एक वेळ विम्याला पर्याय असेल; पण सनातनला नाही ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

श्री. विद्याधर नारगोलकर

सनातन प्रभात प्रतिदिन वाचल्याने दिसणारी गोष्ट, भेटणारा माणूस आणि घडणारी घटना या प्रत्येकावर क्षणात विचार करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, असा अनुभव आहे; कारण सनातन प्रभातमध्ये प्रत्येक घटनेवरील भाष्य ठळक शब्दांत दिलेले असते.

सनातनने आजपर्यंत केलेल्या कार्याची किंमत कधीही पैशांच्या रूपात सांगितली नाही आणि साधकांना मोहाकडे विचलित केले नाही. हे सर्व करतांना आपली भगवंताची उपासना सतत चालू ठेवावी, हा समर्थांचा आग्रह सनातन कटाक्षाने पाळत आहे.

उपासनेचा मोठा आश्रयो ।
उपासनेवीण निराश्रयो ।
उदंड केली तरी तो जयो ।
प्राप्त नाही ॥ श्रीराम ॥

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, गुणसुमने वेचलिया या भावे । की तिने सुगंधा व्हावे । जरी उद्धरणी व्यय तिचा न हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ॥ याप्रमाणे सनातन प्रभातची वाटचाल आहे. यासाठी आपणास शतशः प्रणाम ! सनातन प्रभातला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

अंतिम एकच सत्य आहे, एक वेळ विम्याला पर्याय असेल; पण सनातनला पर्याय नाही !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment