अनुक्रमणिका
- १. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा साधनाप्रवास
- १ अ. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंनी दिलेले ज्ञान
- १ आ. भारतभर प्रवास करून अनेक संतांना सनातन संस्थेशी जोडणे आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळवून संतपदाला पोहोचणे
- १ इ. सप्तर्षींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून सद्गुरुपदी आरूढ झालेल्या पू. गाडगीळकाकू !
- १ ई. प्रवास आणि यज्ञयाग, अनुष्ठाने यांच्या माध्यमातून सहस्रो जिवांना मुक्त करून त्यांना मोक्षाच्या मार्गाकडे नेणे आणि साधकांचे रक्षण करून त्यांना दृढतेने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने घेऊन जाणे
- २. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा दैवी प्रवास
१. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा साधनाप्रवास
‘पू. गाडगीळकाकू (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) भगवान शिवाच्या निस्सीम भक्त असून त्यांच्याच कृपादृष्टीने त्यांनी साधनाप्रवासाला आरंभ केला.
१ अ. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंनी दिलेले ज्ञान
भगवान शिव ही ‘नादोपासना’ आणि ‘ज्ञानोपासना’ यांची अधिष्ठात्री देवता आहे. हे दोन्ही आकाशतत्त्वाशी संबंधित आहेत; मात्र ‘नादोपासना’ ही व्यष्टी साधनेशी, तर ‘ज्ञानोपासना’ ही समष्टी साधनेशी संबंधित आहेे. पू. काकूंच्या साधनेचा प्रवास ‘साधक’ ते ‘शिष्य’ असा झाला.
१ आ. भारतभर प्रवास करून अनेक संतांना सनातन संस्थेशी
जोडणे आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळवून संतपदाला पोहोचणे
पू. गाडगीळकाकू यांनी भारतभर प्रवास करून अनेक संतांना सनातन संस्थेशी जोडले. सर्व संतांना ‘पू. काकू त्यांच्यापैकीच एक आहेत’, असे वाटल्याने त्यांनी पू. काकूंना भरभरून आशीर्वाद दिले. संतांशी जवळीक झाल्यामुळे ते संत संस्थेशी आणि संस्थेच्या कार्याशी जोडले गेले.
१ इ. सप्तर्षींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून
सद्गुरुपदी आरूढ झालेल्या पू. गाडगीळकाकू !
पू. गाडगीळकाकू यांनी संपूर्ण भारतभर अहर्निश प्रवास केला आहे. त्यांच्या अखंड प्रवासाच्या कालावधीत सप्तर्षींनी त्यांना त्यांच्या कवेत घेतले. आता सप्तर्षि त्यांना आपली ‘ऋषीकन्या’ मानतात आणि त्यांना प्रेमाने ‘कार्तिकपुत्री’ असे संबोधतात. सप्तर्षींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून पू. गाडगीळकाकू सद्गुरुपदी आरूढ झाल्या.
१ ई. प्रवास आणि यज्ञयाग, अनुष्ठाने
यांच्या माध्यमातून सहस्रो जिवांना मुक्त करून त्यांना मोक्षाच्या मार्गाकडे नेणे
आणि साधकांचे रक्षण करून त्यांना दृढतेने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने घेऊन जाणे
रामावताराच्या वेळी श्रीरामाच्या चरणस्पर्शाने अगालिकामाता (अहिल्यामाता) पावन झाल्या. आता महालक्ष्मीरूपी सद्गुरु काकूंच्या चरणस्पर्शाने संपूर्ण भारताला लाभ होत आहे. सद्गुरु काकू दुर्गम अशा स्थळांना भेटी देत आहेत, कमालीच्या विषम हवामानाला सामोर्या जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात विधी, यज्ञयाग, अनुष्ठाने अन् पूजा-अर्चा करत आहेत. त्याद्वारे एकीकडे त्या सहस्रो जिवांना मुक्त करून त्यांना मोक्षाच्या मार्गाकडे नेत आहेत, तर दुसरीकडे साधकांचे रक्षण करून त्यांना दृढतेने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने घेऊन जात आहेत.
‘हे परमेश्वरा, हे सर्व केवळ तुझ्या कृपाशीर्वादामुळेच शक्य होत आहे. तू आम्हाला सद्गुरु काकूंचे दर्शन, सत्संग, ज्ञान आणि त्यांचे अस्तित्व यांचा लाभ करून देऊन आमच्यावर कृपा केली आहेस. या कृपावर्षावाबद्दल आम्ही तुझ्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– सौ. उमा रविचंद्रन, चेन्नई (२३.१२.२०१६)
२. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा दैवी प्रवास
‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा प्रवास, हा सर्वसाधारण प्रवास नसून तो दैवी प्रवास आहे’, असे महर्षींनी सांगितले आहे. संगम वाङ्मयात भूमीचे (जमिनीचे) पुढील ५ प्रकार दिले आहेत.
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केल्याने त्यांचे चरणकमल या पाच प्रकारच्या भूमीला लागले आहेत. त्याद्वारेे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्राचा आरंभ आणि साधकांचे रक्षण यांसाठी वातावरणाची शुद्धी केली आहे. या ५ अधिष्ठात्री देवता लवकरच स्थापित होणार्या ईश्वरी राज्यासाठी कार्यरत झाल्या आहेत.’ – सौ. उमा रविचंद्रन, चेन्नई (५.२.२०१७)