सनातनचा साधक श्री. प्रशांत चंदरगी याच्याकडे देवपूजेसाठी फुले आणण्याची सेवा असतांना तो फुलांची परडीत अनेक प्रकारे सुंदर रचना करत असे. फुलांची कलात्मक दृष्टीने रचना करणे, ही ६४ कलांपैकी एक कला गणली जाते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांना जीवनातील प्रत्येकच कृती कलात्मकरित्या आणि सत्यम्, शिवम् अन् सुंदरम् करण्याची जणू सवयच लागली आहे.