काही तथाकथित सुधारणावादी तोकड्या कपड्यांमुळे महिलांवर अत्याचार होतात हे योग्य आहे का ?, घुंगट पद्धत योग्य आहे का ?, असे प्रश्न विचारून हिंदुत्ववाद्यांना मागासलेले ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी खालील सूत्रांच्या आधारे या सुधारणावाद्यांचा प्रतिवाद करावा.
१. जिथे तोकड्या कपड्यातील स्त्रीचे चित्र पाहिले, तरी भावना उद्दीपित होतात, तिथे तोकड्या कपड्यांतील स्त्री समोर असली, तरी भावना उद्दीपित होणार नाहीत, असे म्हणणे ही वैचारिक अज्ञानाची परिसीमा आहे.
द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: दृश्याभावात् विमुच्यते । – योगवासिष्ठ, प्रकरण ३, सर्ग १, श्लोक २२
(अर्थ : द्रष्टा दृश्य पाहिल्याने त्यात बद्ध होऊन जातो. दृश्याचा अभाव असेल, तर तो त्यापासून मुक्त होतो.)
हे तत्त्वज्ञान आपल्या पूर्वज ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी सांगितले आहे. त्यामुळे हिंदु धर्मात महिलांचा पेहेराव कसा असावा हेही निश्तिच केले आहे. ब्रिटनसारख्या देशात आचारधर्मच नसल्याने तेथे स्त्रियांनी तोकडे कपडे परिधान करण्याची विकृती निर्माण झाली. ती विकृती कॉन्व्हेंट शाळांमध्ये जाणार्या मुलींनी मिनी स्कर्ट घालण्यापर्यंत फोफावली. अशा तोकड्या कपड्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये अनैतिकता वाढते, अत्याचार वाढल्याचे लक्षात आल्यावर ब्रिटनमधील शाळांनी मिनी स्कर्टवर बंदी घातली. हे उदाहरण हिंदु संस्कृतीतील पूर्ण अंग झाकणार्या पेहेराव्याचे महत्त्व लक्षात येण्यास पुरेसे आहे.
२. इस्लाममध्ये सुरक्षिततेसाठी स्त्रियांना बुरखा सक्तीचा आहे, तसेच हात आणि पाय यांचे पंजे दिसणार नाहीत, अशी वस्त्रे परिधान करण्याची जाचक सक्ती करण्यात आली आहे. याउलट पाश्चात्त्यांची तोडके कपडे ही संस्कृतीच बनली आहे. हिंदु संस्कृतीतील पेहेराव या दोन्हीचा सुवर्णमध्य आहे. भारतात विविध प्रांतानुसार हिंदु स्त्रियांचा पेहेराव पालटतो; मात्र कोणत्याही प्रांतातील पेहेराव्याच्या पद्धतीत बुरख्यासारखा जाच नाही कि पाश्चात्त्यांसारखी उच्छृंखलता नाही. हिंदु संस्कृतीतील संयमित जीवनपद्धतीची शिकवण हिंदु महिलांच्या पारंपारिक पेहेराव्यातूनही उठून दिसते.
३. हिंदु धर्मातील धार्मिक विधी, संस्कार, आचार आदींचे नीतीनियम प्राचीन ऋषिमुनीनींनी सांगितले आहेत आणि आमच्या पूर्वजांनी सहस्त्रो वर्षांपासून त्यानुसार भक्तीभावाने आचरण केले आहे. त्यामुळे धर्माचरण करणे हा हिंदूंचा अधिकार आहे. बुरख्याच्या आवश्यकतेविषयी कोणी मानसिक, सामाजिक दृष्टीकोनातून विचार करत नाही. तो त्यांचा धार्मिक अधिकार आहे, हे सर्वांनी मान्य केले आहे आणि मुसलमानही त्याविषयी आग्रही असतात. तसेच हिंदूंनी धर्माचरणाशी सुसंगत पेहेराव करण्याविषयी आग्रही रहाणे यात गैर काय ?
तथाकथित सुधारणावाद्यांशी तोकड्या कपड्यांविषयी चर्चा करतांना वरील सूत्रांनुसार प्रतिवाद करणे हा काही हिंदुत्ववाद्यांना मागासलेपणा वाटेल; पण सुधारणावाद्यांप्रमाणे विचार करणे, म्हणजे आपणही त्यांच्याच पंक्तीत जाऊन बसण्यासारखे आहे. त्यामुळे धर्महानी होत असेल, तेव्हा धर्माला अपेक्षित असलेली सूत्रे ठामपणे मांडणे, हे एक मानसिक पातळीवरचे धर्मयुद्ध आहे. कथित सुधारणावाद्यांची री ओडून या धर्मयुद्धात पराजित होऊ नका. सुधारणावाद्यांसमोर स्वत:ची प्रतिमा उजळवण्यासाठी धर्माची (ईश्वराची) बाजू सोडू नका.