श्राद्धविधीत पितर आणि देवतांना नैवेद्य दाखवणे ही महत्त्वाची कृती असल्याने त्यामागील शास्र जाणून घेणे आवश्यक ठरते. यादृष्टीने लेखात पितरांसाठीचे पिंड दर्भावर का ठेवतात, देवता आणि पितरांना नेवैद्य कसा दाखवावा इत्यादी सूत्रांमागील शास्र आपण पाहू.
श्राद्धविधीत पितर आणि देवतांना नैवेद्य दाखवणे चलच्चित्रपट (Video)
१. पितरांना पिंडरूपी अन्न अर्पण करतांना ते दर्भावर का केले जाते ?
‘दर्भातील तेजरूपी वायूलहरींमुळे लिंगदेहाभोवती असलेल्या काळ्या जडत्वदर्शक लहरींचे विघटन होत असल्याने लिंगदेह अन्नातील सूक्ष्म-वायू सहज ग्रहण करू शकते. त्यामुळे पितरांना अन्न अर्पण करतांना ते दर्भावर केले जाते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २४.९.२००५, सायं. ६.२०)
(शास्त्रानुसार पितरांना अन्न अर्पण करतांना ते दर्भावर केले जाते. मात्र सध्याच्या काळात त्यासाठी पत्रावळ वापरली जाते. – संकलक)
‘पितरांसाठीच्या ताटात नेहमीपेक्षा उलट पद्धतीने अन्नपदार्थ वाढल्याने रज-तमात्मक लहरी उत्पन्न होऊन मृतात्म्याला अन्न ग्रहण करणे शक्य होते.’ (श्री. नीलेश चितळे यांच्या माध्यमातून मिळालेले ईश्वरी ज्ञान, ५.७.२००६, सायं. ७.२७)
१ अ. यजमानाने दर्भांवर पिंड ठेवून
त्याचे पूजन करतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया दर्शवणारे चित्र
१. ‘चित्रातील त्रासदायक स्पंदने : २ टक्के’ – प.पू. डॉ. आठवले
२. ‘चित्रातील स्पंदनांचे प्रमाण : भाव १ टक्का, चैतन्य १ टक्का, शक्ती ३.७५ टक्के आणि आकृष्ट होणारी त्रासदायक शक्ती १.७५ टक्के
३. इतर सूत्रे : दर्भांवर पिंड ठेवून तूप आणि जळलेल्या दर्भाची काजळी दर्भांना लावणे, लोकरीचा धागा पिंडावर वहाणे, अशा कृती झाल्यावर फूल, तुळस, माका, धूप, दीप आदींचे पिंडांवर उपचार करून त्यांचे पूजन करतात.
अ. हा विधी करतांना विधीतून शक्तीची स्पंदने अधिक प्रमाणात निर्माण होऊन ती पूजकाला प्राप्त होतात.
आ. पिंडांचे पूजन केल्याने अतृप्त पितर भुवलोकातून पिंडांकडे सहज आकृष्ट होतात आणि त्यांच्या इच्छांची पूर्ती होऊन त्यांना गती प्राप्त होते. अशा प्रकारे पूर्वजांचे त्रास न्यून होतात.
इ. यजमानाने भावपूर्ण पिंडपूजन केल्यामुळे त्याला होणारे पूर्वजांचे त्रास न्यून होतात.’
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (भाद्रपद शुद्ध दशमी, कलियुग वर्ष ५१११ (३०.८.२००९))
१ आ. अनुभूती
सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र काढतांना ‘माझ्या पितरांचे पूजन करत आहे’, अशा भावाने ते काढल्यावर स्वतःवर येत असलेले आवरण दूर होऊन उत्साह जाणवू लागणे
‘यजमानाने दर्भावर पिंड ठेवणे हे सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र काढतांना मला माझ्यावर काळ्या शक्तीचे आवरण येत असल्याचे जाणवले. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र काढतांना मी ‘माझ्या पितरांचे पूजन करत आहे’, अशा भावाने हे चित्र काढले. ज्या वेळी चित्र पूर्ण झाले, त्या वेळी मला माझ्यावरील आवरण दूर होऊन उत्साह जाणवू लागला.’
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था
२. श्राद्धविधीतील देवतांना नैवेद्य दाखवणे
श्राद्धविधीसारखे अशुभ कर्म हे देवतांच्या कनिष्ठ, म्हणजेच पृथ्वी आणि आप या कनिष्ठ तत्त्वांशी संबंधित असते. त्यामुळे या विधीतील नैवेद्य दाखवणे हे कर्म जास्त प्रमाणात भूमीशी, म्हणजे पृथ्वीतत्त्वाशी संलग्नता दर्शवणारे असते. पितरविधीतील कनिष्ठ देवतांच्या लहरी या अधोदिशेने (भूमीच्या दिशेने) कार्यरत असतात. त्यामुळे त्या दिशेला प्रधान मानून तो दर्शक विधी केला जातो.
३. देवता आणि पितर यांना नैवेद्य दाखवण्याच्या पद्धतींचे शास्त्र
३ अ. कृती
श्राद्धात देवतांना नैवेद्य दाखवतांना वङ्काासनात बसून उजवा गुडघा खाली टेकवतात. त्यानंतर नैवेद्याच्या पानाच्या खाली डावा हात आणि वर उजवा हात ठेवावा. तसेच पितरांना नैवेद्य दाखवतांना डावा गुडघा खाली टेकवून नैवेद्याच्या पानाच्या खाली उजवा हात अन् वर डावा हात ठेवावा.
३ आ. शास्त्र
‘वज्रासनात बसून उजवा गुडघा खाली टेकवणे, हे देहातील कार्यरत शक्तीचा व्यय करून, म्हणजेच तिला त्यागून ‘स्व’रूपी अहं न्यून करून डावी नाडी कार्यरत करून त्यायोगे देवतेच्या निर्गुणाशी संबंधित लहरी ग्रहण करण्याचे प्रतीक आहे. उजवा गुडघा खाली टेकवून डावा गुडघा पोटाशी घेऊन होणार्या मुद्रेमुळे नाभीचक्रावर दाब येऊन डावी नाडी कार्यरत होते, तर याउलट कृती केल्याने सूर्य नाडी कार्यरत होऊन रजोगुणाच्या आधारे पितरांना आवाहन करणे शक्य होते.
देवतांच्या पानाखाली डावा हात ठेवून उजवा हात पानावर ठेवणे, हे उजवा हात प्रधान ठेवून त्याद्वारे देवतांचे स्वागत करण्याचे, म्हणजेच शुभसूचकतेचे दर्शक आहे, तर उलट पद्धतीने पितरांसाठी ही कृती करणे, म्हणजेच देवतांपेक्षा कनिष्ठ स्तरावर असलेल्या पितरांचे स्वागत करण्यासाठी गौण प्रधानतेचे लक्षण म्हणून अशुभ विधीदर्शक डावा हात प्रधान, म्हणजेच पानाच्या वर ठेवून उजवा हात पानाच्या खाली ठेवणे होय.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.८.२००६, सायं. ५.३४)
नमस्कार, श्राध्दाच्या वेळेला ब्राह्मण भोजन (देव व पितर स्थानावरील) सुरू असतांना त्यांच्या समोर पिंड दानाचे पिंड तयार करू नयेत; असे सांगतात, त्याचे कारण काय? जागा लहान असेल तर कसे करावे?
नमस्कार श्री. गणेशप्रसाद तांबेजी,
या मागे शास्त्र नाही. हा शिष्टाचार आहे. जसे घरी कोणी पाहुणे आल्यावर ते जेवत असतांना आपण तिथे थांबतो अथवा अन्य कामे करत नाहीत, तसे हे आहे. ब्राह्मण भोजन झाल्यावर पिंड तयार करायला घेऊ शकता.
Pitaranna ratri naivaidya dakhava ka ani sanvar astat tyaveli pan dakhavla tar chalte ka yavar margadarshan karave
नमस्कार,
नैवेद्य म्हणजे नक्की काय करायचे आहे ? श्राद्धातील नैवेद्य आहे की नुसताच बाहेर ठेवायच्या नैवेद्य आहे ? कृपया याविषयी स्पष्ट कळल्यास, योग्य उत्तर सांगता येईल.
धर्मशास्त्रानुसार, पितरांसाठी काहीही द्यायचे असल्यास ते अपरान्हकाळ म्हणजे साधारणपणे दुपारच्या वेळेत द्यावे.
१. श्राद्ध नैवेद्य पितृ पक्ष मध्ये म्हणजे श्राद्ध मध्ये जेवायला काय बनवायचे असते?
२.श्राद्ध विधी न करता फक्त आवडीचे जेवण बनवून
बाहेर नैवेद्य ठेवला तर चालतो का?
३. मृत व्यक्तीच्या फोटो च्या समोर ठेवला तर चालतो का?
नमस्कार,
श्राद्धात जेवण वाढण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील माहिती वाचा – https://www.sanatan.org/mr/a/89694.html
एकादशीला देवाला नैवेद्य दाखवत नाहीत, मग अश्यावेळी तिथी नुसार एकादशीला श्राद्ध असेल तर श्राद्धाचा स्वयंपाक काय असतो ?
नमस्कार जान्हवी जी
श्राद्ध नेहमीप्रमाणे करावा मात्र नंतर तो स्वतः भक्षण करू नये, केवळ त्या अन्नाचा वास घेऊन विसर्जन करावा.
आपली
सनातन संस्था
१) पितृपक्षात पितरांना नैवेद्य दुपारी १२ वाजण्याच्या आतच दाखवावा याला शास्त्रीय आधार आहे का?
२) काही अडचणीमुळे पितरांना त्या तिथीला नैवेद्य दाखवितात आला नाही तर सर्वपित्री अमावास्या या तिथीला नैवेद्य दाखविला तर चालतो का?
नमस्कार अनुजा जी
१. पितृपक्षात पितरांना नैवेद्य दुपारी बारा वाजता दाखवावा असे काही शास्त्रीय दृष्ट्या आम्हाला आढळले नाही.
२. तिथीला नैवेद्य दाखवता आला नाही तर त्यानंतर येणाऱ्या अमावस्या या तिथीला अथवा वैधृती किंवा व्यतिपात योग असताना नैवेद्य पितरांना दाखवू शकता.
आपली,
सनातन संस्था