गुरुकृपेने प.पू. दास महाराजांना झालेले प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आनंददायी दर्शन !

१. प.पू. दादाजींच्या दर्शनाची इच्छा प.पू. डॉक्टरांच्या कृपेने पूर्ण होणे

१ अ. प.पू. दादाजी वैशंपायन मिरज आश्रमात आल्याचे
कळल्यानंतर त्यांच्या दर्शनाचा विचार मनात येऊन प.पू. डॉक्टरांना प्रार्थना होणे

प.पू. दास महाराज
प.पू. दास महाराज

२३.१.२०१४ या दिवशी आम्ही दोघे (मी आणि माई) उभयता वैयक्तिक दौर्‍यावर होतो. कराड येथे असतांना आम्हाला दैनिक सनातन प्रभातमधून प.पू. दादाजी वैशंपायन मिरज आश्रमात अनुष्ठान करण्यासाठी आल्याचे समजले. त्यांचे दर्शन घ्यावे, असा विचार आम्हा दोघांच्याही मनात आला. आम्ही प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली, आपल्याला जसे अपेक्षित असेल, तसेच घडवून आणावे.

१ आ. प.पू. दादाजींनी प्रथम सूक्ष्मातून भेटूया,
असे सांगणे आणि त्यानंतर दर्शनासाठी बोलावल्याचा निरोप देणे

आम्ही श्री. अतुल पवार यांना संपर्क केला आणि प.पू. दादाजींना आमच्या वतीने आम्ही दोघे आपल्या दर्शनाला येऊ शकतो का ?, अशी प्रार्थना करा, असे सांगितले. श्री. अतुल यांनी मी त्यांना प्रार्थना करून आपल्याला कळवतो, असे सांगितले. त्यानंतर १० मिनिटांनी श्री. अतुल यांचा भ्रमणभाष आला आणि ते म्हणाले, मी प.पू. दादाजींना आपला निरोप दिला. त्यांनी आपण सूक्ष्मातून दर्शन घ्या, असा निरोप दिला आहे. आम्ही ते आनंदाने स्वीकारले आणि आमचे पुढील नियोजन केले. अर्ध्या घंट्याने पुन्हा श्री. अतुल यांचा भ्रमणभाष आला. ते म्हणाले, तुम्ही दोघेही दर्शनाला या, असा प.पू. दादाजींचा निरोप आहे. त्याच क्षणी आमच्याकडून प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

 

२. प.पू. दादाजींनी प.पू. डॉक्टरांप्रमाणे निरपेक्ष प्रेम करणे

२ अ. भक्तांकडे गेल्यावरही साधकांकडे विचारपूस करणे

२४.१.२०१४ या दिवशी सायंकाळी आम्ही मिरज आश्रमात पोहोचलो. तेव्हा प.पू. दादाजी त्यांच्या भक्तांकडे गेले होते. ते भक्तांकडे असतांनाही त्यांनी प.पू. दास महाराज आले का ? अशी साधकांकडे अत्यंत प्रेमाने विचारपूस केली. त्यांच्या अपार प्रेमामुळे आमच्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

२ आ. प.पू. डॉक्टरांप्रमाणे आस्थेने आणि प्रेमाने विचारपूस करून सत्संग देणे

२५.१.२०१४ या दिवशी सकाळी ९.३० वाजता आम्हाला प.पू. दादाजींचे दर्शन झाले. तेव्हा प.पू. डॉक्टर ज्या आस्थेने आणि प्रेमाने आमची विचारपूस करतात, त्याचप्रमाणे प.पू. दादाजींनीही आमची विचारपूस केली. प.पू. डॉक्टरांप्रमाणेच त्यांनीही आम्हाला १ घंटा त्यांच्या सत्संगाची संधी दिली.

२ इ. प.पू. दादाजींनी पाय कसा आहे ? असे विचारून
त्यावरून प्रेमाने हात फिरवल्यावर प.पू. डॉक्टरांची आठवण येणे

प.पू. दादाजींनी पाय कसा आहे ? असे विचारल्यानंतर मी त्यावरील पायमोजे काढून त्यांना माझा पाय दाखवला. त्या वेळी त्यांनी अत्यंत प्रेमाने त्यावरून हात फिरवला. तेव्हा मी रामनाथी आश्रमात असतांना प.पू. डॉक्टर प्रेमाने माझी काळजी घेत असत. माझी विचारपूस करत असत आणि माझ्या पायावरून आपला प्रेमळ हात फिरवत असत, त्याची मला आठवण आली.

 

३. प.पू. दादाजी आणि प.पू. डॉक्टर यांचे आलटून पालटून दर्शन होणे

प.पू. दादाजींकडे पहातांना एकदा प.पू. डॉक्टर, तर एकदा प.पू. दादाजी यांचे दर्शन होत होते. प.पू. डॉक्टर दिसल्यानंतर त्यांच्या हृदयात प.पू. दादाजी आणि प.पू. दादाजी दिसल्यानंतर त्यांच्या हृदयात प.पू. डॉक्टरांचे दर्शन होत होते.

 

४. गुरुकृपेमुळेच महान संतांच्या दर्शनाची संधी मिळाल्याने व्यक्त केलेली कृतज्ञता !

आमची पात्रता नसतांनाही आम्हा उभयतांना केवळ गुरुकृपेमुळेच इतक्या महान संतांच्या दर्शनाची संधी लाभली. ही गोष्ट गुरुकृपेविना साध्य होत नाही. गुरुकृपेचे महत्त्व समर्थांनी पुढील श्लोकांत सांगितले आहे.

गुरु थोर कि देव थोर म्हणावा ।
नमस्कार कोणास आधी करावा ॥
मना माझिया गुरु थोर वाटे ।
तयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ॥ – समर्थ रामदासस्वामी

त्याप्रमाणे प.पू. डॉक्टरांनी रघुराजांची भेट घडवून आणली. आम्ही उभयता त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

आपला चरणसेवक,
– दास (प.पू. दास महाराज), पानवळ, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (२५.१.२०१४)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment