साधकांनो, येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

१. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता

१ अ. घनघोर आपत्कालाची भीषणता !

सध्या चालू असणार्‍या काळाची कल्पना सर्व साधकांना आली आहे. काही साधक, तर महाभयंकर आपत्काळाला प्रसंगी तोंड देऊनही आलेले आहेत. त्यामुळे जसजसा काळ जाईल, तसतशी आपत्काळाची तीव्रता वाढणार आहे. यापूर्वी आपण अनुभवलेला आणि आता अनुभवत असलेल्या आपत्काळाची तीव्रता काही अंशीच होती. तीही संत आणि महंत यांनी विविध मार्गे स्वतःवर ओढवून साधकांना त्याची झळ पोहोचू दिली नाही आणि ती सहन करण्यासाठी शक्ती देऊन त्यातून त्यांना बाहेर काढले. पुढे येणारा आपत्काळ हा जीवघेणा असणार आहे. त्यामुळेच अनेक संतांनीही काळाचा महिमा आणि वाढत्या रज-तमाचे प्राबल्य ओळखून म्हटले की, हा आपत्काळ पहाण्यापेक्षा डोळे मिटलेले बरे किंवा येणार्‍या आपत्काळाची ओल्यासह सुकेही जळून जाणार आहे. म्हणजेच या महाभयंकर काळाची पावले इतकी झपाझप आपल्या दिशेने येऊ लागली आहेत की, वाईटसमवेत जे चांगले आहेत, तेही जाणार आहेत.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भूमिका

२ अ. काळाची पावले ओळखून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य हाती घेणे

प.पू. डॉक्टर काळाची पावले ओळखून हिंदु राष्ट्र स्थापनेचे उदंड कार्य हाती घेऊन ते पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. हे कार्य वाटते तितके सोपे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनीही हेच ध्येय उराशी बाळगले आणि त्यासाठी जीव तोडून मावळ्यांना सिद्ध केले.

२ आ. प.पू. डॉक्टरांच्या सूक्ष्मातून झालेल्या संकल्पात
आपण गोप-गोपींप्रमाणे काठ्या लावून आपली साधना करून घेऊया !

प.पू. डॉक्टरांचा संकल्प सूक्ष्मातून झालेलाच आहे. आपण गोप-गोपींनी गोवर्धन पर्वताला लावलेल्या काठ्यांप्रमाणे काठ्या लावून त्यामध्ये आपली साधना करून घ्यायची आहे; म्हणूनच या कार्यात आपल्याला उतरायचे असेल, तर आधी स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे. त्यानंतर आपण पुढचा विचार करू शकतो.

२ इ. साधकांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करणे

स्वसंरक्षण ही आजच्या काळाची नितांत आवश्यकता आहे आणि तीच आपली साधना आहे, याची जाणीव व्हायला हवी.

३. प्रशिक्षण केल्याने होणारे लाभ

आपण भक्तीभावे प्रशिक्षणाला गेलो अन् तेथील प्रशिक्षण करू लागलो, तर गुरुदेवांप्रती आपली भक्ती जागृत होत असल्याचा अनुभव आपल्याला येईल अन् त्यातूनच आपले सामर्थ्य वाढून आपण येत्या भयाण आपत्काळाचा सामना करू शकू !

– एक साधिका

४. आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले गुण

१. आत्मबळ असलेला

२. अंतर्मन निर्मळ असणारा

३. राग, क्रोध आणि भावनेच्या आहारी न जाणारा

४. मर्यादा असलेला

५. संयम असलेला

६. कायद्याचे ज्ञान असलेला

 

Leave a Comment