सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांना त्यांचे सर्व भक्त बाबा म्हणत. श्री अनंतानंद साईश हे प.पू. बाबांचे गुरु. भजन, भ्रमण अन् भंडारा हे बाबांचे जीवन होते. लक्षावधी कि.मी. प्रवास करून त्यांनी अनेकांना अध्यात्ममार्गाची गोडी लावली. प.पू. बाबांनी १७.११.१९९५ या दिवशी इंदूर येथे देहत्याग केला.
शिष्यावस्थेत भजन हीच बाबांंची साधना होती. गुरुपदावर विराजमान झाल्यानंतर शिष्यांना मार्गदर्शन करण्याचे बाबांचे भजन हे एक माध्यम बनले होते. ही भजने बाबांनी स्वतः रचली, स्वतः त्यांना चाली लावल्या आणि स्वतः गायलेली आहेत. थोडक्यात, प.पू. बाबा स्वतःच भजनांचे रचनाकार, संगीतकार आणि गायक असल्याने ही भजने चैतन्यमय आहेत.
बाबा भजनाच्या एखाद्या ओळीला धरून राधा राधाकृष्ण राधा, विठ्ठल विठ्ठल, हरि ॐ तत्सत्, पावना दत्ता पतितपावना दत्ता अशा सारखी धून मध्ये मध्ये म्हणायचे. त्यामुळे भजनातील ओळीतील शब्दांनी मिळणार्या गायनाच्या आनंदात, नामधुनीच्या लयीचा आनंद मिसळला जाऊन श्रोत्यांचा आनंद द्विगुणित व्हायचा. या नामधून बाबांनी म्हटलेल्या असल्यामुळे भजनाव्यतिरिक्त नुसत्याच ऐकतांनाही तेवढ्याच चैतन्यदायी आहेत.
प्रसंगी बाबा एका भजनात दोन किंवा दोनपेक्षा अधिक नामधून म्हणत. बाबांनी म्हटलेल्या नामधुनीचे वैशिष्ट्य, म्हणजे ते एकच धून वेगवेगळ्या प्रकारे म्हणत. त्यात चाल वेगळी असते, शब्दांत चढ-उतार असतात; पण ऐकत रहावेसे वाटते. नामधून म्हणतांना बाबा मध्येच थांबले, तरी ते वाजवत असलेल्या खंजिरीतून ती नामधून स्पष्ट ऐकू येते. राधा कृष्ण राधा अशासारखी नामधून सलग मिनिटभर ऐकली, तर ध्यान लागल्यासारखे होते, तसेच त्यातील चैतन्याचा लाभ होणे, आनंदाची अनुभूतीयेणे, अष्टसात्त्विकभाव जागृत होणे यांसारख्या अनुभूती येतात.
प.पू. बाबांचे अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्मरण करून आणि त्यांना वंदन करून या नामधून त्यांच्या चरणी अर्पण करत आहोत.
या नामधून डाऊनलोड करण्याची सोय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रस्तावना | १. राम कृष्ण हरि |
२. राधा राधाकृष्ण राधा | ३. राधा राधाकृष्ण राधा, हरि ॐ तत्सत् । |
४. विठ्ठल विठ्ठल | ५. ज्ञानेश्वर माऊली एकनाथ नामदेव तुकाराम |
६. पावना दत्ता पतितपावना दत्ता | ७. हरि ॐ तत्सत् । |