गुरुकुलांप्रमाणे असलेल्या आश्रमांची निर्मिती

Article also available in :

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना
साधनेसाठी अनुकूल वातावरण मिळण्यासाठी आश्रमांची निर्मिती करणे

साधकांना पूर्णवेळ साधनेला अनुकूल वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी गुरुकुलासम आश्रमांची निर्मिती केली आहे. त्यांच्या प्रेरणेतून रामनाथी (गोवा), देवद (मुंबई), मिरज (सांगली) आदी ठिकाणी असलेल्या आश्रमांतून अनुमाने ८०० साधक पूर्णवेळ साधना करत आहेत.

या आश्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे आश्रमात रहाणारे सर्व साधक विविध योगमार्गानुसार साधना करणारे आणि जातीपंथांचे असूनही आनंदाने अन् प्रेमाने सहजीवन जगतात. आज भारतात कधी नव्हे एवढा जातीद्वेष निर्माण झाला असूनही सनातनच्या आश्रमांतील जातीनिरपेक्षता ठळकपणे दिसणारी आहे. प्रत्येक जण अन्य साधकाकडे ‘गुरुबंधू’ वा ‘गुरुभगिनी’ या भावाने पहातो. त्यामुळे सनातन आश्रम हे शेकडो सदस्यांचे एक कुटुंबच बनले आहे. ईश्वरप्राप्तीच्या ध्येयामुळे एकसंध समाज निर्माण करता येतो आणि रामराज्याची अनुभूती घेता येते, याचे प्रात्यक्षिकच परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनच्या आश्रमांतून दाखवून दिले आहे.

 

आ. सनातनच्या विविध आश्रमांत चालू असलेले राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित कार्य

आ १. सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा

येथे ‘सनातन संस्थेचे’ मुख्यालय आहे.

आ १ अ. सनातन प्रभात नियतकालिकांचे कार्यालय

येथील संपादक, वार्ताहर, दैनिकांच्या पानांची संगणकीय रचना करणारे, विज्ञापने आणणारे, मुद्रणालयात गठ्ठे बांधणारे किंवा दैनिकाच्या वसुलीचे कार्य करणारे साधक राष्ट्र आणि धर्म यांच्या वैचारिक संरक्षणासाठी विनावेतन समर्पित भावाने सेवारत आहेत.

आ १ आ. संकेतस्थळ (वेबसाईट) विभाग

माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतलेले, तसेच विविध महत्त्वाच्या पदांवरील मोठ्या वेतनाच्या नोकर्‍यांचा त्याग केलेले युवा साधक स्वयंस्फूर्तीने हिंदु धर्मसार करणारी सनातनची संकेतस्थळे चालवत आहेत. त्यांनी धर्मावरील श्रद्धेपोटी ही संकेतस्थळे आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची बनवली आहेत.

आ १ इ. ग्रंथ-निर्मिती विभाग

या विभागात परात्पर गुरु डॉक्टर संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी आणि बंगाली भाषांतील आवृत्त्यांची निर्मिती होते. या विभागात विद्यार्थ्यांपासून ७० वर्षांपर्यंतच्या सर्व वयोगटांतील साधक टंकलेखन, संकलन, मुद्रितशोधन, संगणकीय रचना आदी सेवा करतात.

आ १ ई. कला – विभाग

या विभागात साधारणतः २० साधक-कलाकार ‘कलेसाठी कला’ नव्हे, तर ‘ईश्‍वराप्तीसाठी कला,’ हा दृष्टीकोन ठेवून देवतांची सात्त्विक चित्रे आणि मूर्ती, सात्त्विक रांगोळ्या, सात्त्विक मेंदी आणि सात्त्विक देवनागरी अक्षरे यांची निर्मिती करत आहेत.

आ १ उ. सनातन कलामंदिर

हिंदूंची दूरचित्रवाहिनी चालू करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या या विभागात ध्वनीचित्रीकरण करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे २ ‘स्टुडिओ’, तर ध्वनीचित्र संकलन (व्हिडिओ एडिटिंग) करण्यासाठी १० कक्ष आहेत.

आ १ ऊ. आध्यात्मिक संशोधन विभाग

येथे हिंदु संस्कृतीचे श्रेष्ठत्व आणि अध्यात्माचे महत्त्व सिद्ध करणारे संशोधन वैज्ञानिक उपकरणांद्वारे केले जाते.

आ १ ए. आध्यात्मिक संग्रहालय

सूक्ष्म जगताची प्रचीती देणारे आणि आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतन करणारे हे जगातील एकमेव संग्रहालय आहे.

आ १ ऐ. सनातन साधक-पुरोहित पाठशाळा

या पाठशाळेत अध्ययन केलेले विद्यार्थी-पुरोहित सतत साधना म्हणून धर्मरक्षणासाठी धार्मिक विधी आणि यज्ञयाग करत आहेत.

आ १ ओ. यज्ञशाळा

येथे सतत धर्मरक्षणासाठी यज्ञयाग केले जातात.

आ २. सनातन आश्रम, देवद, पनवेल, जिल्हा रायगड, महाराष्ट्र

येथे पुढील कार्यालये आणि विभाग कार्यान्वित आहेत.

अ. दैनिक ‘सनातन प्रभातच्या’ मुंबई आवृत्ती आणि पश्‍चिम महाराष्ट्र आवृत्ती यांचे कार्यालय

आ. सनातनच्या ग्रंथांचा साठा, मागणी आणि पुरवठा केंद्र

इ. सनातनच्या पूजोपयोगी आणि नित्योपयोगी सात्त्विक उत्पादनांचे वितरण केंद्र

आ ३. सनातन आश्रम, मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र

येथून सांगली जिल्ह्यातील धर्मप्रसाराचे कार्य चालते.

 

इ. भविष्यकाळातील नियोजन – वृद्ध
झालेल्या साधकांसाठी सर्वत्र वानस्थाश्रमांची स्थापना करणे

ज्या साधकांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि साधना केली, अशांचे मन वृद्धपणी मुलाच्या घरी राहून नातवंडांशी खेळणे, घरात चालू असलेले दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे, मायेतील गप्पागोष्टी करणे इत्यादींत रमत नाही. त्यांना अध्यात्म, साधना यांविषयी बोलणे आणि साधना करणे हे सोडून अन्य सर्व नकोसे वाटते. अशा साधकांच्या सोयीसाठी प्रथम भारतातील प्रत्येक राज्यात आणि पुढे प्रत्येक जिल्ह्यात ‘वानस्थाश्रम’ स्थापन करण्याचे ध्येय ठरवले आहे. ज्या साधकांनी आयुष्यभर साधना केली, त्यांची शेवटच्या श्‍वासापर्यंत काळजी घेणे आणि त्यांना साधनेत मार्गदर्शन करणे, हा यामागील हेतू आहे.

Leave a Comment