प्रस्तूत वैशिष्ट्यपूर्ण लेखात आपण संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा होणारा सूक्ष्म-परिणाम जाणून घेऊ. तसेच आध्याति्मक पातळी आणि केस यांचा असलेला संबंध याविषयीही पाहू.
१. डोक्यावरील केसांमध्ये दाढीच्या केसांपेक्षाही जास्त जिवंतपणा असणे
‘डोक्यावरील केसांमध्ये दाढीच्या केसांपेक्षाही जास्त जिवंतपणा असतो, म्हणजेच पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित सूक्ष्म-लहरींच्या संक्रमणाचे प्रमाण जास्त असते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.२.२००६, दुपारी ३.३५)
२. केसांतील रज अन् तम यांच्या प्रमाणाचा मनावर होणारा परिणाम
केसांतील रज-तमाचे प्रमाण | टक्के | मनातील विचार | उदाहरण |
---|---|---|---|
१. ‘नेहमीचे | ४०-३० | मायेतील | सामान्य मनुष्य |
२. नेहमीपेक्षा न्यून | ३०-३० | सेवेविषयी | साधक |
३. नेहमीपेक्षा जास्त | ३०-५० | वाईट | गुंड’ |
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.८.२००४, सायं. ८.५०)
संकलक : स्त्रियांनी केस आखुड ठेवल्यास केसांच्या मधल्या पोकळीचा आकार लांब केसांच्या टोकांच्या मधल्या पोकळीच्या आकाराच्या तुलनेत जास्त असल्याने वाईट शक्तींचा त्रास जास्त व्हायची शक्यता असते. असे असल्यास किती क्षमतेच्या वाईट शक्तींना आखुड केसांमुळे त्रास देणे सोपे जाते ?
एक विद्वान : ‘४० ते ५० टक्के क्षमतेच्या वाईट शक्तींना आखुड केसांमुळे त्रास देणे सोपे जाते.’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ९.८.२००४, दुपारी ४.२७)
३. आध्यात्मिक पातळी आणि केस
३ अ. आध्यात्मिक पातळीचा केसांवर होणारा परिणाम
‘जसजशी व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे केस चमकणे, केसांचा जाडपणा उणावून ते मऊ होणे, असे परिणाम दिसू लागतात. संतांचे केस मऊ असतात. तसेच त्यांच्यातील ओजाचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांची कांतीही चमकते.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ३.५.२००७, दुपारी ३.४०)
३ आ. आध्यात्मिक पातळीनुसार केसांत होणारे पालट (बदल) आणि त्यांची वैशिष्ट्ये
पातळी (टक्के) |
पालट | आध्यात्मिक वैशिष्ट्ये |
---|---|---|
‘१० | केस राठ अन् रानटी प्राण्यांप्रमाणे असणे, केस गळणे | केसांतून दुर्गंध येणे |
२० | केस कुरळे आणि पांढरे होणे | केसांच्या पोकळीत तमोगुणी विद्युतऊर्जा निर्माण होणे |
३० | केस मधेच तुटक; परंतु मधेच लांब असणे, केसांत कोंडा होणे | केसांच्या पोकळीत काळ्या शक्तीची स्थाने निर्माण होणे |
४० | केस लांब असणे | केसांतून वेगाने रजोगुणी ऊर्जेचा प्रवाह देहात संक्रमित झाल्याने कार्यातील उत्साह वाढणे |
५० | केस मऊ होणे | केसांमध्ये चैतन्यनिर्मितीस प्रारंभ होणे |
६० | केसांना चमक येणे | केसांमध्ये देवत्व येऊन त्यातून प्रकाश डोकावणे |
७० | केसांतून सुगंध येणे | संपूर्ण देहालाच देवत्व येणे |
८० | केस बाह्यतः निस्तेज दिसणे, म्हणजेच केसांनी त्यांचे रंगद्रव्यरूपी जडत्व त्यागणे |
देहबुद्धी न्यून झाल्याने सगुणातून निर्गुणात जातांना केसही ‘केस’ या संज्ञेच्या पलीकडे जाणे (केसांचा गुणधर्म लय पावणे) |
९० | बाह्य लक्षणे न जाणवणे | चैतन्यातच स्थिर झाल्याने देहावर फारसा पालट न जाणवणे |
१०० | बाह्य लक्षणे न जाणवणे | ब्रह्मस्थितीला गेल्याने केसातील निर्गुणदर्शक (सूक्ष्म) पोकळीयुक्त पालट स्थूलदृष्ट्या न जाणवणे’ |
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३.११.२००७, रात्री ८.११)
४. संन्याशाचे केस
‘संपूर्ण त्याग (न्यास) करतो, तो ‘संन्यासी’, असाही ‘संन्यासी’ या शब्दाचा एक अर्थ आहे. संन्याशाच्या केसांमध्ये तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. त्याच्या केसांतून तेजतत्त्वाचे प्रक्षेपणही होत असते.
४ अ. संन्याशाने डोक्यावरचे केस काढणे
४ अ १. कलियुगातील स्थिती
‘कलियुगात काही जीव प्रथमच केस कापून ‘आपण संन्यासी आहोत’, असे भासवतात आणि स्वतःचेच हसे करून घेतात. एखादा खरोखरीच वैराग्यभावात असेल, तरच त्याला केस पूर्णतः कापल्यावरही मानसिक त्रास होत नाही; परंतु असे क्वचितच असतात.
४ अ २. वैराग्यभाव असल्यास संन्यासधर्माची दीक्षा दिली जाणे
गुरु शिष्याला ज्या वेळी तो खरच वैराग्यभावात जातो, त्या वेळी केस कापायला सांगून सर्वस्वाचा त्याग करण्याचा अधिकार देतात, म्हणजेच संन्यासधर्माची दीक्षा देतात.
४ अ ३. डोक्यावर केस नसणे, हे सर्वसंगपरित्यागी जीवन जगणार्या जिवाच्या संन्यस्त वृत्तीचे एक दर्शक असणे
संन्यस्त जीवन म्हणजेच सर्वसंगपरित्यागी जीवन. डोक्यावर केस नसणे, हे असे जीवन जगणार्या जिवाच्या संन्यस्त वृत्तीचे एक दर्शक आहे.
४ अ ४. संन्यस्त जीवनाचे महत्त्व
केशरंध्रे ही पोकळ असल्याने त्यांच्यात निर्गुणजन्य ऊर्जाही सामावू, तसेच प्रक्षेपित होऊ शकत असल्याने संन्यस्त जिवाच्या अस्तित्वानेच अनेक जिवांचे जीवन उद्धरून जाते; म्हणून हिंदु धर्मात संन्यासत्व जीवनाला अधिक महत्त्व दिले आहे.
४ अ ५. परिणाम
४ अ ५ अ. संन्याशावर परिणाम न होणे : वैराग्यभावात साक्षीभाव निर्माण होत असल्याने संन्यासी जीव रज-तमयुक्त जडत्वदर्शक भानाच्या पलीकडे जातो. त्यामुळे हा जीव सतत आध्यात्मिक उन्नतीच्या रेषेतही स्थिर (ब्रह्मस्थितीला) राहू शकतो. त्यामुळे त्याचे केस कापून केशरंध्रे उघडी पडली, तरी काहीच परिणाम होत नाही.
४ अ ५ आ. समष्टीवर होणारा परिणाम : समष्टीलाच त्यातून लाभ मिळतो; कारण संन्याशाच्या ब्रह्मरंध्रातून प्रक्षेपित होणार्या चैतन्यलहरींना कसल्याच प्रकारचे बंधन किंवा केशमुळांचाही अडथळा रहात नाही.
४ अ ६. संन्याशाचे समाजातील स्थान
१. पूर्वीच्या काळी अशा जिवांना अत्यंत मानाने वागवले जाऊन त्यांचा आदरसत्कार करून पुण्य मिळवले जाई.
२. संन्याशाचा अपमान करणे, हे घोर पापकर्म केल्याचे दर्शक होते. संन्याशाच्या अपमानातून शापाच्या बंधनात अडकून यातनामय जीवन जगण्याची पाळी त्या त्या जिवावर येत असे.
३. ‘प्रथम अतिथी’ म्हणून कित्येक राजे प्रथम संन्याशाचे पूजन करत असत. यामुळे त्यांच्या मनातील राज्यविषयक लोभही गळून पडण्यास साहाय्य होत असे आणि त्यांचीही उन्नती होत असे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.९.२००७, दुपारी ३)
५. उन्नतांचे केस
सर्वसाधारण व्यक्तीच्या केसांतून रज-तमात्मक लहरी बाहेर पडतात, तर उन्नत, म्हणजेच आध्यात्मिक स्तर ७० टक्क्यांच्या पुढे असणार्या जिवांतील सात्त्विकतेचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्या केसांतून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत असते.
६. देवतांचे केस
‘देवता सगुण रूप धारण करतात, तेव्हा त्यांचे डोळे, आशीर्वादाचा हात, चरण आणि केस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शक्तीचे प्रक्षेपण होते.
१. अनेक देवता त्यांचे केस मोकळे सोडतात. केसांच्या टोकांतून निर्गुण-सगुण स्तरावरील शक्तीच्या लहरींचे पाताळाच्या दिशेने सतत प्रक्षेपण होत असते. त्यामुळे पाताळातून प्रक्षेपित होणारी निर्गुण-सगुण स्तरावरील काळी शक्ती नष्ट होण्यास साहाय्य मिळते. मनुष्याच्या केसांची टोके मोकळी सोडली, तर त्यातून वाईट शक्ती त्रास देऊ शकतात; मात्र देवतांनी त्यांचे केस मोकळे सोडले, तर वाईट शक्तींना त्रास होऊन त्या दूर पळतात.
२. दैत्यांचा नाश करण्यासाठी देवी मारक रूप धारण करते, तेव्हा ती तिचे केस मोकळे सोडते.
६ अ. तारक आणि मारक शक्ती अन् केसांचा मऊपणा आणि ताठरपणा
केसांतून मारक शक्ती कार्यरत असते, तेव्हा केस ताठ आणि सरळ असतात, उदा. श्रीदुर्गादेवीचे केस. जेव्हा तारक शक्ती केसांच्या माध्यमातून कार्यरत असते, त्या वेळी केसांचा ताठरपणा न्यून होतो आणि केसांचा मऊपणा वाढतो, उदा. श्री सरस्वतीदेवी किंवा श्री लक्ष्मी यांचे केस.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १७.५.२००७, दुपारी ३.४०)