परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या
उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !
१. प्रस्तावना आणि उद्देश
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ‘मृत्यूंजय यज्ञ’ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे यज्ञ करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले स्वत: या यज्ञासाठी उपस्थित राहू न शकल्याने त्यांचे छायाचित्र ठेवण्यात आले. ‘मृत्यूंजय यज्ञाचा त्यांच्या छायाचित्रावर काय परिणाम झाला ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ११, १२ आणि १३.१२.२०१६ या दिवशी गोव्यातील सनातन आश्रमात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
२. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत यज्ञापूर्वी आणि यज्ञानंतर यज्ञकुंड आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र यांचे ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाद्वारे निरीक्षण करण्यात आले. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती
३ अ. मृत्युंजय यज्ञ
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ‘मृत्युंजय यज्ञ’ करण्यास सांगितले. त्यानुसार ११, १२ आणि १३.१२.२०१६ या दिवशी गोव्यातील सनातन आश्रमात हा यज्ञ करण्यात आला.
३ आ. यज्ञकुंड
हे यज्ञकुंड आश्रमाच्या स्वागतकक्षासमोरील परिसरात आहे. येथे यापूर्वीही अनेक यज्ञ झाले आहेत.
३ इ. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची प्राणशक्ती पुष्कळ अल्प असल्याने ते स्वत: यज्ञाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे छायाचित्र यज्ञामध्ये ठेवण्यात आले. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, या उद्देशाने मृत्युंजय यज्ञ करण्यात आला. त्यामुळे ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यासंबंधित शक्ती, हे एकत्र असतात’, या अध्यात्मशास्त्रीय सिद्धांतानुसार जो परिणाम त्यांच्या देहावर होत होता, तोच परिणाम यज्ञाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या छायाचित्रावर होत होता. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या छायाचित्राची चाचणी करण्यात आली.
४. ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे
४ अ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख
या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. ‘वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात.
४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण
४ आ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.
अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजतात.
आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा मोजतात.
४ आ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.
४ आ ३. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.
४ इ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत : चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ‘४ आ ३’ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.
वस्तूतील किंवा वास्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरमध्ये प्रथम ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास ‘भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?’, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ ‘त्या वस्तूभोवती ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ नाही’, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.
५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता
अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.
आ. उपकरण हाताळणार्या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.
६. ‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’ उपकरणाद्वारे यज्ञकुंड
आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र यांची केलेली निरीक्षणे
६ अ. सारणी १ – यज्ञकुंड
६ आ. सारणी २ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र
टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही’, असा होतो.