या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी ‘केस कापणे (भाग १)’ यावर ‘क्लिक’ करा !
प्रस्तूत लेखात आपण चातुर्मासात केस का कापू नये; नखे, केस, दाढी आणि मिशा का वाढू देऊ नयेत. तसेच केस पूर्णपणे का कापू नये; दाढी का कुरवाळू नये इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नांची शास्त्रीय कारणमीमांसा जाणून घेऊ.
५. चातुर्मासात केस का कापू नयेत ?
५ अ. चातुर्मासाच्या काळात पाळावयाचे विधीनिषेध आणि त्यांचे महत्त्व
‘या काळात सर्वत्र रज-तमात्मक वायूमंडलाचा प्रभाव अधिक असल्याने याच काळात सर्वाधिक धार्मिक विधी आणि व्रते करण्यास हिंदु धर्माने सांगून देहातील सत्त्वगुण वृद्धींगत करण्याची योजना केली आहे. देहातील सत्त्वगुणाच्या आधिक्यामुळे जिवाचे वाईट शक्तींपासून रक्षण होते.
५ आ. चातुर्मासाच्या काळात केस कापल्याने होणारी आध्यात्मिक हानी
५ आ १. प्रक्रिया
केस कापल्याने केशनलिका उघड्या पडतात. यामुळे केशनलिकांतील सूक्ष्म रज-तमात्मक नादाचे बाह्य वायूमंडलात वेगाने उत्सर्जन होते.
५ आ २. परिणाम
या नादाकडे मोठ्या प्रमाणात वाईट शक्ती आकृष्ट होउ शकतात आणि जिवाच्या देहमंडलावर आक्रमण करू शकतात.
५ आ ३. आध्यात्मिक स्तरावरील हानी
अ. देहमंडल ज्या वेळी रज-तमात्मक लहरींनी भारित होते, त्या वेळी जीव स्वैराचारी बनतो.
आ. चातुर्मासात रज-तमात्मक लहरींचे बाह्य वायूमंडलात आधिक्य असल्याने या काळात केस कापल्यास केसांच्या उघड्या पडलेल्या केशनलिकांतून मोठ्या प्रमाणात तामसिक स्पंदने जिवाच्या देहात प्रवेश करून जिवाच्या अंतःस्थ पोकळीला दूषित बनवतात.
इ. यामुळे जिवाला मोठ्या प्रमाणात वाईट शक्तींच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तो वासनादर्शक, कृतीदर्शक आणि कर्मदर्शक अशा तीन प्रकारच्या तापांना बळी पडतो. हे ताप वाईट शक्तींच्या हस्तक्षेपाने निर्माण होतात.
ई. तीन प्रकारच्या तापांचे महत्त्व आणि त्यांचे जिवावर होणारे तामसिक परिणाम
ई १. वासनादर्शक ताप (अतृप्त आत्मे, तसेच अतृप्त पूर्वजांचे लिंगदेह यांचा त्रास) : विकृतीदर्शक इच्छाशक्तीच्या माध्यमातून निर्माण होणार्या तापांना ‘वासनादर्शक ताप’ म्हणतात. यात शारीरिक त्रासांचे प्रमाण अधिक असते. या प्रकारात अतृप्त आत्मे, तसेच अनेक पूर्वज वाईट शक्ती यांच्या तापांना, म्हणजेच त्रासांना मानवाला सामोरे जावे लागते.
ई २. कृतीदर्शक ताप (भूते, पिशाच यांचा त्रास) : हे ताप मानवाच्या रज-तमात्मक क्रियमाणातून निर्माण होतात. यात विकृतीदर्शक कृतींचा समावेश अधिक असतो. हे ताप भूते, पिशाच यांच्या उपद्रवापासून उद्भवणारे असतात. यांत शारीरिक त्रासांसह मानसिक त्रासही उद्भवतात.
ई ३. कर्मदर्शक ताप (राक्षस, तसेच बलाढ्य मांत्रिकांचा त्रास) : वरिष्ठ प्रकारचे ताप हे सर्वस्वी आध्यात्मिक प्रकारचे असतात. यांनाच ‘कर्मदर्शक ताप’ असे संबोधतात. विकृतीदर्शक विचारांतून हे ताप निर्माण होतात. यात राक्षस, तसेच बलाढ्य मांत्रिकांचा समावेश असतो. कर्मदर्शक तापांत तन, मन आणि बुद्धी यांवर काळ्या शक्तीचे आवरण येण्याचे प्रमाण अधिक असते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, कार्तिक कृ. ४, कलियुग वर्ष ५१११, ६.११.२००९, रात्री ८.३०)
६. सर्वांनीच केस पूर्णपणे कापणे उपयुक्त नसणे
संकलक : केस हे वातावरणातील रज-तमात्मक लहरी शोषून घेण्याचे कार्य करतात’, असे आपण सांगितले आहे. असे आहे, तर सर्वांनीच केस पूर्णपणे कापणे उपयुक्त ठरेल का ?
विद्वान मांत्रिक : ‘नाही. केसांमुळे डोक्याच्या त्वचेचेही थोड्याफार प्रमाणात रक्षण होते. तसेच काही ठराविक मर्यादेपर्यंत वाईट शक्तींपासूनही रक्षण होते.’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.८.२००४, रात्री ८.१९)
७. नखे, केस, दाढी आणि मिशा का वाढू देऊ नयेत ?
७ अ. वायूमंडलातील वाईट शक्तींचा देहात नव्याने प्रवेश होणे
‘या सर्व घटकांमध्ये रज-तमात्मक आघातस्पंदने सामावलेली असल्याने, तसेच हे घटक वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींना स्वतःकडे आकृष्ट करून स्वतःत घनीभूत करून घेण्यात अग्रेसर असल्याने या स्पंदनांच्या शरिराला होणार्या सततच्या स्पर्शामुळे देहात त्रासदायक लहरींचे सतत संक्रमण होत रहाते आणि देह रजतमात्मक लहरींनी भारित होतो. यामुळे वायूमंडलातील वाईट शक्तींचा देहात नव्याने प्रवेश होण्याची शक्यता बळावते.
७ अ १. सर्वसामान्य पुरुषाने दाढी-मिशा वाढू दिल्याने होणारे सूक्ष्मातील परिणाम दर्शवणारे चित्र
७ आ. रज-तमात्मक स्पंदने वायूमंडलात
उत्सर्जित झाल्याने मृत्यूनंतर तिसर्या पाताळात जावे लागणे
नखे, केस, दाढी आणि मिशा वाढल्यामुळे त्यांची रज-तमात्मक स्पंदने वायूमंडलात उत्सर्जित करण्याची क्रिया वेगात चालू होते. त्यामुळे स्वतःच्या देहासह हा जीव बाह्य वायूमंडलही दूषित करण्यास कारणीभूत ठरतो. अशा प्रकारे वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींच्या संक्रमणाला हातभार लावून समष्टीचे आयुष्यमान धोक्यात आणणे, ही एक प्रकारची पापयुक्त कृती आहे; म्हणून अशी अयोग्य आणि रज-तमात्मक स्पंदने वायूमंडलात पसरवण्यास पूरक ठरणार्या कृतीत सहभागी होऊ नये.
७ इ. देहाची प्रकृती सात्त्विक असणे / नसणे, तसेच वाईट
शक्तींचा जिवाला त्रास असणे / नसणे यांवर दाढी ठेवणे योग्य कि अयोग्य, हे ठरणे
१. वाईट शक्तीचे स्थान
दाढीच्या केसांत रज-तमात्मक लहरी घनीभूत झाल्याने ते एक वाईट शक्तीचे स्थान बनू शकते. या स्थानाच्या साहाय्याने अनेक वाईट शक्ती आपल्या अवतीभवती असलेल्या मंडलात भ्रमण करू शकतात, तसेच आपल्या देहातही शिरकाव करू शकतात.
२. दाढी कुरवाळणे
अनेकांना दाढी कुरवाळण्याची सवय असते. एका परकीय वंशातील राजे अनेकदा दाढी कुरवाळून राज्यव्यवस्थेतील महत्त्वाचे निर्णय घेत असत. प्रकट झालेल्या साधकांतील मांत्रिकही दाढी कुरवाळतांना आढळतात. असे केल्याने दाढीच्या केसांत घनीभूत झालेल्या रज-तमात्मक लहरी जागृत अवस्थेत येऊन दाढीच्या केसांच्या टोकांतून वातावरणात अधिकतम (कमाल) प्रमाणात त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित करून वायूमंडल दूषित बनवतात. हेच वायूमंडल मांत्रिकांना कार्य करण्यास पूरक ठरते.
३. ऋषीमुनींच्या जटा अन् दाढीचे केस यांतून सात्त्विक लहरींचेच वायूमंडलात प्रक्षेपण होणे
सत्ययुगात, म्हणजेच पुराणकाळात ऋषीमुनींच्या प्रकृतीचाच लय झालेला असल्याने आणि तपःसामर्थ्याने त्यांची धारणा शुद्ध, म्हणजेच सात्त्विक झालेली असल्याने त्यांच्या वाढलेल्या जटांतून, तसेच दाढीच्या केसांतून वायूमंडलात सात्त्विक लहरींचेच प्रक्षेपण होते. त्यामुळे वायूमंडल शुद्ध होण्यास साहाय्य होत असे.
म्हणजेच देहाची प्रकृती सात्त्विक असणे आणि नसणे, तसेच जिवाला वाईट शक्तींचा त्रास असणे आणि नसणे, यांवर दाढी ठेवणे आणि न ठेवणे योग्य ठरते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २४.१०.२००७, सायं. ७.१५ आणि २३.२.२००९, दुपारी १.५२)
७ ई. प्रश्न : ‘वडील जिवंत असेपर्यंत पुरुषाने मिशी
काढू नये’, या प्रथेला अध्यात्मशास्त्रीय आधार आहे का ?
उत्तर : ‘याला अध्यात्मशास्त्रीय आधार नाही.’ – डॉ. जयंत आठवले (पौष शु. ५, कलियुग वर्ष ५११२, ९.१.२०११)