आज भारतातील केवळ हिंदूच ‘सर्वधर्मसमभावा’ला मानतात. अनादी अशा हिंदु धर्मात जी शिकवण आहे, तेवढी व्यापक शिकवण अन्य कोणत्याही पंथात (धर्मात) नाही. या लेखात आपण धर्म (अर्थात् हिंदु धर्म) आणि ख्रिस्ती, इस्लाम इत्यादी विविध अन्य पंथ (धर्म) यांमधील भेद जाणून घेऊया.
१. निरनिराळे पंथ आणि धर्म यांची तुलना



२. निरनिराळे पंथ, धर्म आणि नीती
उपनिषदांत बायबलमधील ‘दहा आज्ञा (Ten commandments)’ सारख्या आज्ञा नाहीत. यहुदी (ज्यू) आणि ख्रिस्ती हे पंथ आदेशांवर उभारलेले आहेत. उपनिषदांच्या मताप्रमाणे कृतींची आज्ञा करणे, हे नीतीशास्त्राचे काम आहे. इस्लाम, ज्यू आणि ख्रिस्ती हे पंथ नीतीशास्त्रावर आधारित आहेत. सनातन धर्म, तसेच जैन आणि बुद्ध धर्म हे चेतनेवर, म्हणजे मन आणि बुद्धी शुद्ध करण्यावर आधारित आहेत.
३. निरनिराळे पंथ, पंथापंथातील द्वेष आणि हिंदु धर्माचे महत्त्व
इतर सर्व धर्म (पंथ) मनुष्यस्थापित आहेत. मनुष्य हा अपूर्ण असल्यामुळे त्याने स्थापन केलेला धर्म (पंथ) पूर्ण कसा असणार ? मनुष्याने तो स्थापन करण्याचे कारण हे की, त्याला मूळ धर्म न समजणे. स्थापनेचा हेतू मात्र मानवाच्या कल्याणार्थ असून त्याच्या बुद्धीनुसार त्याने शोधून काढलेली ती एक उपासनापद्धती आहे. पुढे विविध पंथांच्या अनुयायांनी आपल्या पंथाचा मनोदय समजून न घेता दांडगाईने इतर मानवांवर अत्याचार करून बलात्काराने आपला पंथ (धर्म) त्यांच्यावर लादला. त्यामुळे विविध धर्मियांत (पंथियांत) परस्परद्वेषाचे वातावरण निर्माण होऊन त्यातून मानवी मनाची परिपूर्ण विकृत अवस्था निर्माण झाली. परिणामस्वरूप तमोगुणाची परिसीमा होऊन मानवाचे नैतिक अधःपतन झाले.

हिंदु ईश्वराच्या उपासनेला बसतांना ‘सर्वेषाम् अविरोधेण’, असे त्या उपासनेचे स्वरूप समजून घेऊन तसा तिला आकार देऊनच बसतो.
हिंदु धर्मामधील निवृत्तीमार्गीय तर आपल्या हृदयात ईश्वराची स्थापना होण्यासाठी ‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयाः ।।’, अशी प्रार्थना करतो. म्हणून आम्ही हिंदुधर्मीय त्यांनाच ‘संत’ म्हणतो. सर्व प्रवृत्तीमार्गीय हिंदूंचे कल्याण त्यांनाच कळते; म्हणून त्यांच्या पादपद्मी लीन राहून मानव चारित्र्यसंपन्नतेचे धडे शिकत असतो.
सर्व धर्मीय (पंथीय) हे पूर्वी आमचे बांधवच होते, हे लक्षात येते आणि या आमच्या धारणेतूनच आम्ही हिंदु ‘सर्वधर्मसमभाव’ हा आमच्या धर्माचा प्राण मानतो. मग इतर धर्मियांचा (पंथियांचा) द्वेष आम्ही कसा काय करू शकू ?’
– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
३ अ. हिंदु धर्मीय आणि इतर धर्मीय यांचा इतर धर्मियांकडे पहाण्याचा दृष्टीकोन

प.पू. डॉ. आठवले : व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग, असा साधनेचा एक सिद्धांत आहे. उपासनेविषयी अवाजवी कट्टरता नसणे, हेही हिंदु धर्माचे लक्षण आहे. या सिद्धांतामुळे हिंदूंचे कोणत्याही धर्माशी वैर नसते. हिंदु सहिष्णु असण्याचे हे एक कारण आहे. याउलट इतर धर्मांत आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे, अशी शिकवण दिली जात असल्यामुळे त्या धर्मियांचे इतर धर्मियांशी वैर असते.
– (प.पू.) डॉ. आठवले (२५.४.२०१४)
३ अा. हिंदु धर्म सोडून इतर पंथांनुसार
साधना करणार्या बहुसंख्य साधकांची प्रगती न होण्याची कारणे
१. पंथांत व्यक्तीच्या प्रकृतीनुसार साधना सांगितली जात नाही. सर्वांना तीच साधना सांगितली जाते. एखाद्या वैद्यांनी सर्व रुग्णांना एकच औषध द्यावे, तसे हे होते.
२. पातळीनुसार साधना सांगितली जात नाही. पंथाच्या ग्रंथाचे पठण, नामस्मरण आणि नामाशी एकरूप होणे, हे भक्तीमार्गातील साधनेतील पुढचे पुढचे टप्पे आहेत. हे लक्षात न घेता बहुतेक सर्व जण आयुष्यभर पंथाच्या ग्रंथाचे पठण एवढेच करतात. ते आयुष्यभर तेच तेच पठण इत्यादी करत रहातात. हे शाळेत एकाच वर्गात आयुष्यभर शिकण्यासारखे होते. केवळ भक्तीमार्गातच नाही, तर प्रत्येक योगमार्गाच्या संदर्भात असेच होते.
३. पंथीय साधना फार तर राजसिक जीवन जगायला शिकवते; पण त्यामुळे फारच थोडे ईश्वरप्राप्तीच्या दिशेने प्रगती करतात.
४. पंथीय साधना धर्माप्रमाणे व्यापक दृष्टीकोन देत नसल्याने साधक संकुचित वृत्तीचा होऊन आमचीच साधना सर्वश्रेष्ठ आहे, असे त्याला वाटून त्याचा अहंकार जागृत होतो. त्यामुळे तो सर्वव्यापी ईश्वरापासून दूर जातो.
वरील सूत्रे लक्षात घेऊन विविध पंथियांना धर्मानुसार साधना करायची बुद्धी होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना.
– (प.पू.) डॉ. आठवले (५.१.२०१५)
३ इ. क्रूरतेचा इतिहास नसलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे हिंदु धर्म !
धर्म एकच आहे आणि तो म्हणजे हिंदु धर्म. इतर सर्व पंथ आहेत. हिंदु धर्म सोडून इतर धर्मांचा (पंथांचा) इतिहास पाहिला, तर त्यात विविध काळांत केलेल्या लाखो हत्यांचा, क्रूरतेचा, बलात्कारांचा, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या हजारो नोंदी आहेत. फक्त अनादी काळापासून अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्माच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही.
– (प.पू.) डॉ. आठवले (६.१.२०१५)
३ ई. म्हणे सर्वधर्मसमभाव !
या लेखातील तक्त्यावरून सर्वधर्मसमभाव हा शब्द किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येईल.
१. सर्वधर्मसमभाव म्हणणे म्हणजे गोड, तिखट, आंबट, कडू, सर्व सारख्याच चवीचे असतात, असे समजणे
२. सर्वधर्मसमभाव म्हणजे वाघ आणि गाय सारखेच आहेत, असे म्हणणे
३. सर्वधर्मसमभाव म्हणजे अंधार आणि प्रकाश सारखेच आहेत, असे म्हणणे
४. सर्वधर्मसमभाव म्हणजे धर्मग्रंथांचा अभ्यास किंवा साधना न करता मूर्खासारखी बडबड करणे !
५. सर्वधर्मसमभाव म्हणजे बालवाडीतील शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण सारखेच समजणे !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
४. हिंदु धर्मात राजकीय आणि धार्मिक सत्तांच्या केंद्रीकरणाचा अभाव
हिंदु धर्माच्या संदर्भात सर्वंकष केंद्रसत्ता कधीच निर्माण झाली नाही. एखाद्या विशिष्ट प्रेषिताचा आग्रह धरून देशभर त्याने उपदेशिलेल्या धर्मतत्त्वांचा दंडयुक्त प्रचार इथे कोणी केला नाही. ईश्वर एकच आहे, असे इथे संतांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी सांगितले आणि लोकांनीही ते मानले; पण ‘ख्रिस्त किंवा महंमद हा ईश्वराचा एकमेव प्रेषित आहे’, असे या देशात कोणी सांगितले नाही. ‘ख्रिस्ताला किंवा महंमदाला भजणारे आणि मानणारे तेवढेच काय ते स्वर्गाचे धनी आणि बाकीचे सारे नरकगामी’, अशा प्रकारचा आग्रह कोणत्याही भारतीय धर्मपंथाने धरला नाही. भारतातले अंतिम मूल्य स्वर्ग नसून मोक्ष हे आहे. त्यामुळे इथे स्वर्गाची चाड (कदर) फारशी कोणी केली नाही. त्यामुळे जशा अनेक राजसत्ता, तसे अनेक धर्मसंप्रदाय इथे एकमेकांच्या शेजारी नांदले. परमेश्वर एकच असला, तरी त्याची भिन्न रूपे असायला आक्षेप नाही आणि त्यांची उपासना करायलाही आडकाठी नाही, असे या देशाने मानले. दुसर्या दैवताला कोणत्याही प्रकारे न्यूनपणा न आणता प्रत्येक जातीला किंबहुना प्रत्येक कुटुंबाला इथे स्वतःसाठी कोणतेही खास दैवत स्वीकारायला मोकळीक मिळाली. अशा गोष्टींमुळेच येथील सांस्कृतिक जीवनाचे स्वरूप केंद्रीकृत किंवा विशिष्ट ठशाचे असे झाले नाही.
५. हिंदूंना शिक्षा करून धर्मपालन करायला लावण्यासाठी मुसलमानांची निर्मिती
‘आपण धर्माने न वागल्यामुळे आपल्याला ठोकायला देवाने मुसलमान पंथ निर्माण केला. तेव्हा आपण तो नष्ट करू शकत नाही. धर्मनिष्ठेमुळे देवच त्यांना आपल्याशी प्रेमाने वागायला लावेल.’
– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.