श्रीकृष्णाला फूल अर्पण करणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी
श्रीकृष्णाच्या चरणकमलांवर वाहिलेल्या फुलावर सुरक्षितपणे झोपलेल्या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

krushna3
१. चित्रातील बालसाधिका श्रीकृष्णाच्या चरणकमलांवर वाहिलेल्या फुलावर झोपली आहे.

२. श्रीकृष्णाच्या चरणकमलांजवळ झोपतांना तिला सुरक्षित वाटून काहीच त्रास जाणवत नाही आणि त्यामुळे ती संपूर्णपणे त्याला शरण गेली आहे.

३. देवाच्या चरणांवर फूल वाहणे, म्हणजे जसे कृतज्ञतापूर्वक शरणागती पत्करण्याचे प्रतीक आहे, तसे साधिकेने श्रीकृष्णाच्या चरणकमलांवर वाहिलेल्या फुलावर झोपणे हेही शरणागतीचे प्रतीक आहे.

४. शरणागती म्हणजे आपले मन श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्पण करणे आणि कृतज्ञताभाव म्हणजे आपण सतत श्रीकृष्णाच्या समवेत असणे होय. कृतज्ञतापूर्वक शरणागत भावाने आपले तन, मन आणि बुद्धी श्रीकृष्णाच्या चरणांशी अर्पण करून साधिका अतिशय श्रद्धेने अन् निर्धास्तपणे त्याच्या चरणांवर वाहिलेल्या फुलावर झोपली आहे.

– (पू.) सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (१५.८.२०१३)

जन्माष्टमीच्या दिवशी काढलेले श्रीकृष्णाकडे, म्हणजेच मोक्षाकडे जाण्याच्या मार्गाचे भावचित्र

krushna4

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी
जन्माष्टमीच्या दिवशी काढलेले श्रीकृष्णाकडे, म्हणजेच मोक्षाकडे जाण्याच्या मार्गाचे भावचित्र

२८.८.२०१३ या दिवशी श्रीकृष्ण जयंती (श्रीकृष्ण जन्माष्टमी) असल्यामुळे मी श्रीकृष्णाच्या आठवणीत रममाण झालेे होते. तो कसा दिसत असेल ? कोणत्या लीला करत असेल ? या विचारांत मी हरवून गेले होते. श्रीकृष्णाच्या विचारात दंग असतांना मला गोपींप्रमाणे वेशभूषा करण्याची इच्छा झाली आणि मी तशी साडीही परिधान केली. त्यामुळे मला उत्साही आणि आनंदी वाटत होते. या गोपीभावात असतांनाच मला सूक्ष्मातून एक दृश्य दिसले.

१. त्यात मला एक छोटासा पाळणा दिसला. पाळण्यात श्रीकृष्णाचे चित्र असून त्याच्या बाजूला सूक्ष्मरूपात श्रीकृष्ण (बाळकृष्ण) बसलेला आहे. पाळण्याला एक लांबलचक दोरी बांधली आहे.

२. श्रीकृष्णाला झोपवण्यासाठी गोप-गोपी ती दोरी ओढून पाळण्याला झोके देत आहेत.

३. त्या वेळी दोरी ओढणार्‍या गोप-गोपींकडे श्रीकृष्ण प्रीतीयुक्त दृष्टीने पहात स्मित करत आहे.

४. दोरी ओढणारे गोप-गोपी म्हणजे साधकच आहेत; कारण साधकांमध्ये गोपीभाव असल्यामुळे ते गोप-गोपींप्रमाणे वाटत आहेत.

५. हा पाळणा हे मोक्षाचे प्रतीक असून पाळण्याला बांधलेली दोरी म्हणजे मोक्षाकडे जाणारा मार्ग आहे.

६. साधकांनी दोरी ओढणे म्हणजे मोक्षप्राप्ती होईपर्यंत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसह अष्टांग साधना करण्याचा प्रयत्न करणे आणि या प्रयत्नांना भावजागृतीच्या अथक प्रयत्नांची जोड देणे होय.

– (पू.) सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (२८.८.२०१३)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment