१. धर्म, पंथ, जात, वंश यांच्या पलीकडे नेणारे, पृथ्वीवरील
सर्व जीवमात्रांचे पालनपोषण करणारे आणि त्यांची उन्नती
करून घेऊन त्यांना मोक्षाला नेणारे सनातन धर्म राज्य (हिंदु राष्ट्र)
दैनिक सनातन प्रभातमध्ये आध्यात्मिक दृष्टीकोनातून हिंदु राष्ट्र हा प.पू. पांडे महाराज यांचा लेख नुकताच प्रकाशित झाला आहे. हा लेख साधक आणि हिंदु धर्माभिमानी यांच्यासाठी मार्गदर्शक आहे. या लेखात हिंदु राष्ट्राविषयी पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे. हिंदु राष्ट्र सर्व मानवजातीसाठी आहे. ते धर्म, पंथ, जात, वंश यांच्या पलीकडे असून पृथ्वीवरील सर्व जीवमात्रांचे पालनपोषण करणारे आणि त्यांची उन्नती करून घेऊन त्यांना मोक्षाला नेणारे आहेे. हाच प.पू. गुरुमाऊलीचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) खरा उद्देश आहे.
२. पुरोगामी आणि निधर्मीवादी लोकांशी
वादविवाद करण्यापेक्षा कृष्णाच्या मार्गदर्शनाचा वापर करणे
त्रेतायुगामध्ये सर्वत्र चैतन्य भरलेले होते. त्यामुळे सीतेच्या शोधात निघालेल्या प्रभु रामचंद्राचे दर्शन झाल्यावर झाडांनाही अत्यानंद होत असे. स्वत:कडील पिकलेली फळे भगवंताला अर्पण करून झाडे मुक्त होत असत. सध्या कलियुगात तथाकथित पुरोगामी आणि निधर्मवादी लोक अल्पसंख्यांकाचे लांगूलचालन करून देशातील बहुसंख्यांकांचा छळ करत आहेत. अशा लोकांशी वादविवाद करण्यात किंवा बचावात्मक भूमिका घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही. इथे कृष्णाचे मार्गदर्शन उपयोगाचे आहे.
३. सुधारणा आणि जागतिकीकरणाच्या नावाखाली
निसर्गदेवतेचा दुरुपयोग आणि अधोगतीचा नीचांक थांबवणे
पृथ्वीतलावरील प्रत्येक जिवाची काळजी घेणारा केवळ सनातन हिंदु धर्मच आहे. हीच निसर्गाचे संरक्षण करणारी, पूजा करणारी आणि काळजी घेणारी जीवनशैली आहे. झाडे, नद्या, पर्वत, प्राणी इत्यादी सर्वकाही पवित्र असून चैतन्याने ठासून भरलेले आहेत. हेच निसर्गदेवतेचे स्थूल रूप आहे. पूर्वी मनुष्य निसर्गाच्या नियमानुसार वागत असल्याने तो समाधानी आणि आनंदी होता. अलीकडे सुधारणा आणि जागतिकीकरणाच्या नावाखाली आपण निसर्गदेवतेचा दुरुपयोग करत आहोत. तिची लूट करून आणि तिला प्रदूषित करून निसर्गाचा ठेवा नष्ट करत आहोत. आम्हीच आमचा नाश ओढवून घेत आहोत. विश्वभरात केवळ सनातन हिंदु धर्माची संस्थापना करून आपण हा अधोगतीचा नीचांक थांबवू शकतो.
प.पू. पांडे महाराज यांचा प्रत्येक शब्द ही ज्ञानामृतवाणी असून हिंदु राष्ट्रासाठी तो एक अभ्यासक्रम असेल. त्यातून चैतन्यमय आणि धार्मिक नागरिक निर्माण होऊन देवत्वाची पुनर्निर्मिती होईल.
– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२४.१२.२०१७)