या घटना म्हणजे भयावह आपत्काळाची नांदी नव्हे का ?

असुरक्षित सामाजिक जीवन !

गेल्या १ सहस्रो वर्षांत प्रथम धर्मांध आणि नंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांनी भारतावर राज्य केले. त्या वेळी भारतात बहुसंख्येेने असलेल्या हिंदूंनी विशेष प्रतिकार केला नाही. सध्याची हिंदूंची मानसिकता मृतवत्च आहे. त्यामुळेच समाजात भ्रष्टाचार, लाचलुचपत, गुंडगिरी इत्यादींनी थैमान घातले आहे. परिणामी भारताची परिस्थिती केव्हा हाताबाहेर जाईल आणि किती जणांना कारण नसतांना प्राणाला मुकावे लागेल, हे सांगणे कठीण आहे.

 

हिंदूंवरील वाढते अत्याचार !

हिंदूंच्या असंघटितपणामुळेच आज त्यांच्यावर पुष्कळ अत्याचार होत आहेत. यात धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होणे, हिंदूंची धार्मिक स्थळे आणि धार्मिक उत्सव यांवर आक्रमणे होणे, मंदिरात होणार्‍या चोर्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढणे, मूर्तीभंजनही केले जाणे, देवळांमध्ये विष्ठा आणि गोमांस टाकणे, हिंदूंच्या सणांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गोहत्या केल्या जाणे, हिंदूंना धार्मिक उत्सव साजरे करण्यात आडकाठी करणे, मिरवणुकांवर दगडफेक होणे, दंगली घडवणे, दहशत निर्माण करणे, हिंदू रक्तबंबाळ होईपर्यंत मारणे अशा घटना घडत आहेत. प्रत्येक घटनेतून वाढत्या अराजकतेचेच दर्शन होत आहे. हिंदू या घटनांचा ना प्रतिकार करत, ना त्यांच्या विरोधात आवाज उठवत. त्यामुळे अत्याचार करणार्‍यांचे मात्र चांगलेच फावत आहे. या सर्व घटनांची परिणती कशात होणार आहे, हे सांगणे न लगे !

इसिस आणि शत्रूराष्ट्रे

देशातील अंतर्गत स्थिती जितकी भयावह आहे, तितकीच बाह्य स्थितीही भयावह आहे. आतापर्यंत देशात झालेली आतंकवादी आक्रमणे पहाता शत्रूराष्ट्रे भारताला गिळंकृत करू पहात आहेत.

पाक आणि चीन यांच्याकडून वारंवार केली जाणारी घुसखोरी आपल्याला नवीन नसली, तरी ती तितकीच गंभीर आहे. आपण सतर्क न झाल्यास प्रत्येक वेळी घुसखोरी करणार्‍यांना भारतात वास्तव्य करण्यास कितीसा वेळ लागणार आहे ?

महाभयंकर आणि विध्वंसक इसिस ही आतंकवादी संघटना म्हणजेही आपल्यासाठी भयावह आपत्काळच आहे. इसिसने आता भारतातही तिची पाळेमुळे रोवण्यास प्रारंभ केला आहे. इसिसचे स्वागत केले भारतातील फुटिरतावाद्यांनी आणि तिच्या आतंकवादी कारवायांना मात्र आता सामोरे जावे लागेल, ते मात्र निष्पाप भारतियांना ! एका वर्षांत इसिसने ६ सहस्र ५०० हत्या केल्याचा अहवाल समोर आला आहे. आज काश्मीरमध्ये, उद्या बंगालमध्ये, परवा भाग्यनगरमध्ये आतंकवादी आक्रमणे होण्याची शक्यता वारंवार वर्तवली जाते. हे जिहादी उद्या भारतात येतील, तेव्हा ते आम्हाला काफीर ठरवून आमचे गळे चिरतील !

नक्षलवाद्यांनीही आता भारतात सर्वदूर त्यांचे जाळे पसरण्यास प्रारंभ केला आहे. नक्षलवाद्यांचे संकटही भारतासाठी आतंकवाद्यांप्रमाणेच भयावह आहे.

नैसर्गिक आपत्ती

अत्याचार, आक्रमणे एवढ्यावरच आपत्काळाचे संकट मर्यादित राहिले आहे, असे नाही. मानव निसर्गाशी असलेले नाते तोडू पहात असल्याने, तसेच धर्माचरण करत नसल्याने निसर्गाचा प्रकोपही मानवाच्या नाशास कारणीभूत ठरत आहे. आतापर्यंत झालेले पूर, भूकंप, सुनामी, दुष्काळ, अन्नधान्य तुटवडा, भूस्खलन, ज्वालामुखी, वादळ, ढगफुटी, चक्रीवादळ, अग्नीप्रलय, वीज पडणे, वाढती रोगराई यांत अनेक माणसे मृत्यूमुखी पडली. नैसर्गिक आपत्तींमुळे घरेदारे नष्ट झाली. काही आपत्तींमुळे तर देशाचा आर्थिक कणाच मोडून पडला.

वरील सर्वच घटना पहाता आपत्काळ उंबरठ्याजवळच येऊन ठेपला आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वांनीच त्यादृष्टीने सतर्क व्हावे, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

हिंदूंनो, तुमचे आणि तुमच्या संपत्तीचे रक्षण
करण्यास पोलीस आणि शासन पूर्णत: अकार्यक्षम आहेत

हिंदूंनो, तुमचे आणि तुमच्या संपत्तीचे रक्षण करण्यास पोलीस आणि शासन पूर्णत: अकार्यक्षम आहेत, असे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत लाखो वेळा सिद्ध झाले आहे. हे लक्षात घेऊन संघटनाचे महत्त्व जाणा !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment