पू. (सौ.) योया वाले यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी भावचित्रे

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले
यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूतीदेणारी भावचित्रे

पॅरिस, फ्रान्स येथील मॉडेल सौ. योया सिरियाक वाले यांना हिंंदु धर्म, अध्यात्म आणि साधना यांचे महत्त्व पटल्यावर त्यांनी हिंदु धर्मानुसार साधनेला आरंभ केला. स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) या आध्यात्मिक संघटनेच्या माध्यमातून साधना करत ख्रिस्ताब्द २०१३ मध्ये त्यांनी संतपद गाठले.

 

पू. (सौ.) योया वाले
पू. (सौ.) योया वाले

भगवान श्रीकृष्णाप्रती असलेल्या अत्युच्च भावामुळे पू. (सौ.) योया वाले यांना विविध भावचित्रे स्फुरली आहेत. या भावचित्रांच्या चित्रकर्त्या पू. (सौ.) योया वाले या स्वतः संत असल्याने या चित्रांमध्ये भाव आणि चैतन्य अधिक प्रमाणात आहे. ही चित्रे पहाणार्‍या अनेकांना भगवान श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती येते, तसेच नवविधा भक्तीतील शरणागतभाव, कृतज्ञताभाव, श्रद्धा, सेवाभाव, सख्यभाव इत्यादी भाव जागृत होण्यास ही चित्रे साहाय्य करतात. पू. (सौ.) योया यांनी श्रीकृष्णाप्रती असलेले विविध भाव एका बालसाधिकेच्या माध्यमातून या भावचित्रांतून रेखाटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment