यति माँ चेतनानंद सरस्वतीजी यांनी व्यक्त केलेला अभिप्राय !

 

परात्पर गुरु डॉ. आठवले

परम आदरणीय,

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या श्रीचरणी नमन !

मी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि आदरणीय पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी नमन करत आभार व्यक्त करते. त्यांनी मला या हिंदु राष्ट्राची पायाभरणी करणार्‍या महाकुंभामध्ये डासना येथील देवीचे मंदिर आणि माझे परम पूज्य गुरुजी यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या व्यथा अन् माझे मनोगत देश-विदेशातून आलेल्या हिंदूंसमोर मांडण्याची संधी दिली. येथील साधकांचे समर्पण, सेवा, सहजतेचा संस्कार आणि निष्ठा आदरणीय परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी निर्माण केली आहे. हे सर्व हिंदूंसाठी अनुकरणीय आहे.

सिद्धपीठ प्रचंड चंडी देवी मंदिर आणि आदरणीय गुरु यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या माध्यमातून मी हा विश्‍वास सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या प्रत्येक साधकाला देऊ इच्छिते की, डासना येथील देवी मंदिर प्रत्येक परिस्थितीमध्ये जिथे आवश्यकता असेल, तिथे तुमच्या समवेत असेल

गुरुचरणी कोटी कोटी नमन,

यति माँ चेतनानंद सरस्वती, महंत, सिद्धपीठ.

प्रचंड चंडी देवी मंदिर, डासना, गाझियाबाद, उत्तरप्रदेश.

संत ब्राह्मतेजाचे प्रतीक असतात. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी क्षात्रतेजाची साधना करणार्‍या धर्माभिमान्यांना ब्राह्मतेज प्रदान करणार्‍या संतांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment