आज असलेल्या विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने….
१. पाश्चिमात्यांकडून भारताला ‘सांस्कृतिक-अनाथालय’ बनवण्यात
आले असून त्या कामी आपलीच काही वृत्तपत्रे सर्वस्व पणाला लावून कार्यरत असणे
‘साम्राज्यवादी इंग्रज भारतात आपला जम बसवू लागल्यावर ते भारतियांना उद्देशून म्हणाले होते, ‘आम्ही तुमच्यासारख्या असभ्य लोकांना सभ्य बनवण्यासाठी तुमच्या देशात आलो आहोत.’ मात्र या वेळी ते सांगत आहेत, ‘आम्ही तुम्हा दरिद्री लोकांना साहाय्य करण्यासाठी आणि या देशाला समृद्ध बनवण्यासाठी येत आहोत.’ लक्षपूर्वक ऐका ! आम्ही ज्या भांडवलशाहीच्या प्रवाहाचा आरंभ करत आहोत, तो प्रवाह तुमच्या देशात समृद्धी आणील; परंतु वास्तविक पहाता ते आपल्या देशाला समृद्ध नव्हे, तर एकप्रकारे ‘सांस्कृतिक-अनाथालय’ बनवण्याची कपटनीती आखत आहेत. हळूहळू ते आपली भाषाशैली आणि विविध प्रांतीय भाषा नष्ट करत आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांचा हा उद्देश यशस्वी करण्यासाठी आपलीच काही वृत्तपत्रे सर्वस्व पणाला लावून कार्यरत आहेत.
२. काही इंग्रजाळलेल्या हितचिंतकांनी हिंदी भाषेचा र्हास हा
भारताच्या सामाजिक अन् आर्थिक हितासाठी आवश्यक असल्याचे सांगणे
इंग्रजांच्या बौद्धिक चतुरपणाचे वर्णन करतांना एका लेखकाने लिहिले आहे, ‘इंग्रजांचे वैशिष्ट्य म्हणजे ते एखादी गोष्ट लोकांच्या गळी उत्तम प्रकारे उतरवू शकतात.’ त्यांच्या मते, भारतियांनी स्वतःच्या हितासाठी स्वतःला संपवणे आवश्यक आहे, असे आपल्या गळी उतरवून हळूहळू आपल्याला मृत्यूच्या दरीत लोटत आहेत. यामुळे नवीन पिढीचे इंग्रजाळलेले (लेखक) लोक हिंदीला संपवून देशाचा विकास करण्यासाठी कटीबद्ध झाले आहेत. हे काहीही गडबड गोंधळ न होता सहजतेने हिंदी भाषेची हत्या करण्यासाठी अचूक युक्त्यापण सांगतात.
२ अ. हिंदी भाषेची हत्या करण्यासाठी योजलेल्या युक्त्या
२ अ १. ‘प्रोसेस ऑफ काँन्ट्रा-ग्रेज्यूलिज्म’ची युक्ती
हिंदी भाषा कायमची नष्ट करण्यासाठी ‘प्रोसेस ऑफ काँन्ट्रा-ग्रेज्यूलिज्म’ची युक्ती वापरण्यास सांगतात. म्हणजे बाहेरून कोणाला कळणारच नाही की, भाषेला प्रयत्नपूर्वक पालटण्याचा प्रयत्न होत आहे. उलट बोलणार्या व्यक्तीला असे वाटावे की, ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. देशातील काही महत्त्वाच्या वर्तमानपत्रांतील भाषाशैलीतील पालट याच धर्तीवर होत आहेत.
२ अ २. ‘शेयर्ड-व्होकॅबलरी’ भाषा सिद्ध करणे
याचा एक प्रकार म्हणजे कोणत्याही परिस्थितीत दैनंदिन जीवनातील मूळ हिंदी शब्द हटवून तेथे जाणीवपूर्वक इंग्रजी शब्दांच्या वापरास आरंभ करून ते शब्द वर्तमानपत्रातून छापणे. अशी भाषा बोलीभाषेत ‘शेयर्ड-व्होकॅबलरी’ या श्रेणीत मोडते, उदा. रेल, पोस्ट-कार्ड, मीटर इत्यादी.
२ अ ३. हिंदी वृत्तपत्रांद्वारे ‘हिंदी’ला चातुयार्र्ने ‘हिंग्लिश’ बनवले जात असणे
अशा प्रकारे हिंदी वृत्तपत्रांद्वारे ‘हिंदी’ला चातुयार्र्ने ‘हिंग्लिश’ बनवले जात आहे. अज्ञानाने लोक या नियोजित षड्यंत्राला ‘भाषा परिवर्तना’ची प्रक्रिया मानू लागले आहेत. हे सर्व हिंदीच्या संदर्भात घडत आहे.
२ अ ४. हिंदी संपवण्याची शेवटची प्रक्रिया म्हणजे
‘हिंग्लीश’ला रोमन लिपीत छापण्यास प्रारंभ आणि देवनागरी लिपीचा अंत !
भाषेच्या खच्चीकरणाच्या योजनेतील अंतिम टप्पा म्हणजे ‘फायनल असाल्ट ऑन हिंदी !’, असे एका योजनाकाराने म्हटले आहे. हिंदी देवनागरी लिपी वगळून रोमन लिपी छापण्यास प्रारंभ करणे म्हणजेच हिंदीवर शेवटचा प्राणघातक प्रहार करणे ! येथेच हिंदी संपेल. ‘हिंग्लीश’ला रोमन लिपीत छापण्यास प्रारंभ करण्यामागील मूळ उद्देश ‘हिंदी रोमन लिपीमध्ये शिकून मोठे झालेल्या आताच्या पिढीच्या विद्यार्थ्यांना नंतर मूळ हिंदी शब्द (देवनागरीतील) वाचता येणे दुरापास्त व्हावे.’
दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या धूर्त दलालांच्या मार्गदर्शनाखाली जगातील या दुसर्या मोठ्या भाषेची लिपी नष्ट करून तेथे रोमन लिपीची स्थापना करण्याच्या उद्देशाने हिंदीतील अनेक वृत्तपत्रे कामाला लागली आहेत.’
– भारत भक्ती उद्घोष यांच्या सौजन्याने (पाक्षिक ‘पावन परिवार’, १ ते १५ एप्रिल २०११)