नैसर्गिक आपत्तींमध्ये संघटितपणे आपत्कालीन साहाय्य कसे करावे ?

Article also available in :

आपत्कालीन साहाय्य करतांना कार्यकर्ते
आपत्कालीन साहाय्य करतांना कार्यकर्ते

१. आपत्तीचा सखोल अभ्यास करणे आवश्यक

१ अ. आपत्कालीन घटनेचे स्वरूप आणि व्याप्ती जाणून घेणे

आपद्ग्रस्तांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम घटनेचेे नेमके स्वरूप आणि त्याची व्याप्ती जाणून घ्यावी, उदा. भूकंप झाल्यास तो किती तीव्रतेचा आहे ?, महापुराने किती गावांना वेढले आहे ? इत्यादी. अशी माहिती विविध प्रसारमाध्यमे आणि शासकीय संकेतस्थळे यांच्या आधारे जाणून घेता येते. आपत्तीची व्याप्ती मोठी असल्यास व्यक्तीगत किंवा संघटनात्मक स्तरावर केल्या जाणार्‍या साहाय्यकार्याला अर्थातच मर्यादा येतात. अशा वेळी प्रशासनाला किंवा लष्कराला साहाय्य करता येते. मध्यम आणि मंद स्वरूपाच्या घटनेत संघटितपणे आपत्कालीन साहाय्य अधिक सक्षमपणे करता येऊ शकते.

१ आ. आपत्कालीन साहाय्यकार्य करण्याविषयीचा प्राधान्यक्रम ठरवणे

उत्तराखंडला जलप्रलय आल्याने मार्गांवर दगड आले होते. त्यामुळे तेथे शासकीय यंत्रणा आणि लष्कर यांना साहाय्य पोेहोचवणे कठीण होते. अशा वेळी मार्गावरील मोठेमोठे दगड हटवून महामार्ग मोकळा केला. परिणामी खाद्यान्नाचे ट्रक, लष्कराच्या गाड्या, रुग्णवाहिका आदींचे साहाय्यकार्य चालू होऊ शकले. नेपाळमध्ये भूकंपांमुळे घरांची पडझड झाली होती. त्या वेळी पडलेल्या इमारतींचा मलबा बाजूला करण्याचे कामही करावे लागले.

१ इ. पूर्वसिद्धतेसाठी घटनास्थळाच्या भौगोलिक स्थितीचा अंदाज घेणे

दर्‍याखोर्‍यांत वा डोंगराळ भागांत नैसर्गिक आपत्ती येऊन गेल्यानंतर तेथील भौगोलिक स्थिती बिकट होते. अशा वेळी तेथे जाण्यासाठी कोणती पूर्वसिद्धता करायची, याचे आधीच नियोजन करावे लागते. उत्तराखंडमध्ये आम्हाला रोप क्लायबिंगची उपकरणे नेल्याने लाभ झाला. नेपाळमध्ये भूकंपप्रवण स्थिती असल्याने तेथे रहाण्यासाठी तंबूंचा उपयोग झाला.

 

२. आपत्कालीन साहाय्यकार्य करण्याच्या पद्धती

२ अ. एका संघटनेने किंवा अनेक संघटनांनी एकत्र येऊन साहाय्यकार्य करणे

२ आ. प्रशासनाच्या साहाय्यकार्यात संघटनेने अथवा अनेक संघटनांनी सहभागी होणे

 

३. साहाय्यकार्य करणार्‍या स्वयंसेवकांमध्ये आवश्यक गुण आणि कौशल्ये

संघटनांनी साहाय्यकार्यासाठी स्वयंसेवकांची निवड करतांना त्यांची शारीरिक अन् मानसिक क्षमता उत्तम आहे कि नाही, हे पहाणे आवश्यक असते. आपत्तीच्या प्रसंगांत आपल्या स्वतःलाच तेथे जाऊन मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार करण्याचीही वेळ येऊ शकते. अशा कार्यासाठी स्वयंसेवकांची मनोसिद्धता असायला हवी. नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, सतर्कता, नियोजनकौशल्य, आत्मविश्‍वास, भावनाप्रधानता नसणे, जवळीक साधता येणे आणि ईश्‍वरावर श्रद्धा असणे, हे महत्त्वाचे गुण स्वयंसेवकामध्ये असावेत. त्याचप्रमाणे त्याच्याकडे वाहन चालवता येणे, स्वयंपाक करणे, प्रथमोपचार करता येणे आदी कौशल्येही असावीत.

 

४. आपत्कालीन साहाय्यकार्यासाठी जातांना स्वयंसेवकाने सोबत न्यावयाच्या वस्तू

पी.व्ही.सी. सोलचे जोडे (बूट), मोजे, पाठीवरील बॅग, पाण्याची बाटली, न फाटणारे कपडे (किमान संख्या असावी.), कॅमेरा, टॉर्च, स्वत:ला लागणारी औषधे, लहान प्रथमोपचारपेटी, अंथरुण-पांघरुण, पाच-सहा दिवस पुरणारा सुका खाऊ, मोठी दोरी यांसह आवश्यक ते वैयक्तिक साहित्य स्वयंसेवकांनी समवेत न्यावे.

 

५. आपद्ग्रस्तांना प्रत्यक्ष साहाय्य करणे

५ अ. आपत्कालीन साहाय्य करणारे आणि वस्तू यांसाठी कार्यालय स्थापन करणे

५ आ. आपद्ग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेणे

५ इ. आपद्ग्रस्तांना मानसिक आधार देणे

आपत्तीग्रस्त लोकांना मानसिक आधार मिळेल, असे प्रोत्साहन द्यावे. मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क करून द्यावा.

५ इ १. आपदग्रस्तांना उपास्यदेवतेचा नामजप करण्यास सांगणे

५ ई. आपद्ग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे

 

६. आपत्कालीन साहाय्यकार्य संघटितपणे राबवण्याचे महत्त्व आणि त्याची दिशा !

जीवनात आपत्तीचा सामना कधी करावा लागेल, ही वेळ सांगून येत नाही. आगामी काळात आपल्यावर कधीही आपत्कालीन साहाय्यता कार्य करण्याची वेळ येऊ शकते. भारतात कुठेही आपत्ती आली, तरी आपण सर्व संघटनांनी धर्मबंधूंच्या साहाय्यासाठी संघटितपणे कार्य करायचे आहे. आगामी काळात जेथे आपत्ती येईल, तेथील हिंदू संघटनांनी भारतभरातील हिंदू संघटनांना बोलावून साहाय्यताकार्य करण्याचे नियोजन करायचे आहे. हिंदु जनजागृती समितीही यासाठी नियोजनात आपल्याला साहाय्य करील.

– एक कार्यकर्ता

Leave a Comment