परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त…
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९१ मधे ‘सनातन संस्था’ या एकमेवाद्वितीय अशा आध्यात्मिक संस्थेची स्थापना केली. ते स्वतः उच्चशिक्षित आणि सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ आहेत. त्यांनी पुष्कळ मिळकत असलेल्या वैद्यकीय व्यवसायाचा त्याग करून स्वतःचे अमूल्य आयुष्य संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी वाहून घेतले आहे. प्रत्येक मानवाच्या जीवनाचे ध्येय हे मोक्षप्राप्ती आहे आणि ते साध्य करण्यासाठी त्यांनी प्रत्येकाला आध्यात्मिक शिक्षण देऊन त्यांची आत्मोन्नती करण्याचे कार्य हाती घेतले आहे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले हे मानवजातीचे रक्षण करणारे अवतारी पुरुष आहेत. ते जगभर मूलभूत आणि प्रगत आध्यात्मिक तत्त्वांचा प्रसार करून लाखो जिवांना अज्ञानापासून मुक्त करून ज्ञान देत आहेत. त्यांच्या सहस्रो नि:स्वार्थ आणि ध्येयप्रेरित साधकांच्या माध्यमातून ते हे दैवी कार्य करत असून विश्वात ऐक्य आणि शांती प्रस्थापित करत आहेत.
३. त्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अनेक साधकांशी माझा संपर्क आला आहे. या साधकांकडून नेहमीच संपूर्ण मानवजातीप्रती प्रेम व्यक्त होत असते. त्याचबरोबर मानवामध्ये विश्वबंधुत्वाची, एकात्मतेची भावना निर्माण व्हावी आणि मानवाने जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त व्हावे, यासाठीची त्यांची तीव्र तळमळही दिसून येते.
४. ‘प्रत्येक जिवाला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करण्याचे त्यांचे हे ईश्वरी कार्य अविरत चालू रहाण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे साधक यांना आशीर्वाद मिळावेत’, हीच त्या शक्तीशाली आणि या विश्वाच्या, संपूर्ण मानवजातीचा निर्मात्याला मी आर्ततेने प्रार्थना करतो.
भारताला सर्वार्थाने शक्तीशाली राष्ट्र बनवण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात सहभागी होणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे नैतिक उत्तरदायित्व आहे.’
– श्री. राजेश शेट, मंगळुरु (६.५.२०१७)