परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्‍वराचा अवतार ! – श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी, श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्र, बंटवाळ (कर्नाटक)

सनातच्या ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतांना श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी

बंटवाळ (कर्नाटक) : ‘समाजाला आध्यात्मिक शिक्षण देऊन साधक आणि संत यांची निर्मिती करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे ईश्‍वराचा अवतारच आहेत अन्यथा अशी अद्भुत संस्था स्थापन करणे शक्यच नाही’, असे गौरवोद्गार बंटवाळ तालुक्यातील कन्यानच्या कणियुरू येथील श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्राचे श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी यांनी काढले. श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भेट घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. राज्यांतील देवस्थानांमध्ये लावलेले धर्मफलक आणि ग्रंथप्रदर्शन स्वामीजींनी पाहिले होते. त्यामुळे संस्थेच्या साधकांनी भेटावे, अशी इच्छा स्वतः स्वामीजींनी यापूर्वी व्यक्त केली होती. भेटीच्या वेळी स्वामीजींनी सनातनवरील संभाव्य बंदीविषयीची माहितीही जाणून घेतली.

सनातनचे ग्रंथ पाहून स्वामीजी प्रभावित झाले. सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगितल्यावर पुष्कळ चांगले असल्याचा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला.

हिंदु जनजागृती समिती समाजासाठी निरपेक्षपणे कार्य करत आहे !

हिंदु जनजागृती समितीचे परिचय पत्रक पाहून स्वामीजी म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य स्तुत्य आहे. सध्या सर्वजण आपल्या राजकीय लाभासाठी कार्य करत असतांना समिती मात्र निरपेक्षतेने कार्य करत आहे.’’

या वेळी त्यांना सनातन संस्थेचा साधनामार्ग आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य, यांविषयी विस्ताराने सांगण्यात आले. या वेळी सनातनचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते श्री. केशव गौड, श्री. लोकेश आणि श्री. रमेश उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment