे करावे याचे मार्गदर्शन करावे ही विनम्र विनंती

    Reply
    • नमस्कार,

      व्यक्ती निवर्तल्यावर १ वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक मासाला मासिक श्राद्ध करावे. याविषयी स्थानिक पुराेहितांना संपर्क करू शकता.

      Reply
  13. माझ्या वडिलांचे २७/०४/२१ ला हनुमान जयंती ला निधन झाले. तर त्यांचे वर्ष श्राद्ध कधी करावे? तारिख सांगितले तर फार आभार होईल.

    Reply
    • नमस्कार,

      श्राद्ध हे तिथीनुसार करावे. २७/०४/२१ या दिवशी तुमचे वडिल ज्या वेळेला गेले, त्या वेळी जी तिथी होती, त्या तिथीला नियमित वर्षश्राद्ध करावे.

      एखाद्या दिनांकाची तिथी (वेळ व स्थान यांनुसार) शोधण्यासाठी mypanchang.com या संकेतस्थळाचा उपयोग करू शकता.

      Reply
  14. माझ्या मुली चे वय 25 कुमारी असताना जेष्ठ महिना कृष्ण प्रतिपदेला ( Date 25/06/2021) देवाज्ञा झाली. तीचे प्रथम वर्ष श्राध्द साडे अकरा महिन्यात करावे की तीथी नुसार बारा महिने पूर्ण झाल्यावर म्हणजे जेष्ठ महिना कृष्ण प्रतिपदेला 2022 ला करावे.
    कृपया शात्र संमत मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.

    Reply
    • नमस्कार,

      मुलीचे श्राद्ध 12 मास पूर्ण झाल्यावर करावे.

      Reply
  15. ज्या तिथीला व्यक्ती मृत पावला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे जिवंतपणी करणे हे बरोबर आहे का..?..

    Reply
    • नमस्कार,

      ज्या तिथीला व्यक्तीचे निधन झाले त्याच तिथीला प्रत्येक वर्षी तिचे श्राद्ध करावे.

      Reply
  16. पुरोहितांच्या शिवाय घरच्या घरी वर्ष श्राद्ध करता येत नाही का?
    असेल तर कसे करावे याचे मार्गदर्शन करावे?

    Reply
    • नमस्कार,

      श्राद्धाचा विधी खूप मोठा असतो. विस्तारभयास्तव तो येथे देणे शक्य नाही. तुम्ही स्थानिक पुरोहितांकडून शिकून घेऊन नंतर स्वयं करू शकता.

      Reply
  17. माझे नातेवाईक शशिकांत वाघमारे यांचे निधन 24/9/2021 रोजी रात्री 12.20 a.m. ला झाले. तर त्यांची प्रथम श्राद्धाची नेमकी तारीख काय येते ?
    तसेच त्यांचा मृत्यू ज्या गावात झाला तेथेच वर्षश्राद्ध करावी की अन्य गावाला केले तर चालते

    Reply
    • नमस्कार,

      तुमच्या नातेवाईकाचे ज्या दिवशी ज्या वेळेला निधन झाले त्यावेळी कुठली तिथी होती ते पहावे. त्या तिथीला प्रत्येक वर्षी त्यांचे श्राद्ध करावे. (ज्या दिवशी त्यांचे निधन झाले त्या दिवशी, त्या वेळेला व ठिकाण यांनुसार तिथी बदलू शकते. ते बघण्यासाठी mypanchang.com या संकेस्थळाचा उपयोग करावा. ती तिथी प्रत्येक वर्षी ज्या दिनांकाला येईल त्या दिवशी श्राद्ध करावे.)

      जिथे मृत्यू झाला आहे तिथेच श्राद्ध करावे असे नाही.

      Reply
        • नमस्कार निशांत जी,

          हो. श्रद्धा करावे.

          आपली
          सनातन संस्था

          Reply
          • मला दोन भाऊ आहेत माझे वडील तेरा आणि दोन वर्षांपूर्वी माझा भाऊ वारला मग माझा धाकट्या भावाने ह्यांचे श्राद्ध कसे करावे वडिलांच्या तिथीला की भावाच्या तिथीला भावाला मुलगा नाही वडील दशमीला वारलेत आणि भाऊ पंचमीला वारला आहे आणि आई सवाष्णा वारली आहे मग महाळ कधी घालावा

          • नमस्कार राधिका जी

            महालय श्राद्ध वडिलांच्या तिथीला म्हणजे दशमी ला करावे.

            आपली,
            सनातन संस्था

  18. गर्भपात झाला असेल तर श्राद्ध करावे का? असेल तर कधी आणि कोणी?
    आणि दर वेळी करावे की एकदाच?

    Reply
    • नमस्कार,

      आवश्यकता नाही. महालय श्राद्धाच्या वेळी अशांसाठी पिंडदान केले जाते.

      Reply
  19. माझ्या सासूबाई 2015 मध्ये वारल्या सासरे जिवंत असताना..म्हणून आम्ही त्यांची पित्र अविधवा , नवमी ल घालतो…पण 2021 मध्ये सासरे वारले त्यांचे वर्ष श्राद्ध मागच्या महिन्यात झाले. मग आता आम्ही सासू आणि सासरे यांचे पित्र कसे घालावे? सासू च्या तिथीला म्हणजे नवमी ला की सासरे यांच्या तिथीला(सासरे यांची तिथं द्वितीया) ?

    Reply
    • नमस्कार,

      आता सासऱ्यांचे पण निधन झाल्याने, तुमच्या सासूचे पितृपक्षातील अविधवा नवमीला श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही. सासऱ्यांचे प्रथम वर्ष श्राद्ध झाले असल्याने या वर्षी पितृपक्षात त्यांचे महालय श्राद्ध करता येणार आहे. महालय श्राद्धामध्ये वडील आणि आई, आणि त्यांच्या मागील ३ पीढ्यांचे श्राद्ध समाविष्ट असते. त्यामुळे सासऱ्यांच्या मृत तिथीला पितृपक्षात महालय श्राद्ध करावे. त्यातच सासूचा पण उल्लेख होणार.

      Reply
  20. पौर्णिमा श्राद्ध करता आले नाही तर पुढे ते कोणत्या तिथीस करावे कृपया मार्गदर्शन करावे

    Reply
    • नमस्कार,

      श्राद्ध मृत तिथीला करता आले नाही तर द्वादशी किंवा अमावास्येला करावे.

      Reply
  21. पितृपक्षात गणपतीची मूर्ती घरात ठेवणे योग्य आहे कि अयोग्य?

    Reply
  22. वडिलांच्या मृत्यूनंतर आईचा मृत्यू साडेतीन महिन्यानंतर झाला असेल तर वडिलांचे वर्श्राषद्ध केव्हा करावे

    Reply
    • नमस्कार,

      वडिलांचे वर्ष श्राद्ध ते ज्या तिथीला गेले त्या तिथीला करावे.

      Reply
  23. मिसेस च्या मासीक पाळी मूळे या वर्षी सर्वपित्री अमावास्येला वडिलांचे वर्ष श्राद्ध करायचे राहिले तर ते आता कधी करू शकतो.

    Reply
    • नमस्कार,

      वडिलांच्या तिथीला श्राद्ध करू शकला नाहीत, तर द्वादशी किंवा पुढील अमावास्येला श्राद्ध करू शकता.

      Reply
  24. या वर्षी अमावास्येला ग्रहण आहे (२५-१०-२०२२), तर श्राद्ध करू शकतो का?

    Reply
  25. मला धाकटा भाऊ आहे. त्याला आईचे वर्ष श्राध्ध करणे शक्य नसल्यास मला ( विवाहित मुलीला ) ते करता येईल का ?

    Reply
    • नमस्कार,

      तुमचे पति तुमच्या आईसाठी श्राद्धविधी करू शकतात.

      Reply
  26. माझी आई ३ जानेवारी 2022 देवाघरी गेली आम्ही मासिक श्राद्ध यथा शक्ती केले आहे आता वर्षश्रद्धासाठी 24 डिसेंबर रोजी दिवस ठरला असला तरी भाऊबंदकी मध्ये विर्धी (चुलत भावाला मुलगी) झाल्यामुळे करता येईल का
    कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

    Reply
    • नमस्कार श्रक्ष. समीर पाटीलजी,

      सोयर संपल्यावर करू शकता किंवा अधिक माहितीसाठी स्थानिक पुरोहितांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

      Reply
  27. वर्ष श्राद्ध च्या तिथी वेळी सोयर आल्यास काय करावे ?सोयर पाळावे का?पाळल्यास वर्ष श्राद्ध किती दिवसांनीं करावे

    Reply
  28. namaskar guruji avivahit mahilechya shraddhavishayi kay niyam aahet tiche varshshraddh karave ka ?va prati varshik pan karave ka ?pind kiti asavet krupaya margdarshan karave

    Reply
    • नमस्कार श्री. लक्ष्मण पुरेकरजी,

      हे व्यक्तीचा मृत्यू कसा झाला यावर अवलंबून असल्याने स्थानिक पुरोहितांना विचारून अंत्यविधी काय केले होते यानुसार ठरवणे.

      Reply
  29. श्राद्ध घालण्यास आर्थिक स्थिती नसल्यास काही पर्याय आहे का कृपया कळवावे खूप टेंशन मध्ये आहे 2 दिवस उरलेत आणि खूप अडचणीत आहे

    Reply
    • नमस्कार
      आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

      सनातन हिंदु धर्मात ‘श्राद्ध’ विधीला महत्वाचे स्थान दिले आहे. तरीही, काही कारणाने श्राद्ध करण्यास अडचणी असतील तर त्यावर उपायही सुचवले आहेत. पुढील लेखात आपण त्याविषयी जाणून घेऊ शकता.
      https://www.sanatan.org/mr/a/781.html

      यासोबत, पितरांना चांगली गती मिळण्यासाठी तसेच अतृप्त पूर्वजांच्या अवकृपेपासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप अवश्य करावा. (अधिक माहितीसाठी वाचा – https://www.sanatan.org/mr/a/446.html)

      नामजपाची आठवण होण्यासाठी आपण सनातन चैतन्यवानी audio app आपल्या मोबाईल वर इन्स्टॉल करू शकता. (App Link – https://www.sanatan.org/chaitanyavani)

      आपली,
      सनातन संस्था

      Reply
      • नमस्कार,
        माझे सख्खे सासरे ८ जुने २०२२ ला वारले त्यांच्या वर्षाच्या आत चुलत सासरे म्हणजे त्यांचे मोठे भाऊ वारले तर वर्षश्राद्ध केव्हा करायचे. कृपया सहकार्य करावे.

        Reply
        • नमस्कार

          आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

          वर्ष श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तिथीलाच करावे.

          याच्या सोबत घरातल्या सर्वांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ जप नियमित करावा, जेणेकरून त्यांचा मृत्योत्तर प्रवास चांगला होईल.

          आपली
          सनातन संस्था

          Reply
  30. मी एक विधवा स्री आहे माझे पती, सासू, सासरे वारले आहेत तर मी सासू सासरे यांचे श्राद्ध किंवा अविधवा नवमी श्राद्ध करू शकते का आणी माझ्या पतींचे श्राद्ध आणि वर्ष श्राद्ध कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे

    Reply
    • नमस्कार रोहिणी जी

      आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

      आपण पुरोहितांकडून पतीसाठी तिथीला वर्षश्राद्ध करून घेऊ शकता. याव्यतिरिक्त अन्य काही करायचे असल्यास तुमच्या स्तरावर काय करायला हवे, हे स्थानिक पुरोहितांना विचारल्यास अधिक योग्य आणि विस्तृत कळू शकेल.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply
    • नमस्कार अजय जी,

      मृत महिलेचा पती जिवंत असल्यास त्या महिलेचे अविधवा नवमीला श्राद्ध करू शकता. आणि पती हयात नसल्यास पतीसोबतच तिचे श्राद्ध होईल त्यामुळे पतीच्या तिथीलाच महालय श्राद्ध करू शकता.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply
  31. नमस्कार, माझ्या वडिलांचा मृत्यू दि. 24/01/2023 रोजी झाला. वर्षी वाळल्या आहेत. 2023 च्या पितृपक्षात त्यांचे श्राद्ध करू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे.

    Reply
    • नमस्कार,

      या वर्षी पितृपक्षात श्रद्धा करू शकत नाही.

      आपली
      सनातन संस्था

      Reply
    • नमस्कार

      हो. या तिथीला श्राद्ध करू शकतात. मात्र त्याविषयी पुरोहितांमार्फत सविस्तर माहिती घेऊन श्राद्ध करावे.

      आपली
      सनातन संस्था

      Reply
  32. माझी आई वडील हयात असताना मरण पावले त्यांचे वर्षश्राद्ध पण आम्ही केले आता त्याच्यानंतर दरवर्षी कुठली पूजा करावी आणि कशी करावी आणि कोणी कोणी करावी मला एक बहीण सुद्धा आहे त्याविषयी थोडा सविस्तर सांगा धन्यवाद

    Reply
    • नमस्कार श्रीकांत जी

      आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

      आपले वडील हयात असेल तर वार्षिक श्राद्ध, तसेच पितृपक्षात नवमी तिथीला श्राद्ध त्यांनी करावे. ते हयात नसतील तर आपण श्राद्ध करावे.
      बहिणीने काही करण्याची आवश्यकता नाही.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply
  33. वडिलांच्या वर्षश्रध्दाच्या वेळेला जर भावकी तील मृत्यू मुळे सुतक आले तर वर्षश्राद्ध करता येते का ? पाहिले वर्षश्राद्ध आहे.

    Reply
    • नमस्कार राजेंद्र जी,

      सुतक संपल्यावर आपल्या पुरोहितांचा सल्ला घेऊन पुढील योग्य तिथीला श्राद्ध करावे.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply
  34. Namaskar Guruji
    jer kutumbat Navin Bal janmle asel ter ….ty varshi sasu – sasre yache shraddha & paksh karayche naste ka?

    Reply
    • नमस्कार अर्चना जी

      असे नाही, श्राद्ध अवश्य करू शकता.

      आपली
      सनातन संस्था

      Reply
  35. नमस्कार
    *वडील २५डिसेंबर १९९५,आईचे १२सप्टेंबर २०२०,भाऊ २२डिसेंबर २०१९ ह्या तारखांना निधन झाले तरी ह्यांचे एकञीत पितृपषात श्राद्ध कुठल्या तिथीला करावे.आम्ही आईच्या तिथीला पितृपष श्राद्ध एकञीत करतो.भटजींनी सांगितल्या प्रमाणे महालय श्राद्ध केले.आता आम्ही दरवर्षी तिघांचेही एकञीत पितृपषात श्राद्ध करतो. योग्य आहे का?*

    Reply
    • नमस्कार विजय जी

      आपल्या वडील, आई आणि भावाचे वार्षिक श्राद्ध त्या त्या तिथीला करावे, आणि वडिलांचे निधन झाले त्या तिथीला पितृपक्षात महालय श्राद्ध करावे.

      आपली
      सनातन संस्था

      Reply
  36. आधी आजी, नंतर वडील, मग आजोबा असे सर्व मयत झाले असतील तर मी नक्की कोणाचे श्राद्ध घालावे की सर्वांचे घातले पाहिजे.
    तसेच माझ्या आईला भाऊ नाही. तिच्या आई वडिलांचे श्राद्ध मी घातले पाहिजे का ?

    Reply
    • नमस्कार संतोष जी

      महालय श्राद्ध वडिलांच्या तिथीला करावे. त्यातच सर्वांना उद्देशून श्राद्ध होते.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply

Leave a Comment