केस ड्रायरने का वाळवू नये, तसेच महिलांनी न्हाऊन झाल्यावर केस मोकळे सोडून बाहेर का जाऊ नये, याचे शास्त्र प्रस्तूत लेखातून आपण जाणून घेऊ.
१. उन्हात बसून केस वाळवणे आणि टोकांना गाठ बांधणे
‘पूर्वीच्या काळी न्हाऊन झाल्यावर थोडा वेळ उन्हात बसून केस वाळवले जात. यामुळे सूर्याच्या किरणांतील तेजतत्त्व आपोआपच केसांच्या मुळांशी घनीभूत होऊन त्या ठिकाणी लपलेल्या रज-तमात्मक लहरींचे आपोआपच उच्चाटन होऊन देहाची शुद्धी होत असे. त्यानंतर केसांच्या टोकांना गाठ बांधून मगच घरात प्रवेश केला जाई. यामुळे भूमीच्या संपर्कातून केसांच्या टोकांतून देहात येणार्या रज-तमात्मक लहरींना गाठीच्या माध्यमातून अटकाव केला जाई. केसांना बांधलेल्या गाठीमुळे केसांत तेजतत्त्वरूपी लहरींचे जास्तीतजास्त प्रमाणात संवर्धन होऊन त्याच ठिकाणी घनीकरण होत असल्याने ही सात्त्विकता जवळजवळ आठ दिवस टिकत असे. त्यानंतर परत रजोधर्म झाल्यानंतर न्हाणे किंवा आठ दिवसांनी रजोधर्म नसेल, तर न्हाणे, हा आचार करून देह आणि केस यांची यथायोग्य शुद्धी केली जात असे.
२. केस वाळवणे वा विंचरणे यांसाठी विद्युतयंत्राचा वापर नको !
`कलियुगात केस विंचरण्यासाठी यंत्राचा, तसेच केस वाळवण्यासाठीही विद्युतयंत्राचा (ड्रायरचा) उपयोग करण्यात येत असल्याने त्याच्या ध्वनीकडे वायूमंडलातील वाईट शक्तींच्या लहरी आकृष्ट होऊन या यंत्रातून सहजच केसांच्या मुळांत संक्रमित झाल्याने देह अल्प काळात रज-तमाने युक्त बनतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
३. केस मोकळे सोडून बाहेर का जाऊ नये ?
अ. केस मोकळे सोडून बाहेर गेल्यास वाईट शक्तींना जिवावर काळी शक्ती सोडणे शक्य होणे
‘केस धुतल्यानंतर ते वाळवण्यासाठी मोकळे सोडावे लागतात. मोकळ्या केसांकडे वाईट शक्ती जास्त प्रमाणात आकृष्ट होतात. मोकळ्या केसांचे एकमेकांशी घर्षण झाल्याने दोन केसांमध्ये रज-तमात्मक प्रवाही ऊर्जा निर्माण होते. या प्रवाही ऊर्जेच्या साहाय्याने वाईट शक्तींना जिवावर काळी शक्ती सोडणे आणि ती साठवणे शक्य होते.
आ. केस मोकळे सोडून बाहेर जायचे असल्यास घ्यावयाची काळजी
केस मोकळे सोडून बाहेर जायचे असल्यास केसांना गाठ मारून किंवा केसांची सैल वेणी घालून मगच बाहेर पडावे. वेणीमुळे किंवा केसांना मारलेल्या गाठीमुळे वाईट शक्तींनी सोडलेल्या काळ्या लहरींचे शरिराच्या दिशेने अत्यल्प प्रमाणात संक्रमण होते. यामुळे आपोआपच वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यताही उणावते. केस मोकळे सोडणे हे उत्छृंखलपणाचेही लक्षण समजले जाते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.२.२००५, दुपारी २.३० आणि २.३९)