संत कबीर गुरूंच्या प्रतीक्षेत होते. त्यांनी वैष्णव संत स्वामी रामानंद यांना गुरु मानले; मात्र स्वामी रामानंद यांनी कबिरांना शिष्य मानण्यास नकार दिला. तेव्हा संत कबिरांनी मनोमन ठरवले की, स्वामी रामानंद पहाटे ज्या वेळी गंगास्नानास जातील, तेव्हा मी त्यांच्या मार्गात पायर्यांवर पडून राहीन. त्याप्रमाणे एकदा पहाटे ते स्वामी रामानंद यांच्या मार्गात पंचगंगा घाटावरील पायर्यांवर पडून राहिले. स्वामी रामानंद स्नानास जातांना रात्रीच्या अंधारामुळे त्यांना पायर्यांवर पहुडलेले कबीर दिसले नाहीत. त्यांचा कबिरांना पाय लागला. त्याच वेळी स्वामींच्या मुखातून राम-राम, असे शब्द बाहेर पडले. त्यालाच कबीर यांनी गुरुमंत्र मानले. नंतर त्या रामभक्तीतून त्यांच्याकडून अद्वितीय आणि भक्तीरसपूर्ण दोह्यांची निर्मिती झाली.