१. संगणकाशी खेळतांनाचे (संगणकावर सेवा करतांनाचे) चित्र
१ अ. चित्र काढण्यामागील पार्श्वभूमी
१. ‘सेवा करतांना भाव कसा ठेवता’, असे एका साधिकेने विचारल्यावर ‘आम्ही श्रीकृष्णाची अजाण बालके असून त्याच्या मांडीवर बसून संगणकासमवेत खेळत आहोत आणि तोच आमच्याकडून संगणकावर काहीतरी करून घेत आहे’, असा भाव ठेवल्याचे सांगणे
‘मी एका साधिकेच्या घरी पंचांग आणि ग्रंथ यांच्या संदर्भातील सेवा करण्यास गेले होते. सेवा करतांना त्यांनी मला ‘तुम्ही कसा भाव ठेवून सेवा करता ?’, असे विचारले. त्या वेळी ‘आम्ही श्रीकृष्णाची बालके आहोत आणि त्याच्या मांडीवर बसून संगणकासमवेत खेळत आहोत. आम्हाला काहीही ठाऊक नसतांना श्रीकृष्णच आमच्याकडून संगणकावर काहीतरी करून घेत आहे आणि नंतर एका अभिमानी पित्याप्रमाणे ‘पुष्कळ छान केले !’, असा शेरासुद्धा आम्हाला देत आहे’, असा भाव ठेवल्याचे मी त्यांना सांगितले.
२. चित्र काढतांना प.पू. डॉक्टरांना ‘सगुणातून निर्गुणाकडे’ जाणे अपेक्षित असल्याचे लक्षात येणे
वरील प्रसंगाचे चित्र काढण्याचा प्रयत्न मी आज करत होते; परंतु ते मला व्यवस्थित जमत नव्हते. त्यानंतर मी ते चित्र वेगळ्या पद्धतीने काढले. त्या वेळी ‘प.पू. डॉक्टरांना मी बालकभाव ठेवण्यासह सगुणातून निर्गुणाकडे जाणेही अपेक्षित आहे’, याची मला जाणीव झाली.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (१९.८.२०१२)
१ आ. चित्राचे वैशिष्ट्य – संगणकासमोर बसून सेवा करणार्या चित्रातील
बालकभावातील साधिकेची सहजावस्था तिच्या हवेतील सहज लोंबकळणार्या पायांतून प्रकट होणे
‘या चित्रातील बालकभावातील साधिकेची सहजावस्था तिच्या देहबोलीतूनही प्रकट होणारी आहे. आपण सहजावस्थेत असलो, तर आपले पाय सहजगतीने हलत असतात आणि अगदी त्याच अवस्थेत हलणारे पाय तसेच हवेत लोंबकळत ठेवून ही बालकभावातील साधिका श्रीकृष्णाला आठवून सेवा करत असल्याचे या चित्रातून स्पष्ट होत आहे. यातूनच या बालकभावातील साधिकेची देहबुद्धीही अल्प असल्याचे स्पष्ट होत आहे.’ – सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०१२)
२. अडचणीला किंवा कठीण प्रसंगाला किंवा अनोळखी व्यक्तींना सामोरे
जातांना किंवा प्रवचन करतांना श्रीकृष्णाच्या शेल्याच्या मागे लपून आश्रय घेणे
२ अ. चित्राचे वैशिष्ट्य – या चित्रात श्रीकृष्णाच्या अंगावरील शेल्याचे टोक बालकभावातील साधिकेने हट्टाने खाली भूमीपर्यंत खेचून घेतल्याप्रमाणे असणे आणि यातूनच तिची श्रीकृष्णाशी असलेली जवळीक स्पष्ट होणे
‘या चित्रात आश्रय घेतांना तिने हाताने पकडलेले शेल्याचे एक टोक दुसर्या टोकापेक्षा बरेच लांब म्हणजे अगदी भूमीपर्यंत लोळणारे दाखवले आहे. यातूनच स्पष्ट होते की, तिने ते हट्टाने श्रीकृष्णाच्या खांद्यावरून ओढून खाली खेचून घेतले आहे. यातूनच तिची श्रीकृष्णाशी असलेली आत्यंतिक जवळीक स्पष्ट होते.’ – सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०१२)
३. एका मंदिरातील विश्वस्ताने बाहेर काढल्यावर श्रीकृष्णाने जवळ घेऊन दुसर्या घरात नेऊन प्रसार करवून घेणे
३ अ. चित्र काढण्यापूर्वीची पार्श्वभूमी
१. मंदिरात प्रदर्शन लावण्याची अनुमती देणार्या विश्वस्तानेच तेथून त्वरित निघून जाण्यास सांगणे
‘२७.११.२०१२ या दिवशी सांता क्लारा (अमेरिका) येथील महाकालेश्वर मंदिरामध्ये आम्हाला (मी आणि तेथील स्थानिक साधक) सनातन पंचांग आणि काही इंग्रजी अन् तामिळ आध्यात्मिक ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्याची संधी मिळाली. मंदिराकडे येणार्या पुष्कळ भक्तांना पंचांग आवडल्याने ‘पैसे घेऊन परत येतो आणि पंचांग घेतो’, असे सांगितले. आम्ही ‘उत्पादनांची विक्री करत असून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी होत आहे’, असे गार्हाणे (तक्रार) मंदिराच्या काही विश्वस्तांनी केले. त्यामुळे प्रदर्शन लावण्याची अनुमती देणार्या व्यक्तीने पंचांगाचे महत्त्व ज्ञात असूनही आम्हाला तेथून त्वरित जाण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही तेथून बाहेर आलो.
२. पुढच्या वेळी प्रदर्शन लावण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याचे आश्वासन दुसर्या विश्वस्ताने देणे
त्या वेळी मंदिराच्या विश्वस्तांपैकी एकाने झालेल्या असुविधेविषयी आमची क्षमा मागून पुढच्या वेळी प्रदर्शन लावण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आणि पंचांगाच्या दोन प्रती विकत घेतल्या.
३. पंचांग देऊन ५ मिनिटांत जाण्याचे नियोजन असतांनाही घरातील दांपत्यांच्या आदरातिथ्यामुळे तेथे अधिक वेळ बसणे आणि त्यांनी १०० डॉलर्सचे साहित्य विकत घेणे
तेथून निघण्यापूर्वी ‘पंचांग घेण्यासाठी परत येतो’, असे सांगून गेलेल्या अन्य एका व्यक्तीला त्यांचे घर जवळच असल्यामुळे ‘तुमच्या घरी पंचांग आणून देतो’, असे दूरभाषवरून सांगितले. त्यांना पंचांग देऊन ५ मिनिटांत घरी जाण्याचे आमचे नियोजन होते; परंतु भगवान श्रीrकृष्णाचे नियोजन वेगळेच होते. त्यांच्या घरी गेल्यावर ते आणि त्यांची पत्नी यांनी कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे आमचे स्वागत केले. त्यांच्याशी आम्ही बराच वेळ बोललो. त्यांनी इंग्रजी ग्रंथ-लघुग्रंथ, तसेच काही पंचांग मिळून १०० डॉलर्सचे साहित्य घेतले. त्या दिवशी एकूण २०० डॉलर्स एवढ्या मूल्याच्या साहित्याचे वितरण झाले होते. भगवान श्रीकृष्णाने केलेल्या या प्रसाराचे आम्ही मूक साक्षीदार होतो. तेथील स्थानिक साधकांची किती विक्री झाली, यापेक्षा पंचांगाच्या माध्यमातून समाजातील किती लोकांपर्यंत चैतन्य पोहोचले, यासाठी धडपड होती.
३ आ. चित्राचा भावार्थ
या चित्रामध्ये मंदिरातील व्यक्तीने आम्हाला त्वरित निघून जाण्यास सांगितल्यावर ‘काय करायचे’, ते न समजल्यामुळे मी आणि एक साधक मंदिराच्या बाहेर थंडीत कुडकुडत रडत उभे आहोत. श्रीकृष्णानेच आम्हाला बाहेर जाण्यास भाग पाडल्याचे आम्हाला ठाऊक असल्याने आम्हाला निघून जायला सांगणार्या त्या व्यक्तीविषयी आमच्या मनात वैरभावना नव्हती. आम्हाला रडतांना पाहून श्रीकृष्णाच्या हृदयाला पाझर फुटून त्याच्याही डोळ्यांत अश्रू आले. त्याने त्वरित आम्हाला कवेत घेऊन एका घरात नेले आणि आरामात बसवून गरम चहाचा पेला दिला. तो चहा घेईपर्यंत श्रीकृष्णानेच प्रसार करून १०० डॉलर्सचे इंग्रजी ग्रंथ आणि पंचांग घेण्यास त्या व्यक्तीला भाग पाडले.’
– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई