केस धुणे

Article also available in :

रासायनिक साबण आणि द्रवरूप साबण (शॅम्पू) यांच्या तुलनेत शिकेकाई, रिठा यांसारख्या नैसर्गिक घटकांनी केस धुणे अधिक उपयुक्त आहे, हे सर्वसाधारणपणे आपल्याला ठाऊक असते; परंतु विविध शॅम्पूंच्या दूरदर्शनवरील आकर्षक विज्ञापनांना सामान्य जनता भुलते. असे असले तरी नैसर्गिक घटकांनी केस धुणे, हेच हितकारी का आहे, यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसा प्रस्तूत लेखातून जाणून घेऊ.

स्त्री आणि पुरुष यांनी केस धुणे


केस नियमित किंवा स्वच्छ न धुण्याने केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे केसांची काळजी घेणे, यात केस धुण्याला अधिक महत्त्व आहे. पुरुषांनी प्रतिदिन, तर स्त्रियांनी आठवड्यातून न्यूनतम (कमीतकमी) दोन वेळा केस धुवावेत. केसांची गुणवत्ता आणि आरोग्य केवळ केस धुण्यावर अवलंबून नसून केस कशाच्या साहाय्याने धुतो, यावरही ते अवलंबून असते.

१. केस धुण्यासाठी वापरण्यात येणार्‍या घटकांचे प्रकार

१ अ. कृत्रिम घटक


केस धुण्यासाठी सध्या अनेकविध रासायनिक साबण आणि द्रवरूप साबण (शॅम्पू) मिळतात. केसांच्या समस्यांनुरूपही विविध द्रवरूप साबण उपलब्ध आहेत. अशा साबणाने केस धुतल्याने केस बाह्यतः कौशेय (रेशमी), मऊ आणि चमकदार झाल्याचे दिसतात; परंतु त्यांतील रासायनिक घटकांमुळे केसांच्या अनेक समस्याही उद्भवतात.

 

१ आ. नैसर्गिक घटक

शेकडो वर्षांपासून केस धुण्यासाठी स्त्रिया शिकेकाई आणि रिठा यांचा वापर करीत आहेत. शिकेकाईच्या शेंगांची पूड, आवळकाठीचे चूर्ण, तसेच संत्रे / लिंबू यांच्या वाळवलेल्या सालींचे चूर्ण यांचे मिश्रण रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. दुसर्‍या दिवशी सकाळी ते पाणी केसांना चोळावे. अर्ध्या घंट्यानंतर (तासानंतर) रिठ्याच्या पाण्याने केस धुवावेत. केस रुक्ष असल्यास प्रतिरात्री केसांना तेल लावावे आणि दुसर्‍या दिवशी शिकेकाई अन् रिठ्याने केस धुवावेत. हे शक्य नसल्यास आयुर्वेदिक साबणाच्या साहाय्याने केस धुवावेत.

केसांची स्वच्छता राखण्यासाठी नैसर्गिक गुणधर्म असणार्‍या घटकांचा वापर करावा. त्यामुळे केसांची हानी टळून त्यांची चांगली काळजी घेतली जाते.

१ आ १. शिकेकाईचे महत्त्व : ‘द्रवरूप साबणाने (शॅम्पूने) केस धुतल्यावर माझ्या डोक्यावर जडपणा आणि रखरखीतपणा जाणवतो. शिकेकाईने केस धुतल्यावर डोक्यात चांगली शक्ती ग्रहण होऊन मला शांत वाटते.

१ आ २. खडे मीठ विरघळवलेल्या पाण्याने केस धुतल्याने केसांतील काळी शक्ती लवकर नष्ट होणे : स्नानाच्या वेळी केसांवरून प्रथम चमचाभर खडे मीठ विरघळवलेले पाणी ओतल्यावर त्यातून केसांतील काळी शक्ती वेगाने बाहेर पडायची आणि हलके वाटायचे. नुसत्याच पाण्याने केस धुतल्यावर काळी शक्ती घटून हलके वाटण्याचे प्रमाण अल्प असायचे.

– कु. गिरिजा, गोवा.

२. केस नियमित धुण्याने होणारे लाभ

२ अ. शारीरिक

केस नियमित धुतल्याने केसांमध्ये उवा होणे, कोंडा होणे, केस अस्वच्छ राहिल्यामुळे होणारे त्वचाविकार, डोक्यात कंड सुटणे यांसारख्या केसांच्या समस्या दूर होतात.

२ आ. आध्यात्मिक

‘केस धुण्याच्या अगोदर माझ्या डोक्यावर पुष्कळ दाब जाणवत होता. केस धुतल्यानंतर मला चांगले वाटू लागले. तेव्हा ‘डोक्यावरील दाब उणावला’, असे वाटले.’ – सौ. रजनी, गोवा.

(अस्वच्छ ठिकाणी वाईट शक्तींना आक्रमण करणे सोपे जाते. अस्वच्छ केसांमुळे साधिकेला डोक्यावर दाब जाणवत होता. केस धुतल्यानंतर केसांच्या मुळांशी मर्दन झाल्याने तेथील काळी शक्ती नष्ट झाल्याने साधिकेला दाब उणावल्याचे जाणवले. – संकलक)

३. पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी केस का धुऊ नयेत ?

३ अ. पौर्णिमा अन् अमावास्या या दिवशी रज-तम भारित वायूमंडलात केस धुतल्यास केसांमधून त्रासदायक लहरी ग्रहण होऊ शकणे

‘पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी केस धुतल्यास पाण्याच्या संपर्कामुळे केसांतील आपतत्त्वाचे प्रमाण वाढून केशवाहिन्या जास्त संवेदनशील बनतात अन् वायूमंडलात सातत्याने भ्रमण करणार्‍या त्रासदायक लहरींना लगेच प्रतिसाद देतात. मोकळ्या केसांच्या हालचालींमुळे केसांच्या पोकळीत तप्त घर्षणयुक्त ऊर्जेची निर्मिती होऊन या ऊर्जेमध्ये वायूमंडलातील त्रासदायक लहरींचे घनीकरण होते. या लहरी मस्तिष्क-पोकळीत संक्रमित होतात. यामुळे जिवाला विजेचा धक्का बसल्यासारखे होणे, अस्वस्थता येणे, चिडचीड होणे किंवा आकडी येणे, असे त्रास होऊ शकतात; म्हणून शक्यतो पौर्णिमा- अमावास्या या दिवशींच्या रज-तम भारित वायूमंडलात केस धुऊ नयेत.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.१०.२००५, दुपारी १२.०३)

३ आ. वायूमंडलातील रज-तमात्मक लहरी स्वतःकडे खेचल्या जाऊ नयेत; म्हणून पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनीही केस न धुणे योग्य

३ आ १. आचारांचे महत्त्व : `हिंदु धर्मात नेमून दिलेले आचार हे सर्वांनाच रज-तमापासून मुक्त करणारे आहेत.

३ आ २. पौर्णिमेचे वैशिष्ट्य : पौर्णिमेला वाईट शक्ती उपासना करत असल्याने त्यांच्याकडे येणारा रज-तमात्मक लहरींचा ओघ अधिक असतो.

३ आ ३. अमावास्येचे वैशिष्ट्य : अमावास्येला वाईट शक्तींचे रज-तमात्मक प्रक्षेपण अधिक असल्याने वायूमंडल दूषित असते.

एकूणच दोन्ही दिवशी वायूमंडलातील रज-तमात्मक लहरी वाईट शक्तींच्या कार्यामुळे जागृत झालेल्या असतात.

३ आ ४. केस धुतल्याने पाण्यातील आपतत्त्वाच्या संपर्काने ते रज-तमात्मक लहरी खेचून घेण्यात अधिक संवेदनशील बनणे : केस हे मुळातच रज-तम प्रधान असल्याने, म्हणजेच वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींना स्वतःकडे खेचून घेण्यात अग्रेसर असतात. पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी जाणूनबुजून केस धुऊन त्यांची रज-तमात्मक लहरी खेचून घेण्याच्या संवेदनशीलतेत आणखी वृद्धी करू नये, असे म्हटले जाते; कारण केस धुतांना ते पाण्यातील आपतत्त्वाच्या संपर्काने रज-तमात्मक लहरी खेचून घेण्यात अधिक संवेदनशील बनतात आणि याचा त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. हा नियम स्त्री, तसेच पुरुष या दोघांनाही लागू आहे.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, अधिक वैशाख कृ. १, कलियुग वर्ष ५११२, २९.४.२०१०, दुपारी १२.४२)

४. रासायनिक द्रवरूप साबण (शॅम्पू) आणि आयुर्वेदिक द्रवरूप साबण यांनी केस धुणे (सूक्ष्मातील प्रयोग)

४ अ. केसांना रासायनिक द्रवरूप साबण (शॅम्पू) लावून साध्या पाण्याने आंघोळ करणे

‘मी आषाढ कृ. चतुर्थी (६.७.२००८) या दिवशी केसांना रासायनिक द्रवरूप साबण (शॅम्पू) लावून साध्या पाण्याने आणि नंतर गोमूत्रमिश्रित पाण्याने आंघोळ केली. तसेच दुसर्‍या दिवशी केसांना गोमूत्र लावून साध्या पाण्याने आंघोळ केली. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.

१. डोक्याभोवती काटेरी टोप (मांत्रिकाच्या दृष्टीने कवच) निर्माण झाला आणि तोंडावर क्षती (जखमा) झाल्याचे सूक्ष्मातून दिसले.

२. डोक्यावर चांगल्या संवेदना जाणवण्याचे बंद झाले.

३. प्रत्येक केसाच्या मुळावर आपोआप घण पडतांना दिसले.

४. डोक्यावर सतत उष्णता जाणवत होती.’

– सौ. रजनी, गोवा.

