केस वाढवणे

पुरुषांनी केस का वाढवू नयेत, तर स्त्रियांनी का वाढवावेत यांविषयी एखाद्याच्या मनात कुतूहल निर्माण होेऊ शकते. याविषयीचे विवेचन प्रस्तूत लेखात केले आहे.

१. पुरुषाने केस वाढवणे

१ अ. सर्वसाधारण पुरुषाने केस वाढवणे आणि साधूने केस वाढवणे यांतील भेद दर्शवणारी सारणी

 

सर्वसाधारण
पुरुषाने केस वाढवणे
साधूने केस वाढवणे
१. ‘प्रतीक उच्छृंंखलता वैराग्य
२. प्रक्षेपण रज-तम तेजदायी लहरी
३. परिणाम वायूमंडल दूषित होणे वायूमंडलात तेजदायी लहरींचे
गोलाकार मंडल बनणे
४. लक्षण वाईट शक्तीच्या त्रासाचे देहबुद्धी न्यून होण्याचे
५. प्रक्रिया केसांतून प्रक्षेपित होणार्‍या
रजतमात्मक लहरींमुळे देहाभोवती
वायूमंडल निर्माण झाल्याने त्यातूनप्रक्षेपित होणार्‍या नादाकडे वाईट शक्ती आकृष्ट होणे
केसांतून प्रक्षेपित होणार्‍या
तेजतत्त्वाशी संबंधित
लहरींमुळे देहाभोवती
संरक्षक-कवच निर्माण
होऊन जिवाचे वाईट
शक्तींपासून रक्षण होणे
६. फलप्राप्ती केसांतून वेगाने प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरींच्या
प्रवाहातून वाईट शक्ती देहात
शिरण्याची भीती असणे
केसांच्या लांबीमुळे देहाचे रक्षण होऊन साधना
करण्यात वाईट शक्तींचा धोका उत्पन्न न होणे
७. काही
कालावधीनंतर
होणारा
परिणाम
केसांच्या माध्यमातून सतत
होणार्‍या रज-तमात्मक लहरींच्या
स्पर्शाने जिवाची चिडचीड वाढणे,
शरीर जड होणे, अंग बधीर होणे
आणि मन सतत अशांत रहाणे
मनात वैराग्यभाव किंवा
संन्यस्त भाव निर्माण होण्यास
साहाय्य झाल्याने साधनेत पुढे
होणारी उन्नती अल्प
कालावधीत शक्य होणे’

 

१ आ. शिखांनी केस वाढवण्याच्या संदर्भातील शास्त्र

प्रश्न : अध्यात्मशास्त्रदृष्ट्या पुरुषांनी केस वाढवू नयेत, असे सांगितले आहे. मात्र शीख समाजात पुरुषांनी केस वाढवण्याची परंपरा आहे. याविषयी शीख पुरुषांनी कसे करावे ?

उत्तर : केस हे रजोगुणाचे प्रतीक आहे. केस वाढवल्याने रजोगुण जास्त प्रमाणात प्रक्षेपित होतो. हिंदु धर्मात काळानुसार अनेक पंथ-उपपंथ, संप्रदाय इत्यादी निर्माण झाले. शीख पंथाची स्थापना प्रामुख्याने हिंदू आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी झाली. हिंदूंमध्ये प्रतिकाराचे सामर्थ्य यावे, एका लढाऊ समाजाची निर्मिती व्हावी, हा शीख पंथाची स्थापना करण्यामागील उद्देश होता. म्हणूनच शीख समाजाची नाळ ही क्षात्रतेजाशी जोडलेली आहे. क्षात्रवृत्ती निर्माण होण्यास रजोगुणी केस साहाय्यभूत ठरतात; म्हणून शिखांमध्ये केस वाढवण्याची रूढी पडली असावी. (पूर्वीच्या काळी राजांचे केस लांब असायचे. याचे कारणही हेच होते.)

त्या त्या पंथातील रूढीनुसार आचरण करणे, हा त्या त्या पंथियांच्या श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धेच्या बळावर त्या त्या रूढीचे पालन केल्यास त्याचे योग्य ते फळ लाभते. यानुसार धर्मपालन करणार्‍या शिखांनी धर्माप्रतीची श्रद्धा म्हणून केस वाढवणे अनुचित ठरणार नाही; परंतु धर्मपालन न करणार्‍या शिखांनी अध्यात्मशास्त्रदृष्ट्या केस कापणे त्यांच्या हिताचे ठरेल.

२. स्त्रीने केस का वाढवावेत ?

२ अ. रजोगुणाच्या कार्याला पोषक आणि पूरक म्हणून स्त्रीने केस वाढवणे आवश्यक

‘स्त्री ही शक्तीस्वरूपतेचे द्योतक आहे. स्त्री ही शक्तीदायिनी असल्याने देहातून रजोगुणाच्या साहाय्याने लांब केसांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या तेजतत्त्वात्मक ऊर्जेचा उपयोग करून शक्तीलहरींचे वायूमंडलात वेगवान प्रक्षेपण करणे शक्य होते. त्या शक्तीलहरींमुळे वायूमंडलातील रज-तमाचे उच्चाटन होते. या शक्तीतत्त्वात्मक कार्याचे प्रतीक, तसेच देहातील रजोगुणाच्या कार्याला पोषक आणि पूरक म्हणून स्त्रीने केस वाढवावेत. हिंदु धर्मात ‘स्त्रीच्या अंगीभूत रजोगुणात्मक प्रवृत्तीला पूरक असणारी कृती म्हणून स्त्रीने केस वाढवावेत’, असे सांगितले आहे.

२ आ. स्त्रीच्या देहातील शक्तीतत्त्वस्वरूपी संवेदना सतत जागृत रहाणे

लांब केसांच्या हालचालींतून निर्माण होणार्‍या क्रियाशक्तीच्या वेगवान लहरी स्त्रीच्या देहातील शक्तीतत्त्वस्वरूपी संवेदना सतत जागृत अवस्थेत ठेवतात. या शक्तीतत्त्वस्वरूपी जागृततेमुळे लांब केस असणारी स्त्री आखुड केस असणार्‍या स्त्रीपेक्षा जास्त शालीन आणि नम्र दिसते.

२ इ. वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून मुक्त राहू शकणे

अ. लांब केसांच्या हालचालींतून तेजतत्त्वरूपी स्पंदनांची निर्मिती होत असल्याने आणि ही स्पंदने लांब केसांच्या पोकळीत दीर्घकाळ स्वरूपात घनीभूत स्वरूपात राहू शकत असल्याने ही तेजरूपी स्पंदने केसांतून शिरकाव करणार्‍या रज-तमात्मक लहरींचे वेळीच विघटन करून त्यांना उच्चाटित करतात. यामुळे देह वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून मुक्त राहू शकतो.

आ. लांब केसांची शक्तीतत्त्वात्मक लहरी ग्रहण करण्याची, तसेच प्रक्षेपित करण्याची क्षमता जास्त असल्याने लांब केसांमुळे स्त्रीचे वायूमंडलातील वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून एक प्रकारे रक्षणच होत असते.

इ. लांब केसांतून भूमीच्या दिशेने वहाणारा क्रियाशक्तीरूपी शक्तीतत्त्वरूपी प्रवाह पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक कंपनलहरींना देहात येण्यापासून अटकाव करतो किंवा अडथळा निर्माण करतो.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १०.७.२००६, सायं. ७.२३, ज्येष्ठ कृष्ण दि्वतीया (२१.५.२००८), दुपारी १२.०७)

२ इ १. स्त्रीने लांब केस ठेवल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

३. पुरुषाने आणि स्त्रीने केस वाढवणे

 

पुरुषाने केस वाढवणे स्त्रीने केस वाढवणे
१. लक्षण उच्छृंखलतेचे शालीनतेचे
२. प्रकृतीला पोषक असणे / नसणे पुरुष हा शिवप्रधान, म्हणजेच संयमी प्रकृतीचा असल्याने त्याच्या स्थिरत्वाकडे झुकणार्‍या प्रकृतीस केस वाढवणे घातक असणे स्त्री ही रजोगुणी शक्तीचे प्रतीक असल्याने केस वाढवणे, हे तिच्यातील रजोगुणाच्या कार्यास पोषक आणि पूरक असणे
३. देहावर होणारा परिणाम केसांतून प्रक्षेपित होणार्‍या रजोगुणी लहरींच्या स्पर्शामुळे सूर्यनाडी सतत कार्यरत राहून देहात उष्णता निर्माण होऊन ती संक्रमित होत राहिल्याने देहातील शुक्रजंतूंचा र्‍हास होणे केसांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजजन्य ऊर्जेच्या स्पर्शामुळे सूर्यनाडी कार्यरत राहून देहातील शक्तीतत्त्व
सतत जागृत अवस्थेत राहिल्याने देहाचेवाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होणे
४. लाभदायक
आध्यात्मिक
पातळी (टक्के)
६० ५०
५. प्रक्रिया आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा न्यून असलेल्या जिवाने केस वाढवल्याने पुरुषातील शिवरूपी स्थिरभाव नष्ट होऊन त्याच्यात उच्छृंखलता येणे आणि तो वाईट शक्तींच्या आक्रमणाला बळी पडण्याची शक्यता असणे आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांपेक्षा न्यून असेल, तर लांब केसांतून प्रक्षेपित होणार्‍या रजोगुणी लहरींमुळे तिचे पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींपासून थोड्या-फार प्रमाणात रक्षण होणे, तसेच या तेजदायी लहरींचा वाईट शक्तींना त्रासही होत असल्याने त्यांनी चिडून तिच्यावर आक्रमण केले, तर ते आक्रमण परतवण्याची तिच्यात क्षमता नसल्याने त्रास होण्याची शक्यता वाढणे
६. वायूमंडलावर
होणारा परिणाम
जिवाच्या देहात निर्माण
झालेल्या दोलायमान
भावामुळे वायूमंडलातही
अस्थिरतेची स्पंदने पसरणे
वायूमंडलातील त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होऊन रजोगुणाच्या प्रक्षेपणामुळे कार्याला वेग येऊन कार्यातील
फलनिष्पत्ती वाढल्याने त्याच्याभोवती असलेल्या वायूमंडलावर परिणाम होऊन वायूमंडलात उत्साह जाणवणे’

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘केसांची घ्यावयाची काळजी’

Leave a Comment