देवतांच्या मूर्तीची उंची
९ ते १२ इंच यापेक्षा अधिक उंचीची देवतांची मूर्ती घरातील पूजेसाठी असू नये. दैवतशास्त्राच्या संकेताप्रमाणे यापेक्षा अधिक आकाराच्या मूर्ती या स्वतंत्र मंदिरात स्थापन कराव्यात, असे शास्त्र सांगते.
१. पूजेत न ठेवलेली मूर्ती
पूजन न केलेल्या मूर्तीमध्ये असणारे देवतेचे तत्त्व सगुण स्तरावर पृथ्वी तत्त्वाच्या स्तरावर सुप्त अवस्थेत असते, तसेच या मूर्तीतील देवतेचे चैतन्य आकाशतत्त्वाच्या आधारे मूर्तीमध्ये सुप्तावस्थेतच अंतर्भूत असते.
२. प्राणप्रतिष्ठा केलेली देवतेची मूर्ती
प्राणप्रतिष्ठा केलेल्या देवतेच्या मूर्तीमध्ये देवतेचा प्राणरूपी सूक्ष्म दिव्य तेजांश कार्यरत झालेला असतो. या दिव्य तेजांशामुळे मूर्तीमध्ये पृथ्वी आणि आप या तत्त्वांच्या स्तरावरील सगुण तत्त्व जागृत होऊन मूर्ती तेजाच्या बळावर कार्यरत होऊ लागते. त्याचप्रमाणे मूर्तीमध्ये अंतर्भूत असणार्या आकाशतत्त्वाच्या स्तरावरील सुप्त चैतन्य तेजांशाने युक्त झालेल्या सूक्ष्म-वायूच्या स्पर्शामुळे जागृत होऊन कार्यान्वित होते. अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीमध्ये देवतेचे तत्त्व पंचतत्त्वांच्या स्तरांवर पूर्णपणे कार्यरत होऊ लागते.
३. प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीचे नियमित पूजन करण्याचा नियम कर्मकांडात सांगितलेला असण्यामागील कारण
प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीतील कार्यरत झालेल्या देवतेचे नित्य पूजन करण्याचा नियम कर्मकांडामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे मूर्तीमध्ये कार्यरत झालेले देवतत्त्व दीर्घकाळ जागृत अवस्थेत राहून अखंड कार्यान्वित रहाते. नियमित पूजन केलेल्या देवतेच्या मूर्तीतून देवतेचे तत्त्व तेजतत्त्वाच्या स्तरावर अधिक प्रमाणात प्रक्षेपित होऊ लागते. हे तेज सहन करण्याची क्षमता पूजक आणि मूर्ती यांच्या संपर्कात येणार्या व्यक्तींमध्ये असणे आवश्यक असल्याने शौच-अशौचादी कर्मकांडाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते.
४. विविध उंचीच्या मूर्तीप्रमाणे मूर्ती घरातील देवघरात ठेवणे किंवा मंदिरातील गर्भगृहात स्थापन करणे
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.११.२०१६, रात्री ९.४३)
५. ९ ते १२ इंच उंचीपेक्षा मोठ्या मूर्तीची स्थापना घरातील देवघरात केल्यामुळे होणारी हानी आणि देवळात केल्यामुळे होणारे लाभ
सामान्यपणे घरात वावरणार्या व्यक्तींची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून न्यून असल्यामुळे त्यांना ९ ते १२ इंच उंचीपेक्षा मोठ्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारे तेज-वायु या तत्त्वांवरील उच्च स्तराचे चैतन्य दीर्घकाळ ग्रहण करता येत नसल्यामुळे घाम येऊन घेरी येणे, रक्तदाब अकस्मात् वाढणे किंवा न्यून होणे, तोंडाला कोरड पडून तोंडात उष्णतेचे फोड येणे, यांसारखे विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे ९ ते १२ इंच उंचीपेक्षा मोठ्या मूर्तीची स्थापना घरातील देवघरात न करता देवळात करावी. अधिक तेजस्वी मूर्तीची स्थापना देवळात केल्यामुळे मूर्तीतून प्रक्षेपित होणारे तेजोमय चैतन्य थेट दर्शनार्थीपर्यंत न पोचता प्रथम गर्भागृहात प्रविष्ट होऊन नंतर समोरील दारातून बाहेरच्या सभामंडपाच्या दिशेने प्रक्षेपित होऊ लागते. त्यामुळे तेजोलहरींना टप्प्याटप्प्याने व्यापक स्वरूप प्राप्त होते आणि त्यांतील वायुतत्त्वाचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे सभामंडपातून गर्भगृहाकडे चालत येतांना मूर्तीचे दर्शन घेतल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्रास होत नाही; मात्र देवळातील देवत्व जागृत झालेल्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारी चैतन्यशक्ती दीर्घकाळ अनुभवण्यासाठी व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. अन्यथा आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अल्प असणार्या व्यक्तीला दीर्घकाळ जागृत मंदिरात थांबल्यामुळेही घेरी येणे, अंगाला कंप सुटणे, दरदरून घाम येणे, डोके जड होऊन बधीर होणे, यांसारख्या विविध प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते.
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.११.२०१६, रात्री ९.४५)