प्रेमळ आणि प.पू. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असलेल्या जोधपूर, राजस्थान येथील पू. (सौ.) सुशीला मोदी (वय ६५ वर्षे) !

श्री. प्रणव मणेरीकर यांना पू. (सौ.) सुशीला मोदी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री. प्रणव मणेरीकर

१. प्रेमभाव

अ. आम्ही सुशीलाभाभींच्या घरी गेल्यावर त्या आम्हाला अतिशय प्रेमाने तुम्ही कसे आहात ?, असे विचारतात. आम्हाला वेळेवर जेवण देतात आणि आमची सर्व प्रकारे काळजी घेतात.

आ. त्यांची प्रत्येक कृती प्रेमभावयुक्त असते.

 

२. झोकून देऊन तळमळीने सेवा करणे

२ अ. उतारवयातही झोकून देऊन सेवा करणे

त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना सांगतात, तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुम्ही एवढी सेवा आणि धावपळ कशासाठी करता ?, तरीही त्या या वयातही झोकून देऊन सेवा करतात. माझ्याकडून ही सेवा कशी होईल ?, हा विचार त्यांच्या मनात कधीही येत नाही.

२ आ. प्रतिकूल वातावरणात एकटीने बाहेर जाऊन सेवा करणे

राजस्थानमधील जोधपूर येथे तापमान पुष्कळ असते. तेथील वातावरणात बाहेर जाऊन सेवा करणे अतिशय कठीण आहे, तरीही त्या सातत्याने सेवेसाठी बाहेर जात असतात. सेवेसाठी आपल्यासमवेत कुणीतरी असावे, असे त्या कधीच म्हणत नाहीत. कुणी नसले, तरी त्या एकट्याच सेवेसाठी जातात.

२ इ. त्यांच्यातील तळमळीमुळेच जोधपूरमध्ये प्रत्येक मासात (महिन्यात) पाक्षिक सनातन प्रभातसाठी पुष्कळ विज्ञापने मिळतात.

२ ई. सुशीलाभाभींनी सनातन प्रभातचे १५० हून अधिक वर्गणीदार बनवले आहेत.

२ उ. ध्येय ठेवून सेवा करणे

त्या प्रत्येक सेवा ध्येय ठेवून करतात. गुरुपौर्णिमा, उज्जैन येथील सिंहस्थपर्व आणि अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यांसाठी विज्ञापन अन् अर्पण यांचे जे ध्येय ठेवले होते, ते त्यांनी तळमळीने पूर्ण केले.

३. कुटुंबियांना साधनेसाठी प्रोत्साहन देणे

        घरी त्यांच्या सुनांकडून साधनेचे प्रयत्न अल्प होतात. आपल्या दोन्ही सुनांची साधनेत प्रगती व्हावी, यासाठी त्या त्यांना अतिशय प्रेमाने सांगत असतात आणि त्यांना सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देतात.

 

४. चुकांविषयी खंत वाटणे

        त्यांच्याकडून सेवेत झालेल्या चुकांविषयी त्या स्वतः भ्रमणभाष करून सांगतात. त्यांना त्यांच्याकडून होणार्‍या चुकांविषयी पुष्कळ खंत वाटते. त्या कधी कधी त्यांच्या घरातील फलकावर स्वत:च्या चुकाही लिहितात.

 

५. उपायांचे गांभिर्य

प्रतिदिन घरातील कामे आणि सेवा करूनही त्या न चुकता २ घंटे उपाय आणि नामजप पूर्ण करतात.

६. घरातील समस्यांकडे साक्षीभावाने पहाणे

        त्यांच्या यजमानांची प्रकृती बरी नसते. त्याविषयी त्यांना काळजी वाटत नाही. गुरुदेव सर्व पहात आहेत आणि तेच सर्व करणार आहेत, असा त्यांचा भाव असतो. घरातील सर्व समस्यांकडे त्या साक्षीभावाने पहातात.

        सुशीलाभाभींमध्ये असलेल्या वरील गुणांमुळे इतर साधकांनाही साधना करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यांचा उत्साह वाढतो.

– श्री. प्रणव मणेरीकर, देहली (५.७.२०१६)

कु. पूनम चौधरी यांना पू. (सौ.) सुशीला मोदी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१. शिकण्याची वृत्ती

        एकदा मी सत्संगात सेवेशी संबंधित काही सूत्रे सांगितली. तेव्हा पू. सुशिलावहिनींनी ते सूत्र आणखी खोलवर समजून घेण्यासाठी मला लगेच भ्रमणभाष करून यासाठी तू कसे प्रयत्न करतेस ?, असे विचारले.

२. सेवा चांगली होण्याची तळमळ

        पू. वहिनींशी जेव्हा जेव्हा माझे बोलणे होते, तेव्हा तेव्हा त्यांचा सेवा आणखी चांगली होण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, असा विचार असतो.

३. समष्टी साधना करतांनाही व्यष्टी साधनेकडे लक्ष असणे

        समाजातील व्यक्तींना संपर्क करतांना पू. वहिनींची सतत प्रार्थना आणि नामजप चालू असतो आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना अतिशय कृतज्ञता वाटते.

४. प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक रहाणे
आणि ईश्‍वराने साहाय्य कसे केले, याचाच विचार करणे

        समाजात प्रसारासाठी गेल्यावर कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरीही त्या त्याचा विचार करत नाहीत. उलट ईश्‍वराने प्रसाराच्या सेवेत कसे साहाय्य केले, याविषयी त्या चिंतन करतात. राजस्थानमध्ये सेवा करण्यात मला अडचणी येत होत्या. तेव्हा पू. वहिनींनी मला सकारात्मक राहून प्रयत्न कसे करायचे, ते सांगितले.

५. संयम ठेवून चिकाटीने अध्यात्मप्रसार करणे

        एकदा पू. वहिनी एके ठिकाणी अध्यात्मप्रसारासाठी गेल्या होत्या. तेव्हा तेथील लोकांनी पू. वहिनींना रागावून परत पाठवले; पण पू. वहिनींच्या मनात त्यांच्याविषयी कोणताही विकल्प आला नाही. काही कालावधीने पू. वहिनी पुन्हा त्यांच्या घरी गेल्या आणि त्यांना आपलेसे केले. त्यानंतर त्या लोकांनी नियमितपणे अर्पण देणे चालू केले.

६. गुरुधनाचा विचार करणे

        एकदा पू. वहिनींना एक सामानाचे पुडके (पार्सल) दुसर्‍या गावी पाठवायचे होते. त्या वेळी त्यांनी मला काही प्रवासी वाहनांचे (ट्रॅव्हल्सचे) संपर्क क्रमांक दिले. मी त्यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांतील एकाने ते पुडके विनामूल्य नेऊन पोचवले. यामागे पू. वहिनींचा गुरुधन वाचावे आणि त्यासमवेतच समाजातील जिज्ञासूंचाही त्याग व्हावा, असा विचार होता.

– कु. पूनम चौधरी, जोधपूर, राजस्थान.

 

कु. कृतिका खत्री यांना पू. (सौ.) सुशीला मोदी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

कु. कृतिका खत्री

१. सहजता

        सुशीलावहिनींचे वय अधिक असूनही त्या आपल्यापेक्षा मोठ्या आहेत, हे त्यांच्या वागण्यातून कधीही लक्षात येत नाही. त्या नेहमी सहजतेने वावरतात.

२. प्रेमभाव

२ अ. इतरांना साहाय्य करणे : कार्यशाळेच्या कालावधीत आम्ही दोघी निवासासाठी एकाच खोलीत रहात होतो. एकदा मी साडीची घडी न करता तेथेच ठेवून बाहेर गेले. तेव्हा त्यांनी ती घडी करून ठेवली. एकदा माझ्याकडून पाणी सांडले, तेव्हा त्यांनी ते स्वतःच पुसले. यामध्ये चूक माझीच होती, तरीही त्यांनी तत्परतेने कोणतीही प्रतिक्रिया न देता साहाय्य केले.

२ आ. नम्रतेने बोलणे : कोणत्याही विषयावरील एखादे सूत्र त्यांच्या लक्षात आले, काही शिकायला मिळाले किंवा चूक लक्षात आली, तरीही त्या इतक्या नम्रतेने ते दुसर्‍यांना सांगतात की, समोरच्या साधकांकडून ते सूत्र लगेच स्वीकारले जाते.

२ इ. प्रेमभाव : त्या सर्व साधकांवर प्रेम करतात. त्यांची प्रत्येक कृती आणि वागणे यांतून त्यांचा इतर साधकांविषयीचा प्रेमभाव लक्षात येतो.

३. तळमळ

        सर्व साधकांची जलद प्रगती व्हावी, अशी त्यांना तळमळ असते.

४. गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा

        जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या सेवा असतात; पण गुरुदेवांवरील अतूट श्रद्धेमुळे ग्रंथप्रदर्शन लावणे, सनातन प्रभात पाक्षिकांचे वितरण करणे, पंचांग वितरण, वही वितरण, अर्पण गोळा करणे, अशा विविध सेवा त्या एकट्याच करतात. त्यांची मुले आणि सुना त्यांना तुम्हाला एकट्याने एवढे सगळे कसे होईल ?, असे म्हणतात. यावर त्यांचे ईश्‍वरच सगळे करवून घेतो आणि तोच माझी काळजी घेतो, हे एकच उत्तर असते. जशी मीराबाईची श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा होती, तशीच त्यांचीही आहे, असे वाटते.

सुशीलाभाभी ने स्वयंका कल्याण किया कृष्णका नाम जपकर ।
जिस राजस्थान में कृष्णकी मीरा हुई है ।
वही अब सुशीलाभाभी होती है ॥
स्वयंका कल्याण किया कृष्णका नाम जपकर ।
राजस्थान में अब कर रही है धर्मप्रसार ॥

प.पू. गुरुमाऊलींच्या प्रेमळ सुशीलाभाभींना सनातन परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

– कु. कृतिका खत्री, देहली सेवाकेंद्र (५.७.२०१६)

Leave a Comment