सनातन पंचांगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे. ही माहिती न पटल्याने एका वाचकाने त्याविषयी प्रतिक्रिया कळवली होती. त्याचे खंडण येथे देत आहे.
I had installed this app. But after reading your article about Chatrapati Shivaji Maharaj, i uninstalled it. Dadoji kondev was NOT guru to maharaj. He worked for Shahaji Maharaj. (छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती शहाजीराजे यांनी केली होती. इतिहासात त्याचे अनेक दाखले आहेत. निवळ ब्राह्मणद्वेषापायी हे सत्य नाकारणार्यांना काय म्हणायचे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) his statue was rightfully removed from lal mahal. Also Maharaj never distinguished between hindu muslim or any other religion. His first general was a muslim.
(१. छत्रपतींच्या सैन्यात मुसलमानांची संख्या अत्यंत नगण्य म्हणजे १-२ टक्के होते. त्याचा बाऊ कशाला ? छत्रपतींआधी हिंदु सरदार मुसलमान आक्रमणकर्त्यांच्या दावणीला बांधलेले होते. छत्रपतींनी मुसलमानांना नोकरीला ठेवून म्हणजेच त्यांना सेवक बनवून एका नवा पायंडा पाडला.
२. जेव्हा जिवाची बाजी लावून किल्ले हस्तगत करायची वेळ होती, अथवा एखादी जोखमीची मोहीच असो, त्या वेळी शिवाजी महाराजांनी मराठी मावळ्यांवर विश्वास टाकला, हे संभाजी ब्रिगेडवाले का विसरतात ?
३. छत्रपतींसाठी जिवाची बाजी लावणारे हंबीरराव मोहिते, बाजीप्रभु देशपांडे, नेताजी पालकर, तानाजी मालसुरे यांचा इतिहास सर्वज्ञात आहे. छत्रपतींच्या या कथित मुसलमान सेनापतींनी काय दिवे लावले, हेही त्यांची महती गाणार्यांनी सांगावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
Also Maharaj took a muslim guru named yakub baba. (छत्रपती शिवाजी महाराजांना निधर्मी रंगवण्यासाठी इतिहासाचे आणखी किती विकृतीकरण करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) The reason was because he wanted communal harmony between everyone. (छत्रपतींना धार्मिक एकोपा हवा होता, हे मान्य; मात्र त्यासाठी त्यांनी धर्मांधांचे लागूंलचालन कधीच केले नाही. छत्रपती पाच पातशहांशी लढले आणि त्यांनी हिंदु रयतेला अभय दिला. ते हिंदूंचे तारणहार होते. छत्रपती नसते, तर सर्वांची सुंता झाला असती, या विख्यात काव्यपंक्ती त्याच अनुषंगाने लिहिल्या आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) to know Maharaj,u have to UNDERSTAND his history. (इतिहास समजून घ्यायचा म्हणजे काय करायचे ? पुरुषोत्तम खेडेकर, श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेला खोटा इतिहास प्रमाण मानायचा, असे मुसलमानप्रेमींना वाटते का ? छत्रपती हे हिंदूंचे राजे होते आणि त्यांनी हिंदुहितासाठीच कार्य केले, हा इतिहास आहे. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही, हे निधर्मीवाद्यांनी जाणावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)