१. सनातनवाले मुलींना पळवतात, असा आरोप करणार्या असुरांनो,
साधना करणार्यांना सनातनचे साधक शेवटपर्यंत साथ देतील, हे लक्षात घ्या !
प.पू. डाॅ. अाठवले
हिरण्यकश्यपूने त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद साधना करतो; म्हणून त्याचा अतोनात छळ केला. अनेक संतांचाही समाजाने छळ केला आहे. त्या परंपरेला अनुसरून कलियुगातील अनेक घरांत असलेले असुर साधना करणार्या बायका-मुलांचा इतका छळ करतात की, त्यांना साधनेसाठी घर सोडण्यास पर्याय नसतो.
ज्याप्रमाणे भक्तांचे रक्षण करण्याचे कार्य भगवंत करतो, त्याप्रमाणे साधनेसाठी घर सोडणार्या साधकांचे रक्षण करण्याचे कार्य सनातन संस्थेचे साधक त्यांची साधना पणाला लावून करतात.
१ अ. नरकासुराचे वंशज सनातनला करत असलेल्या विरोधाचे स्वरूप
१ अ १. चिखल उडवणे (सनातनची बदनामी करणे) !
घर सोडणार्या साधकांना साहाय्य केले किंवा सनातनच्या आश्रमात आश्रय दिला की, असुरांचा थयथयाट चालू होतो. ते पुढील चिखल सनातनवर उडवत रहातात.
अ. सनातनवाले मुलींना पळवतात.
आ. सनातनवाले मुलींना संमोहित करून पळवतात.
इ. ही बदनामी सर्वत्रची नियतकालिके, चित्रवाहिन्या इत्यादी प्रसारमाध्यमांतून केली जाते.
१ अ २. सनातनच्या आश्रमांवर हल्ले करून साधकांना मारहाण करणे
आतापर्यंत देवद आश्रम, मिरज आश्रम आणि रामनाथी आश्रम यांवर देहधारी असुरांनी हल्ले केले आहेत.
१ अ ३. साधकांत दहशत निर्माण करणे
आश्रमासमोरून जातांना आणि साधक दिसल्यावर सनातन बाँब, असे ओरडणे, साधिका रस्त्यावरून जातांना दिसल्या तर अश्लील बोलणे, असे करतात. याची अनेक उदाहरणे आहेत.
१ अ ४. न्यायालयीन दावा
सनातनवाले मुलींना संमोहित करून पळवतात, असा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयात एक दावाही दाखल करण्यात येणार आहे.
२. लहान वयात किंवा मोठेपणी घरदार सोडून सनातनच्या
आश्रमांत येणार्यांची सनातनवर किती श्रद्धा आहे, हे लक्षात घ्या !
अ. आपण कुठे बाहेरगावी जाणार असलो, तर तिकिट, पैसे, कपडे, औषधे इत्यादी सर्व बरोबर घेतले ना, याची खात्री करतो. याउलट घरदार सोडून सनातनच्या आश्रमांत येणार्यांची सनातनवर एवढी श्रद्धा असते की, ते अशा गोष्टींचा विचारही करत नाहीत.
आ. एखाद्या अनोळखी ठिकाणी जायचे असले, तर आपल्या मनात थोडीतरी काळजी असते की, तेथील वातावरण कसे असेल ? तेथे आपल्याला जुळवून घेता येईल का ? इत्यादी; परंतु आश्रमात येण्यासाठी घर सोडणार्यांच्या मनात असा विचार क्षणभरही येत नाही; कारण त्यांची सनातनवर श्रद्धा असते.
३. घरदार सोडून सनातनच्या आश्रमांत येणार्यांची होणारी जलद आध्यात्मिक प्रगती
३ अ. व्यष्टी साधना
साधनेत शेवटी सर्वस्वाचा त्याग करायचा असतो. तो घरदार सोडून सनातनच्या आश्रमांत येणार्यांचा आधीच झालेला असल्याने त्यांची व्यष्टी साधनेत लवकर प्रगती होते.
३ आ. समष्टी साधना
आश्रमात येणारे १० – १२ वर्षांचे असल्यास ५ – ६ वर्षांतच खूप प्रगती होऊन ते वयाच्या १६ – १७ व्या वर्षी जिल्हे आणि २३ – २४ व्या वर्षापासून राज्येही सांभाळू शकतात.
३ इ. व्यष्टी आणि समष्टी साधना
या दोन्ही साधना झाल्यामुळे त्यांच्यातील बरेच जण ७ – ८ वर्षांतच ६० टक्के पातळीच्या पुढे जातात. हे साध्य करायला व्यवहारात असलेल्या साधकांना १५ – २० वर्षे लागतात.
४. वयाने लहान आणि मोठे असणार्या साधकांची साधनेतील वाटचाल
४ अ. वयाने लहान
हे बहुधा उच्च स्वर्गलोक किंवा त्यापुढील लोक येथून जन्माला आलेले असतात. लहान वयातच आश्रमात आल्याने त्यांच्यावर मायेचे संस्कार होत नाहीत; म्हणून त्यांची प्रगती जलद होते. ते २० – २५ वर्षे वयापर्यंत संतही होऊ शकतात.
४ आ. वयाने मोठे
यांच्यावर जीवनातील विविध प्रसंगांचे संस्कार झाल्यामुळे काही स्वभावदोष असतात. ते दूर करण्यासाठी काही वर्षे जावी लागतात. भूतकाळातील कटु प्रसंग विसरण्यासाठीही त्यांना काही वर्षे द्यावी लागतात. त्यामुळे ६० टक्के पातळी गाठणे आणि पुढे संत होणे यासाठी त्यांना सर्वसाधारणतः २० वर्षे तरी लागतात. असे असले, तरी या जन्मातच त्यांना संतत्व प्राप्त होते.
५. उदाहरणे
वयाने लहान आणि मोठे असणार्या साधकांची साधनेतील वाटचाल कशी होते, हे समजण्यासाठी या विषयीची लेखमाला आरंभ करत आहोत. त्यावरून त्यांचे बोलणे, चालणे, वागणे किती प्रगल्भ असते, हे लक्षात येईल.
६. कुटुंबियांनो, विचार करा आणि कृती करा !
आदि शंकराचार्य, समर्थ रामदासस्वामी इत्यादी लहान वयातच ईश्वरप्राप्तीसाठी घरदार सोडून गेले. त्यांनी स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करून आपले नावही अजरामर केले. तुम्हाला अशी मुले हवीत कि जन्मली, जगली आणि मेली, अशी प्राण्यांच्या चक्राप्रमाणे जगणारी मुले हवीत ? साधना करणारी मुले हवी असल्यास तुम्ही स्वतः साधना करा, गरोदरपणापासूनच मुलांवर साधनेचे संस्कार करा आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांना आश्रमात पाठवा. यामुळे आश्रमातून ती बाहेरच्या समष्टी जगात येतील, तेव्हा संतच होऊन येतील. एवढेच नव्हे, तर तुम्हालाही मनुष्यजन्माचे सार्थक करावे, असे वाटू लागल्यास तुम्हीही काही आठवडे रहाण्यासाठी आश्रमात येऊ शकता. तुम्हाला येथे रहाणे आवडले, तर अधिक काळ राहू शकता. नाहीतर तुमच्या व्यावहारिक जीवनात परत जाऊ शकता.
साधना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणार्यांना आणि घरदार सोडून सनातनच्या आश्रमात येणार्यांना शेवटच्या श्वासापर्यंत साहाय्य करण्याची शक्ती दे, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
– (प.पू.) डॉ. आठवले (३०.१०.२०१४)