संगीत चिकित्सेमुळे दुर्धर आजारांवर उपचार करणे शक्य !

पुणे येथील वाद्यसाधक पं. मिलिंद तुळणकर जलतरंग
आणि अन्य वाद्ययंत्रांच्या माध्यमातून करतात रोग्यांवर उपचार!

उज्जैन (मध्यप्रदेश) : संगीताच्या सुरांमुळे कोमा आणि कर्करोग यांसारख्या दुर्धर आजारांवरही उपचार करण्यास साहाय्य होते. जलतरंग आणि अन्य वाद्ययंत्रांच्या माध्यमातून पुणे येथील वाद्यसाधक पं. मिलिंद तुळणकर गेल्या १३ वर्षांपासून अशा प्रकारच्या रोगांनी पीडित रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही चिकित्सा त्यांनी भारतासह अन्य १५ देशांमधील ३ सहस्रांहून अधिक लोकांनाही शिकवली आहे.

१. पुणे येथील एका आस्थापनात उच्चपदावर कार्यरत असलेल्या ७० वर्षीय व्यक्तीला स्मृतीभ्रंशाचा आजार झाला होता. त्यांच्यावर पं. तुळणकर संगीत चिकित्सेच्या माध्यमातून मागील ४ मासांपासून उपचार करत आहेत. ती व्यक्ती आता पं. तुळणकर यांना ओळखू लागली आहे. ते हार्मोनियमवर गीतेही वाजवू लागले आहेत. संगीत चिकित्सेमुळे लहानपणी शिकलेले सूर त्यांना आठवू लागले आहेत.

२. पुणे येथील एक २५ वर्षीय व्यक्ती कोमात गेली होती. तिला जवळपास २० दिवस जलतरंगासह अन्य वाद्ये ऐकवण्यात आली. आता ती व्यक्ती कोमातून बाहेर आली आहे.

३. पं. तुळणकर यांच्या मते, भारतीय शास्त्रीय संगीत एक वैज्ञानिक संगीत आहे. संगीताची स्मृती नष्ट होत नाही. ती मृत्यूनंतरही व्यक्तीच्या सोबत जाते.

संगीत चिकित्सा आणि आरोग्य यांचा संबंध

मेंदूमुळे शरीर नियंत्रित होते. संगीताचा थेट संबंध मेंदू आणि मन यांच्याशी असतो. हळूवार संगीत हे मनाला शांती देते. त्यामुळे रक्तदाब आणि अनिद्रा या आजारांमध्ये हळूवार संगीत सर्वाधिक उपयोगी ठरते. मानवी शरीराची रचना अशा तर्‍हेने बनली असते की, ते संगीताच्या सुरांना लवकर स्वीकारते. सकाळी हळूवार शास्त्रीय संगीताची द्रुत लय ऐकली, तर रक्तप्रवाह मध्यम होतो.

(संदर्भ : दैनिक भास्कर)

Leave a Comment