सूक्ष्म-चित्रकलेच्या माध्यमातून अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि
चित्रकलारूपी तेजाकडून ज्ञानरूपी आकाशाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
जगामध्ये अनेक कला महाविद्यालये आहेत; परंतु कोणत्याही कला महाविद्यालयामध्ये अध्यात्माच्या संदर्भातील शिक्षण दिले जात नाही. ‘कला म्हणजे नेमके काय ?’ ‘कलांची निर्मिती कशी झाली ?’ ‘त्यांचे किती प्रकार असतात आणि आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व काय ?’, याचे शिक्षण कोणत्याही कला महाविद्यालयांमध्ये दिले जात नाही. मग कला म्हणजे केवळ आपली कल्पकता आपल्या कलाकृतीमध्ये उतरवणे आणि ती केवळ सर्वांसमोर सादर करणे, हाच एका कलाकाराच्या जीवनाचा उद्देश होतो.
सध्या कलाकारांची कल्पकता इतकी वाढली आहे की, प्रत्येक गोष्टीमधून कलाकार कलाकृती घडवतांना दिसतात. प्रत्येक घटकातून कला साकारण्यात येते. या कलेचे सादरीकरण करतांना कलाकार कलेच्या मागील मूळ उद्देश विसरतो. कलेला अध्यात्माची जोड देणे, म्हणजेच सर्वव्यापी ईश्वराच्या ‘कला’ या एका अंगाला स्पर्श करण्यासारखे आहे. कला हे ईश्वरप्राप्ती करण्याचे एक माध्यम आहे. ज्या कलेतून ईश्वराशी अनुसंधान साधले जाते, तीच खरी कला आहे. आधुनिक कलाकारांच्या दृष्टीने कला म्हणजे निव्वळ ‘कलेसाठी कला’; परंतु ज्या कलेमुळे साधकत्व जागृत होऊन साधक विकासाला प्रवृत्त होतो, तीच खरी कला होय. कोणतीही कला ईश्वरप्राप्तीसाठी असली पाहिजे. जेव्हा कलावंत एखाद्या वस्तूच्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचा आविष्कार करतो, त्या वेळी सौंदर्यासह सात्त्विकताही निर्माण होते. चित्रकला, मूर्तीकला, शिल्पकला, नाट्यकला, पाककला इत्यादी कोणत्याही क्षेत्रातील कलाकाराने कलेकडे केवळ कला आणि सौंदर्य या दृष्टीने न पहाता तिच्यातील सात्त्विकता शिकून ‘ती स्वतःमध्ये कशी येईल ?’, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
एखाद्या अनोळखी रस्त्यावरून जातांना ज्याप्रमाणे आपल्याला कुणालातरी विचारतच जावे लागते, कुणीतरी मार्गदर्शक हा लागतोच, त्याचप्रमाणे अध्यात्मात प्रगती करण्यासाठी संत आणि गुरु यांची आवश्यकता असते. कला महाविद्यालयात शिक्षण घेऊनही जे शिक्षण मिळाले नव्हते, ते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाने प्राप्त झाले. त्यांनी कला शिक्षणाचे ‘ईश्वरप्राप्ती’ हे मुख्य ध्येय असल्याने क्षणोक्षणी ईश्वररप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करण्यावर भर दिला.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या विविध क्षेत्रांतील कार्यांप्रमाणे कला क्षेत्रामध्येही त्यांचे कार्य अद्वितीय आहे. गेली ३० वर्षे आध्यात्मिक दृष्टीकोनातून कला विश्वा्तील विविध सकारात्मक आणि नकारात्मक अशा अतींद्रिय शक्तींचा वेध घेणे अथवा त्यांची प्रत्यक्षता-अप्रत्यक्षता पडताळणे आदी माध्यमांतून कला अन् अध्यात्म यांची सुरेख सांगड घालून जगाला कलेच्या भाषेत अध्यात्म सांगण्याचे अमूल्य कार्य परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी केले. कलाक्षेत्रामध्ये अनेक कलांपैकी ‘चित्रकला’ या कलेमध्ये त्यांनी केलेले संशोधन आणि मार्गदर्शन इतके विपुल आहे की, त्यावरून आपल्याला अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्याची प्रत्यक्ष अनुभूती येते.
या लेखात त्यांच्या चित्रकलेतील सूक्ष्म चित्रकलेच्या संदर्भातील संशोधन कार्याच्या संदर्भातील काही वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
आकृत्या
एखाद्या विषयाचे योग्य प्रकारे आकलन होण्यासाठी चित्रांचा आधार घेतला जातो. अशा चित्रांना ‘आकृत्या’ असे म्हणतात. अशी चित्रे बुद्धीच्या स्तरावर काढलेली असतात. साधारण पाठ्यपुस्तकांत विषयाला जोडून ज्या आकृत्या असतात, त्यांचा या गटात समावेश होतो. एखादा सूक्ष्मातील विषय समजावून सांगण्यासाठीही अशा चित्रांचा वापर होतो. आता आपण सूक्ष्म आणि सूक्ष्म चित्र या विषयाची थोडक्यात ओळख करून घेऊया.
१. सूक्ष्म चित्रकला किर्लियन छायाचित्रापेक्षा १ लक्ष पटींनी सूक्ष्म असणे
‘क्ष-किरणांनी काढलेले चित्र नेहमीच्या छायाचित्रापेक्षा सूक्ष्म स्तरावरचे असते. सूक्ष्म चित्रे त्याहीपेक्षा अनेक पटींनी सूक्ष्म स्तरावर असतात. ‘सूक्ष्म चित्रकला म्हणजे काय ?’, याची थोडीफार कल्पना किर्लियन छायाचित्रावरून येऊ शकते. किर्लियन छायाचित्र म्हणजे व्यक्तीची प्रभावळ (आध्यात्मिक वलय) किंवा जीवनशक्ती यांचे छायाचित्र. आपल्यापैकी प्रत्येकाभोवती वलय किंवा प्रभावळ जन्मभर असते. नुसता मनुष्यप्राणीच नव्हे, तर पशू-पक्षी, मासे, वनस्पती, दगड इत्यादी सर्वांभोवती वलय असते. वलय म्हणजे एक प्रकारची ऊर्जा. ही ऊर्जा किंवा शक्ती आपल्या कुंडलिनीचक्राशी जोडलेली असते. ‘ती विद्युत्-चुंबकीय क्षेत्रासारखी आहे’, असे समजले जाते. ‘आपण कसे आहोत ? कुठे आहोत ? आणि आपली सध्याची मनःस्थिती कशी आहे ?’, हे सारे या वलयात प्रतिबिंबित होत असते. सूक्ष्म चित्रकला किर्लियन छायाचित्रापेक्षा १ लक्ष पटींनी सूक्ष्म आहे.
२. सूक्ष्म चित्रे आणि सूक्ष्म परीक्षणे या शब्दांचे अर्थ
सूक्ष्म चित्रे म्हणजे डोळ्यांनी न दिसणाऱ्यां अदृश्य गोष्टींची सूक्ष्म दृष्टीने काढलेली चित्रे आणि सूक्ष्म परीक्षणे म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन अन् बुद्धी यांच्या वापराविना सूक्ष्म पंचज्ञानेंद्रिये, सूक्ष्म कर्मेंद्रिये, सूक्ष्म मन अन् सूक्ष्म बुद्धी यांच्या साहाय्याने किंवा साहाय्याशिवाय जीवात्मा किंवा शिवात्मा यांनी केलेली परीक्षणे. येथे सूक्ष्म चित्रांच्या संदर्भात दिलेली बहुतेक माहिती सूक्ष्म परीक्षणांच्या संदर्भातही लागू पडते; कारण बहुधा सूक्ष्म चित्रे सूक्ष्म परीक्षणांवरूनच काढलेली असतात. पुढील तात्त्विक माहिती या लेखात दिलेल्या सूक्ष्म चित्रांचा अभ्यास करण्यास उपयुक्त ठरेल. सूक्ष्म चित्रे स्पंदने, लाटा, वलये, लहरी, किरण, प्रकाश इत्यादी अनेक रूपांत दिसतात. या सर्वांना येथे ‘स्पंदने’ हा शब्द वापरला आहे. सूक्ष्म कर्मेंद्रियांना ज्ञान मिळण्याची प्रक्रिया ‘अतींद्रिय ज्ञान ग्रहण होण्याची प्रक्रिया’ या आगामी ग्रंथात दिली आहे.
३. सूक्ष्म चित्रांचे महत्त्व
छायाचित्रकलेचा शोध लागण्याआधी चित्रकलेला पुष्कळ महत्त्व होते. ‘किती हुबेहूब चित्र काढले आहे !’, असे उद्गार चांगल्या चित्राच्या संदर्भात पूर्वी अनेकदा ऐकू येत असत. छायाचित्रकलेचा शोध लागल्यावर छायाचित्र हुबेहूब येत असल्याने चित्रकलेचे महत्त्व न्यून झाले. मानवाला सातत्याने नवनवीन गोष्टींचा, सूक्ष्माचा शोध घ्यायला आवडते; म्हणूनच अणू नंतर परमाणू, त्यानंतर न्यूट्रॉन; तसेच जंतू, सूक्ष्म जंतू इत्यादी शोधांची मालिका चालूच आहे. त्याचप्रमाणे मानवाला आता भुते इत्यादी सूक्ष्मातील जगताला जाणून घ्यायची ओढ निर्माण झाली आहे. सूक्ष्म चित्रांमुळे ती ओढ थोड्या-फार प्रमाणात भागेल आणि सूक्ष्म जगत् जाणून घ्यायची जिज्ञासा आणखी निर्माण होईल. असे करता करता मानव एक दिवस सूक्ष्मातीसूक्ष्म ईश्वराचा शोध घ्यायचा विचार आणि त्या दृष्टीने प्रयत्न करू लागेल. मगच मानव खऱ्यां अर्थाने खऱ्यांच सुखाकडे, म्हणजे आनंदाकडे वाटचाल करू लागेल.
४. प्रत्येकाची आध्यात्मिक पातळी,प्रकृती आणि त्याचा (साधना) मार्ग यांनुसार साधना करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
व्यष्टी साधना करणाऱ्यां संतांची ‘केवळ श्रद्धावंतांसाठीच अध्यात्म’ ही संकल्पना असते; परंतु समष्टी साधना करणाऱ्यां संतांचे मात्र तसे नसते. समष्टी संत ‘समाजातील प्रत्येक घटकाला काय आवडते ? त्याला कशा पद्धतीची साधना सांगितली, म्हणजे तो साधनेला लागेल ?’, याचा विचार करून त्याच्यासाठी त्याच्या परिभाषेत अध्यात्म सांगण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये आध्यात्मिक पातळी, प्रकृती आणि त्याचा साधनामार्ग यांनुसार ते साधना सांगत असतात अन् त्या मार्गाने त्या त्या साधकाची आध्यात्मिक प्रगतीही करवून घेत असतात. साधना करणाऱ्यांत आणि कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेल्या काही साधिकांमध्ये सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असल्याचे अन् त्यांची त्या मार्गाने आध्यात्मिक प्रगती होणार असल्याचे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या लक्षात आले. त्या वेळी त्यांना प्राप्त असलेल्या चित्रकलेचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी त्यांनी फ्रान्स येथील साधिका सौ. योया वाले, तसेच कु. मधुरा भोसले, कु. अनुराधा वाडेकर आणि कु. प्रियांका लोटलीकर या सूक्ष्म चित्रकार साधिकांना सूक्ष्म-जगताविषयी मार्गदर्शन करून त्यांची सूक्ष्म चित्रांच्या माध्यमातून साधना करवून घेऊन त्यांची प्रगतीही करवून घेतली. या मार्गाने साधना करून फ्रान्स येथील साधिका सौ. योया वाले आणि कु. अनुराधा वाडेकर या संत झाल्या. (कु. प्रियांका लोटलीकर यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. – संकलक) कालांतराने सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर या समष्टी स्तरावर प्रसाराची सेवा करू लागल्या. या साधिकांनी काढलेली सूक्ष्म चित्रे ही समष्टीसाठी एक देणगीच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म-चित्राची एक अमूल्य देणगी तर दिलीच, तसेच ‘साधिकांना कसे घडवले ?’, हे हेही पुढे लेखात आपण पहाणार आहोत.
५. सूक्ष्म चित्रातील दिसणार्या स्पंदनांचे परात्परगुरु डॉ. जयंत आठवले यांनी शिकवलेले अर्थ आणि त्यांचे कार्य
५ अ. सूक्ष्म कण हे निर्गुणाला जवळचे असणे, तर लहरींमध्ये सगुणातून कार्य करण्याची ओढ अधिक असणे : ‘देवतांची उत्पत्ती ही तेजतत्त्वजन्य असते. सूक्ष्म कण हे निर्गुणाला जवळचे असतात, तर लहरींमध्ये सगुणातून कार्य करण्याची ओढ अधिक असते.
५ आ. कणांची प्रवृत्ती ही स्थिर होण्याकडे अधिक असते, तर लहरींची प्रकृती गतीमानता अवलंबण्याकडे अधिक असते.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील प्रक्रिया सांगतांना सूक्ष्म चित्रातील लहरी ओळखण्यास शिकवणे
‘एखादे सूक्ष्म चित्र काढतांना बहुतांश वेळा त्या सूक्ष्म चित्रातील घटकांच्या, उदा. शक्ती, भाव, चैतन्य, आनंद, शांती यांच्या संदर्भातील विचार मनात येतो. सूक्ष्म चित्र काढतांना जेव्हा कागदावर आकार रेखाटण्याची कृती चालू असते, तेव्हा काही क्षणासाठी आजूबाजूला घडत असणार्या घटनांचा विसर पडतो. त्या वेळी चित्रासाठी दिलेल्या विषयाच्या संदर्भात (देवाकडून) येत असलेले विचार मनात येतात आणि ते कागदावर उमटवण्याची (रेखाटण्याची) कृती घडते.
६ अ. चित्रासाठी दिलेल्या विषयाच्या संदर्भात प्रत्यक्ष चित्र दिसते. देवाकडून येत असलेले विचार मनात येतात.
६ आ. चित्राच्या संदर्भात शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या घटकांची अनुभूती येणे : काही वेळा चित्राच्या संदर्भात शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या घटकांची अनुभूती येते अन् त्यावरून ‘चित्रातील घटक कोणता आहे ? आनंद आहे कि शक्ती आहे ?’, हे निश्चित होते. या संदर्भातील काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. एखाद्या गोष्टीकडे पाहिल्यावर देहात उष्णता निर्माण होते. तेव्हा त्या वस्तूमध्ये तेजतत्त्वाचे किंवा मारक शक्तीचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते.
२. एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आनंद जाणवतो आणि आपल्या तोंडवळ्यावरही हास्य उमटते. त्यावरून त्या व्यक्तीमध्ये आनंदाचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते.
३. कधी कधी एखाद्या गोष्टीकडे पाहिल्यावर प्रारंभी थोडा वेळ चांगले वाटते; मात्र काही वेळानंतर त्रास होऊ लागतो. तेव्हा त्या गोष्टीतून मायावी आणि चांगल्या स्पंदनांचे प्रक्षेपण होत असल्याचे जाणवते. हे जाणवण्याच्या संदर्भात घडते; मात्र या मायावी लहरी कागदावर दाखवण्यास त्यांना बुद्धीच्या स्तरावर रंग दिला जातो; कारण जाणवण्याचा भाग कागदावर दाखवू शकत नाही. त्यामुळे तेथे आपोआप बुद्धी वापरली जाते.
४. कधी एखाद्या गोष्टीत प्रत्यक्षात ते रंग दिसतात. त्यावरून, उदा. ‘ते चैतन्य आहे’, हे निश्चित होते.
बहुतांश वेळा या सर्व कृती एकत्रितच होतात. ज्याप्रमाणे आई हातात हात घेऊन आपल्याला लिहायला शिकवते, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ब्रह्मांडातील ‘सूक्ष्मातीसूक्ष्म घटकांना कसे ओळखायचे ?’, हे आम्हाला शिकवले.
७. बुद्धीच्या पलीकडील विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्या स्तरावरील सूक्ष्म चित्र रेखाटण्यास परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे.
७ अ. सूक्ष्म चित्रकाराच्या क्षमतेनुसार त्याची सूक्ष्म चित्रे काढण्याची पद्धत : प्राणी, पशू, पक्षी, मनुष्य आणि देवता या सर्वांची आपली स्वतःची एक भाषा असते. त्याप्रमाणे कलेमध्ये आकृतीबंधाचीही भाषा असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘अध्यात्मशास्त्राला अनुसरून खरी प्रकाशभाषा (आकृतीबंधाची भाषा) कशी असते ?’, ते शिकवले. ९० टक्क्यांपेक्षा जास्त पातळीच्या उन्नतांनाच त्यांची सूक्ष्म दर्शनेंद्रियाची क्षमता चांगली असेल आणि त्यांची इच्छा असेल, तरच ती प्रकाशभाषा समजू शकते; मात्र सनातनच्या अनुमाने ५० टक्के पातळीच्या साधकांनीही सूक्ष्म चित्रे काढली आहेत. विविध आध्यात्मिक पातळीच्या साधकांना निरनिराळ्या प्रकारच्या प्रकाशभाषा येतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म-चित्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन करून कला आणि आध्यात्मिक क्षेत्राला सूक्ष्म जगताची ओळख पटवून दिली.
७ आ. सूक्ष्मातील कळण्यासाठी साधकाला विश्वमन आणि विश्वबुद्धी यांवरच अवलंबून रहायला शिकवणे : सूक्ष्मातील जाणण्याच्या कोणत्याही प्रकारात साधकाला मिळालेल्या माहितीची किंवा दिसलेल्या दृश्याची अचूकता ‘त्या साधकाचे त्या वेळी ईश्वराशी किती अनुसंधान आहे ?’, यावर अवलंबून असते. सूक्ष्मातील कळणे माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचे असते. त्यामुळे त्यासंदर्भातील उत्तरे ईश्वरालाच विचारावी लागतात. साधकाची एकाग्रता आणि तळमळ यांनुसार ईश्वर उत्तरे देतो. याला ‘विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याकडून उत्तरे मिळणे’, असे म्हणतात. त्यामुळे ‘साधकांनी सूक्ष्मातील कळण्यासाठी सातत्याने ईश्वराच्या अनुसंधानात रहायला हवे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवले.
७ आ १. विश्वमनामुळे स्पंदनांचा प्रकार, तर विश्वबुद्धीमुळे त्यामागचे कारण कळणे : मनाला स्पंदने जाणवतात, तर बुद्धीने त्यामागील कारण कळते. विश्वमनामुळे साधकाला स्पंदनांचा प्रकार कळतो, तर विश्वबुद्धीमुळे त्यामागचे कारण कळते, उदा. एखाद्या वस्तूकडे बघून चांगली स्पंदने जाणवतात, ते विश्वमनामुळे आणि ‘ती संतांच्या सहवासातील वस्तू आहे’, हे विश्वबुद्धीमुळे कळते. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या मडक्याला आकार देतो, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म चित्रकारांच्या सूक्ष्म दृष्टीला आकार देऊन साकारण्यास प्रारंभ केला. परात्पर गुरु डॉ. आठवले अनोळखी अशा सूक्ष्म विश्वामध्ये घेऊन जाऊन आम्हाला स्पंदनांचे प्रकार, वैशिष्ट्ये आणि कार्य शिकवत असत.
७ इ. स्पंदने कळण्यासाठी सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची आवश्यकता असणे : अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. स्वानुभूतीतून ते आत्मसात करता येते. अध्यात्मातील एखादी गोष्ट शब्दांतून व्यक्त करायला कठीण असते. देवाचे आणि परमेश्वराचे वर्णन करतांना ‘श्रुतीही (वेद आणि उपनिषदेही) ‘नेति नेति’ म्हणजे ‘तो (परमेेश्वर) हा नव्हे, तो हा नव्हे’, असे म्हणतात, असे अवधूत गीतेत (अध्याय १, श्लोक २५) सांगितले आहे. व्यवहारातीलही एखादी गोष्ट शब्दांतून एकाने दुसर्याला सांगतांना प्रत्येक वेळी १० टक्के एवढा भाग न्यून होत जातो, उदा. सांगणार्याने विचार शब्दांत मांडतांना १० टक्के भाग न्यून होतो. ऐकणार्याने ते विचार समजून घेतांना १० टक्के आणि दुसर्याला सांगतांना १० टक्के भाग न्यून होतो. असे होत जाते. प्रश्न बुद्धीच्या स्तरावरील असल्यामुळे त्याला मर्यादा येतात आणि त्यामुळे उत्तरांनाही मर्यादा येतात, म्हणजेच बुद्धी अन् ज्ञानेंद्रिये यांनाही मर्यादा असतात. यासाठी सूक्ष्म ज्ञानेंद्रिय सक्षम असावे लागते.
आपण बुद्धीने विचार करत असल्यामुळे ते शब्दांत मांडू शकतो, तर भावना या मनापेक्षा, म्हणजे विचारांपेक्षा सूक्ष्म असल्यामुळे शब्दांत मांडतांना कठीण जाते. स्पंदने कळायला सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची आणि मांडायला सूक्ष्म मन अन् बुद्धी यांची आवश्यकता असते.
७ ई. टप्प्याटप्प्याने पुढचे सूक्ष्म परीक्षण करणे : प्राथमिक टप्प्याला एखादी वस्तू, व्यक्ती अथवा विधी यांचे सूक्ष्म चित्र अथवा परीक्षण त्या ठिकाणी जाऊन केल्यास सूक्ष्म चित्रातील सत्यतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे विविध विधी, यज्ञ आणि संतांच्या वास्तू या ठिकाणी जाऊन परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्म चित्र अन् सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगत असत; कारण एखाद्या ठिकाणी न जाता परीक्षण केल्यास परीक्षण चुकण्याची शक्यता अधिक असते; परंतु साधनेमुळे जसजशी प्रगती होत गेली, तशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकांना काळाच्या पलीकडे कळण्यास प्रारंभ झाला. सूक्ष्म चित्रकार साधकांनी काही सूक्ष्म चित्रे व्यक्ती किंवा वस्तू समोर असतांना काढलेली आहेत, काही छायाचित्रे किंवा ध्वनी-चित्रचकत्या पाहून काढली आहेत, तर काही न पहाता काढली आहेत.
७ उ. एखाद्या वस्तूचे सूक्ष्म चित्र सहस्रो कि.मी. अंतरावरूनही काढता येणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक मूलभूत नियम आहे; म्हणूनच सूक्ष्म चित्र काढतांना विषयाचे स्मरण केले (शब्द) किंवा त्याचे रूप आठवले, तरीही त्याच्याशी संबंधित स्पंदने कळतात, दिसतात किंवा त्या विषयाची माहिती मिळते. या नियमाच्या आधारेच साधक-चित्रकाराला स्थळाच्या पलीकडे जाऊन सहस्रो कि.मी. अंतरावरूनही सूक्ष्म चित्रे काढता येतात.
७ ऊ. सूक्ष्म चित्रकाराला काळाच्या पलीकडे जाऊन चित्र काढता येणे : एखादी घटना आणि तिचे परीक्षण यांमध्ये जास्त काळ गेल्यास वातावरणातील त्या घटनेची स्पंदने न्यून होत जातात. त्यामुळे चित्राची सत्यता न्यून होते. साधक-चित्रकाराची स्पंदने ग्रहण करण्याची क्षमता जास्त असेल, तरच काही काळानंतरही त्या विषयाची योग्य स्पंदने जाणून तो तसे चित्र नंतरही काढू शकतो. उच्च आध्यात्मिक स्तराच्या संतांच्या संदर्भात काळाची कोणतीच मर्यादा नसते. सूक्ष्म चित्रकाराला पहिल्या टप्प्यात जवळचा भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांतील माहिती अचूकतेने मिळते, तर पुढच्या टप्प्याला अगदी गतजन्माची माहितीही कळू शकते.’
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वयविद्यालय, गोवा. (२९.४.२०१६)