४ आ. आयुर्वेदिक द्रवरूप साबण (शॅम्पू) लावून साध्या पाण्याने आंघोळ करणे

४ आ १. आयुर्वेदिक द्रवरूप साबण (शॅम्पू) केसांना लावला असता पहिल्या दिवशी डोक्यातील पोकळी काळी शक्तीविरहित जाणवणे : ‘मार्गशीर्ष कृ. द्वितीया, कलियुग वर्ष ५११० (१४.१२.२००८) या दिवशी मी आयुर्वेदिक द्रवरूप साबण (शॅम्पू) केसांना लावला असता पहिल्या दिवशी `डोक्यातील पोकळीतील काळी शक्ती अल्प झाली,’ असे जाणवले. नेहमी रासायनिक द्रवरूप साबणाने केस धुतांना डोक्यातील पोकळीत काळी शक्ती असल्याचे जाणवते. त्यापेक्षा आता हे प्रमाण न्यून जाणवले. डोक्यावरील काळ्या शक्तीचे आवरण घटल्याने आश्रमातील ग्रहण झालेले चैतन्य डोक्यातील रक्तात मिसळल्याने त्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवू लागल्या. (रासायनिक शॅम्पूने काळ्या शक्तीचे आवरण वाढल्याचे जाणवते.) सहस्रारचक्रात अधिक प्रमाणात चैतन्य ग्रहण होत असल्याने त्या ठिकाणी शीतलता जाणवत होती.

अ.एका संतांनी ‘आयुर्वेदिक द्रवरूप साबण लावला असता ५-६ मासांनी केसांवर काय परिणाम होतो’, ते पहायला सांगितले. आयुर्वेदिक द्रवरूप साबण ५-६ मास वापरल्यावर केसांमध्ये मऊपणा येऊन तो टिकून राहिल्याचे जाणवले.

आ. इतर सूत्रे
१. आयुर्वेदिक द्रवरूप साबणाने २-३ वेळा केस धुतले, तेव्हा प्रत्येक वेळी डोक्यावरून आंघोळ करतांना केस गळण्याचे प्रमाण न्यून असल्याचे जाणवले होते.
२. रासायनिक द्रवरूप साबणाने केस धुतल्यावर पहिल्यांदा केस चांगले होत असत आणि जसे केस धुण्याचे प्रमाण वाढत असे, तसे त्याचा केसांवर परिणाम होऊन केसांची रूक्षता वाढत असे.’

– सौ. रंजना गडेकर, गोवा.

४ इ. रासायनिक आणि आयुर्वेेदिक द्रवरूप साबण

 

रासायनिक द्रवरूप साबण आयुर्वेदिक द्रवरूप साबण
१. ‘केसांवर होणारे
परिणाम
अ. राठ / मऊ राठपणा येणे मऊ होणे
आ. गळण्याचे प्रमाण अधिक अल्प
२. व्यक्तीवर होणारे परिणाम
अ. त्रासदायक /
चांगल्या संवेदना
काळ्या शक्तीच्या आवरणात
वाढ झाल्याने डोक्याभोवती
जडपणा अन् उष्णता जाणवणे
डोक्यात चांगल्या संवेदना
आणि शीतलता जाणवणे
आ. मुखावर अस्तित्व अनिष्ट शक्तीचे स्वतःचे
इ. प्रकटीकरण वाढल्याचे जाणवणे घट होऊन स्वतःचे
अस्तित्व जाणवणे
३. सूक्ष्मातील परिणाम
अ. गंध आणि त्याचा
परिणाम
कृत्रिमता असल्यामुळे मायावी
गंध निर्माण होणे आणि
जिवाकडे वातावरणातील
काळ्या शक्तीच्या लहरी
खेचल्या जाणे
ईश्वर-निर्मित नैसर्गिक
घटकांपासून बनल्याने
दैवी-गंध असणे आणि
वातावरणातील सत्त्व लहरी
खेचल्या जाणे
३. सूक्ष्मातील परिणाम
आ. काळ्या शक्तीचे
आवरण / कवच
अ. रासायनिक द्रव्यांत तमगुण
असल्याने स्वतःभोवतीच्या
काळ्या शक्तीच्या आवरणात
वाढ होणेआ. डोक्याभोवती काळ्या
शक्तीचे आवरण निर्माण होणेइ. सतत काळी शक्ती ग्रहण
झाल्यामुळे डोक्याभोवती
असलेले काळ्या शक्तीचे
आवरण अधिक बलशाली होणे
अ. नैसर्गिक घटकांपासून
बनल्याने सत्त्वगुणयुक्त
असल्याने आध्यात्मिक
उपाय होणेआ. काळ्या शक्तीचे आवरण भेदले जाणे आणि डोक्या-भोवती पांढरे वलय दिसणेइ. डोक्याभोवती असलेल्या पांढर्‍या वलयामुळे बाहेरून
येणार्‍या काळ्या शक्तीचे आक्रमण परतवले जाणे’

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘केसांची घ्यावयाची काळजी’

Leave a Comment