संस्कृतला ‘मृत भाषा’ ठरवणार्यांना सणसणीत चपराक !
प्रत्येक घरात माहिती आणि तंत्रज्ञान अभियंता
संस्कृत भाषा केवळ सात्त्विकच नव्हे, तर ती आधुनिक तंत्रज्ञानामध्येही प्रगती करण्यासाठी लाभदायी आहे, हे मात्तूर या गावाच्या उदाहरणावरून सिद्ध होते.
शिमोगा (कर्नाटक) : जिल्ह्यातील मात्तूर गावची भाषा संस्कृत असून या गावचे मूळ रहिवासी असलेले ३० प्राध्यापक बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरू येथील विद्यापिठांमध्ये संस्कृतचे अध्यापन करत आहेत. विशेष म्हणजे या गावात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता आहे.
मात्तूर येथील ब्राह्मण समुदाय अनुमाने ६०० वर्षांपूर्वी केरळमधून येथे आला आणि येथेच स्थायिक झाला. येथील पुजार्यापासून ते भाजी विक्रेत्यापर्यंत प्रत्येक जण संस्कृत भाषेशी जोडला गेलेला आहे. तरुण मुले अगदी मैदानावर खेळतांनाही संस्कृत भाषेतच बोलतात. ‘आपण या घरात संस्कृत बोलू शकता’, असे या गावातील अनेकांच्या घरांच्या दारावरच लिहिलेले आढळते. ‘संस्कृतमध्ये पुढे असलेल्या येथील मुलांना गणित आणि अन्य विषयांतही याचा लाभ होतो’, असे येथील शिक्षकांनी सांगितले. संस्कृत, तमिळ, कन्नड आणि तेलुगु या भाषांपासून निर्माण झालेली ‘संकेती’ ही दुर्मिळ भाषाही येथे बोलली जाते.