रांगोळीच्या आकारांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली काही सूत्रे

१. गतीदर्शक स्वस्तिकापेक्षा स्थिर स्वस्तिकाकडे पाहून आनंद वाटणे

‘अ’मधील स्वस्तिकाच्या वळणदार आकारांमुळे ते गतीदर्शकता दर्शवते. त्याकडे बघितल्यावर मन अस्थिर होते. ‘आ’मधील स्वस्तिक स्थिर आहे. त्याकडे पाहून आनंददायी वाटते. वास्तवात गतीदर्शक असलेले आकार (उदा. चक्र) काढतांना त्यांच्या मूळ गतीदर्शक स्वरूपात काढू शकतो; मात्र स्थिरतेचे प्रतीक असलेले स्वस्तिक, ॐ (निर्गुण) हे आकार स्थिर वाटतील, असेच काढावेत.

 

२. मध्यभागी एक पाकळी असलेल्या फुलाकडे पाहून उत्साह वाटणे

आकृती ‘अ’मध्ये फुलात मध्यभागी उभी रेष काढल्यास तिच्या आजूबाजूला दोन पाकळ्या असल्याने फूल निष्क्रीय वाटते. त्यामुळे ते चांगले वाटत नाही. आकृती ‘आ’ मधे फुलात मध्यभागी उभी रेष काढल्यास मध्यभागी एकच पाकळी असल्याने ‘फूल कार्यरत आहे’, असे वाटते. त्यामुळे त्याकडे पाहून उत्साह वाटतो.

३. टोकेरी पाकळ्यांपेक्षा वक्राकार पाकळ्यांचे कमळ सात्त्विक !

आकृती ‘अ’मध्ये कमळाच्या पाकळ्यांचे आकार टोकेरी आहेत. अशा पाकळ्या नैसर्गिक वाटत नाहीत. आकृती ‘आ’मध्ये कमळाच्या पाकळ्यांची टोके वक्राकार केली आहेत. तसेच कमळ त्रिमितीय दाखवले आहे. आकृतीतील पाकळ्यांमुळे कमळाचा नैसर्गिक गोलाकार लक्षात येतो. परिणामी ते सत्यतेच्या अधिक जवळ जाते.

४. अर्ध्या फुलापेक्षा पूर्ण फुलातून चांगली स्पंदने येणे

‘आकृती ‘अ’मध्ये अर्धे फूल मधून कापल्यासारखे दिसते. त्यामुळे त्यातून चांगली स्पंदने येत नाहीत. आकृती ‘आ’मध्ये पूर्ण फूल असल्यामुळे ते वास्तव वाटते. त्यामुळे ते बघायला चांगले वाटते आणि त्यातून चांगली स्पंदने येतात. या फुलाकडे बघून काहींना भावाची आणि त्या संदर्भातील देवतेच्या तत्त्वाची अनुभूतीही येते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment