श्रीकृष्णाच्या कानात आत्मनिवेदन करत असलेल्या बालसाधिकेचे काढलेले चित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी
श्रीकृष्णाच्या कानात आत्मनिवेदन करत असलेल्या बालसाधिकेचे काढलेले चित्र

१. चित्राची पार्श्‍वभूमी – स्वतः श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करणारी
बालसाधिका असल्याचा विचार येऊन त्या बालसाधिकेचे चित्र काढणे

krushna5
१५.८.२०१३ या दिवशी श्रीकृष्णाच्या चरणी आत्मनिवेदन करणार्‍या साधकांचा मी विचार करत होते. थोड्याच वेळात माझ्या मनात मी एक बालसाधिका असून श्रीकृष्णाच्या कानात आत्मनिवेदन करत आहे, असा विचार आला आणि त्याप्रमाणे मी अनुभवू लागले. त्यानंतर मी श्रीकृष्णाच्या खांद्यावर चढलेल्या आणि त्याचा कान शोधण्याचा प्रयत्न करून कानात काहीतरी सांगू पहाणार्‍या बालसाधिकेचे चित्र काढले.

२. चित्रातून शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. भाव आणि प्रामाणिकपणा असणार्‍या साधकांनी बोलवल्यावर श्रीकृष्ण त्वरित धावून येतो !

श्रीकृष्ण सूक्ष्म रूपात सर्वत्र वास करतो आणि तो प्रत्येक साधकासमवेतही असतो. त्याला कान आहेत आणि तो सर्व ऐकूही शकतो. भाव अन् प्रामाणिकपणा असणार्‍या साधकांनी बोलवल्यावर तो त्वरित येतो.

२ आ. भगवंत सर्वत्र असल्यामुळे आपण त्याच्यापासून काहीच लपवू शकत नाही !

बालसाधिकेतील भाव आणि तळमळ यांमुळे ती प्रामाणिकपणे सर्वकाही श्रीकृष्णाच्या कानात सांगते. तिचा भोळा भाव ओळखून श्रीकृष्णाच्या मुखावर हास्य उमलते. आपण नेहमी प्रामाणिक असले पाहिजे. भगवंत सर्वत्र असल्यामुळे आपण त्याच्यापासून काहीच लपवू शकत नाही, हे यातून शिकायला मिळाले.

२ इ. आत्मनिवेदन केल्यावर आपण भगवंताच्या
अधिक जवळ जात असल्याने तो आपल्याला साहाय्य करतो !

आत्मनिवेदन केल्यावर आपण भगवंताच्या अधिक जवळ जातो. आपण सांगितलेले तो ऐकतो आणि आपल्याला साहाय्यही करतो; परंतु कित्येकदा आपल्याला याची जाणीव नसते. प्रत्येक प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळते आणि भाववृद्धीही होते. भगवंत नेहमी आपल्या अडचणी ऐकून मार्गदर्शन करतो; म्हणून आपण त्याचे ऐकले पाहिजे आणि त्याने सांगितल्याप्रमाणे कृतीही केली पाहिजे.

श्रीकृष्णाच्या आवडीचे लोणी भावपूर्ण आणि एकाग्रतेने बनवणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी श्रीकृष्णाच्या
आवडीचे लोणी भावपूर्ण आणि एकाग्रतेने बनवणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

krushna6
श्रीकृष्ण लहान असतांना त्याला लोणी पुष्कळ आवडत असल्याची कथा मी ऐकली होती. १५.८.२०१३ या दिवशी मला त्या कथेची आठवण झाली. कधी कधी तो शेजारच्या घरातील लोणी चोरूनही खात असे. हे लोणी गायीच्या दुधापासून आणि घरीच बनवलेलेे असल्यामुळे सात्त्विक असायचे अन् त्यामुळेच त्याला ते आवडायचे. कृष्ण आणि गायी यांचे एकमेकांवर पुष्कळ प्रेम होते. श्रीकृष्ण सर्वगुणसंपन्न आणि प्रेमळ असल्यामुळे, तसेच त्याच्याकडून सतत चैतन्य प्रक्षेपित होत असल्यामुळे गायी त्याच्याकडे आकर्षित होत असत. गायी पवित्र असल्यामुळे श्रीकृष्णाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य त्या ग्रहण करू शकत होत्या, तसेच श्रीकृष्ण हा साक्षात् भगवंत असल्याचेही त्यांना कळत होते. त्यानंतर श्रीकृष्णाला लोणी पुष्कळ आवडत असल्यामुळे एक लहान मुलगी त्याच्यासाठी नैवेद्य (लोणी) बनवत आहे, असा विचार अकस्मात् माझ्या मनात आला.

१. त्या मुलीच्या, म्हणजेच बालसाधिकेच्या तुलनेत घडा आकाराने पुष्कळ मोठा असल्याने ती त्याला शिडी लावून चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य दिसले.

२. ती शिडीच्या आधाराने घड्यावर चढून एका मोठ्या रवीच्या साहाय्याने एकाग्रतेने आणि भावपूर्णरित्या ताक घुसळत होती.

३. श्रीकृष्णाला तिच्यातील भाव जाणवला, तसेच लोण्याच्या सुगंधाने तो तेथे आकर्षित झाला.

४. बालसाधिका ताक घुसळत असतांना श्रीकृष्णाने घडा घट्ट धरून तिला साहाय्य केले.

५. तिचा श्रीकृष्णाप्रती असलेला भाव आणि प्रेम तो कौतुकाने न्याहाळत होता. सेवा परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने भाव आणि एकाग्रता कशी असायला हवी ? याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते.

६. समर्पित वृत्तीने केलेली परिपूर्ण सेवा आणि भोळा भाव ईश्‍वराला प्रिय असतो, हे श्रीकृष्णासाठी लोणी बनवणार्‍या मुलीच्या उदाहरणातून मला शिकता आले.

– (पू.) सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (१५.८.२०१३)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment