ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे (भाग १)

१. मन, बुद्धी आणि अहं व्यापणारी ईश्वराची तीन पावले !

balak_bhav_2_C6_b

‘२६.९.२०१२ या दिवशी वामन जयंतीच्या निमित्ताने लघुसंदेशाद्वारे आलेली श्री. रमेश शिंदे यांना सुचलेली ‘हे ईश्वरा, ज्या प्रमाणे तू स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळ व्यापून टाकले आहेस, त्याप्रमाणे माझे मन, बुद्धी आणि अहं यांनाही तू व्यापून टाक’, ही प्रार्थना वाचून भगवान श्रीकृष्णाने मला हे चित्र रेखाटण्याची प्रेरणा दिली.

१ अ. भूलोक मनाचे प्रतिनिधित्व करत असून ईश्वराने मन व्यापल्यावर सदैव ईश्वरी आनंद मिळणे

भूलोक आपल्या मनाचे प्रतिनिधित्व करतो. जसे आपण आपल्या इच्छेनुसार मातीला कोणताही आकार देऊ शकतो, त्याप्रमाणे आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या मनालाही वळवू शकतो. जेव्हा ईश्वर आपल्या मनाला व्यापतो, तेव्हा भूलोक मोक्षपुरी होऊन आपल्याला सदैव ईश्वरी आनंद देतो.

१ आ. ईश्वराने साधकाच्या बुद्धीला व्यापल्यावर ती व्यापक होऊन त्याला अवघ्या ब्रह्मांडाचे ज्ञान मिळणे

आपले डोके आपल्या बुद्धीचे प्रतिनिधित्व करते. आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत. जेव्हा ईश्वर आपल्या बुद्धीला व्यापतो (वामनाने तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले होते.), तेव्हा आपली बुद्धी व्यापक होत जाते आणि नंतर तो (ईश्वर) आपल्याला अवघ्या ब्रह्मांडाचे (विश्वाचे) ज्ञान देतो. (विश्वाचे ज्ञान प्राप्त होते.)

१ इ. स्वर्गलोक अहंचे प्रतिनिधित्व करत असून ईश्वराने अहंला व्यापल्यावर त्याचा सोऽहंभाव होणे

स्वर्गलोक आपल्या अहंचे प्रतिनिधित्व करतो. मन आणि बुद्धी यांपेक्षा अहं अतिशय सूक्ष्म आहे. जेव्हा ईश्वर आपल्या अहंला व्यापतो, तेव्हा आपल्या अहंचा ‘सोऽहंभाव’ होतो.

१ ई. ईश्वराची ही तीन पावले आपल्याला काय देतात ?

१. ती ३ पावले आपल्याला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य देतात.

२. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन आपल्याला गुणातीत, निर्गुण बनवतात.

३. भूत, भविष्य आणि वर्तमान या तीन्ही काळांच्या पलीकडे जाऊन आपल्याला चिरंतन (अविनाशी) बनवून कालातीत करतात.

४. आपल्या देहातील इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तीन सूक्ष्म नाड्यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला अमृत देतात आणि सहस्राराच्या ठिकाणी आंतरिक शांतीरूपी मधुरस प्रदान करतात.

५. कर्ता, करविता आणि कर्म (कार्य) या त्रिपुटीच्या पलीकडे जाऊन आपले प्रत्येक कर्म हे अकर्म कर्म करवून घेतात.’

– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (४.१.२०१३)

१ उ. चित्राचे वैशिष्ट्य

‘तीन पावलांत विश्व जिंकूनी उरला हरि चराचर व्यापूनी !’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)

२. ईश्वराच्या कृपेमुळे साधकांनी आरंभलेले कलियुगातील समुद्रमंथन

balak_bhav_2_C7_b

२ अ. चित्रामागील पार्श्वभूमी

२ अ १. पू. राजेंद्र शिंदे (सनातनचे सहावे संत पू. राजेंद्र शिंदे) यांनी सांगितल्यानुसार साधिका ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा सनातनचा ग्रंथ वाचत असतांना श्रीकृष्णाने ‘समुद्रमंथन’ या विषयावर ज्ञान देणे

‘अमेरिकेला जाण्याच्या काही दिवस अगोदर पू. राजेंद्र शिंदे यांनी मला सनातनचा ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ वाचायला सांगितला होता. या ग्रंथाचे वाचन करतांना श्रीकृष्णाने ‘समुद्रमंथन’ या विषयावर मला ज्ञान दिले आणि केवळ त्याच्या कृपेमुळेच मला लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.

२ अ २. अमृत मिळवण्यासाठी देव आणि असुर यांनी केलेले समुद्रमंथन !

अमृत मिळवण्यासाठी देव आणि असुर यांनी समुद्रमंथन केले होते. त्यासाठी त्यांनी वासुकी या सर्पाचा दोरीप्रमाणे उपयोग करून तो सर्प मंदार पर्वताभोवती गुंडाळला होता. सर्पाच्या शेपटीकडे देव आणि तोंडाकडे असुर उभे राहिले. भगवान श्रीविष्णूने कूर्मावतार घेऊन हा पर्वत स्वतःच्या पाठीवर धारण केला. अशाप्रकारे समुद्रमंथन होऊन त्यातून मिळालेल्या अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले.

२ अ ३. कलियुगात चालू असलेल्या समुद्रमंथनाचे पालटलेले स्वरूप !

सध्याच्या कलियुगांतर्गत कलियुगातही असेच समुद्रमंथन चालू आहे; परंतु कालानुरूप यातील काही घटकांचे स्वरूप पालटले आहे. हे पालटलेले स्वरूप पुढे देत आहे.

२ अ ३ अ. समुद्रमंथनासाठी असलेले घटक आणि त्यांचा भावार्थ

समुद्रमंथनासाठी असलेले घटक

भावार्थ

१. समुद्र सनातन हिंदु धर्म
२. कूर्मावतार ईश्वर
३. मंदार पर्वत भाव

४. वासुकी सर्प

अ. सर्पाचा डोक्याकडील भाग

आ. शेपटीकडील भाग

साधक करत असलेली व्यष्टी अन् समष्टी साधना

श्रीकृष्णाचा हात

संतांचा संकल्प

५. सर्पाला दोन्ही बाजूंनी पकडणारे साधक आणि साधकांची तळमळ
६. असुर लव्ह जिहादी, धर्मांतर करणारे, भ्रष्टाचारी राजकारणी इत्यादी
७. शिव दोष अन् अहं यांचा नाश करणारा
८. अमृत हिंदु राष्ट्र

२ अ ३ अ १. साधक करत असलेले ‘सनातन हिंदु धर्म’रूपी समुद्राचे मंथन !

सध्या सनातनचे साधक व्यष्टी आणि समष्टी साधनारूपी दोर पकडून श्रीकृष्णाची कृपा अन् संतांचा संकल्प यांच्या साहाय्याने ‘सनातन हिंदु धर्म’रूपी समुद्राचे मंथन करत आहेत. ही दोरी भावरूपी मंदार पर्वताभोवती गुंडाळली असून ईश्वररूपी कूर्मावताराने हा पर्वत स्वतःच्या पाठीवर अतिशय निश्चलतेने धारण केला आहे. आपल्यात ईश्वराप्रती भाव असेल, तेव्हा तोच आपल्याला संसाररूपी भवसागरातून तारून नेतो. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने स्वतःच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला होता आणि गोप-गोपींनी आपापल्या काठ्या लावून त्याला आधार दिला होता, त्याचप्रमाणे साधक तळमळीच्या जोरावर स्वतःची साधना म्हणून श्रीकृष्णाच्या कार्यात सहभागी झाले असून साक्षात् भगवंत साधकांच्या माध्यमातून समुद्रमंथन करत आहे.

 
२ अ ३ अ २. समुद्रमंथनाच्या प्रक्रियेतून साधकांचे दोष आणि अहं ‘हलाहल’ या विषाप्रमाणे प्रकट होणे

आपल्यात तळमळ असते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाची कृपा आणि संतांचा संकल्प कार्यरत होऊन तेच आपली साधना करवून घेतात. या समुद्रमंथनाच्या प्रक्रियेत साधकांचे सर्व दोष आणि अहं ‘हलाहल’ या विषाप्रमाणे प्रकट होतात, म्हणजे उफाळून येतात. लयाचे प्रतीक असलेला भगवान शिव साधकांचे प्रकट झालेले दोष आणि अहं यांना नष्ट करतो.

२ अ ४. असुरांनी मंथनाच्या प्रक्रियेत अडथळे आणूनही भगवंतानेच या मंथनाचे दायित्व घेतले असल्याने ‘हिंदू राष्ट्र’रूपी अमृत प्राप्त होणार असणे

आधीच्या युगातील समुद्रमंथनाच्या प्रक्रियेत देव आणि असुर या दोघांचा सहभाग होता. आताच्या या घोर कलियुगात असुर लव्ह जिहादी, धर्मांतर करणारे, गोहत्या करणारे, मंदिर-अधिग्रहण करणारे, भ्रष्टाचारी राजकारणी आदींच्या रूपात अस्तित्वात असून ते साधकांच्या मंथनाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करत आहेत. असे असले तरी, ईश्वराची कृपा असल्यामुळे हे मंथन कोणीही थांबवू शकत नाही; कारण ज्या भगवंताने केवळ संकल्पाने एका क्षणात संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली, त्याच्यासाठी हे मुळीच अशक्य नाही. त्यामुळे त्याने स्वतःच या मंथनाचे दायित्व घेतले आहे. श्रीकृष्ण या मंथनातून साधक आणि धर्माभिमानी यांच्या प्रयत्नांचे फळ म्हणून ‘हिंदू राष्ट्र’रूपी अमृत भेट देणार आहे.

हे चित्र काढतांना आणि त्याविषयी चिंतन करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. प.पू. डॉक्टर, मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे; कारण इतक्या दूर (अमेरिकेत) असूनही तुम्हीच माझी काळजी घेत आहात. मला तुमच्या चरणांशी सतत रहाता येऊ दे, हीच प्रार्थना !’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (१२.१०.२०१२)

२ आ. चित्राचे वैशिष्ट्य

‘साधकांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णच वासुकी नागाच्या दोन्ही बाजूला उभे राहून नागाची दोन्ही टोके ओढत आहे. साधकांच्या चित्तसमुद्राचे मंथन करून अहंकार, दोष आणि अज्ञान यांची मलीनता हलाहल विषाच्या रूपाने चित्तसमुद्रातून बाहेर पडते. श्रीकृष्णच शिव बनून विषप्राशन करतो. श्रद्धापूर्ण चिकाटीने समुद्रमंथनरूपी साधना करून विष बाहेर पडले की, चित्तशुद्धी होते. शुद्ध चित्तामध्ये भगवंताचे आगमन होते. भगवान श्रीकृष्ण ज्ञानाचा अमृतकलश घेऊन साधकांच्या चित्तात प्रविष्ट होऊन त्यांना क्षणोक्षणी ज्ञानामृताचा आनंद पाजत आहे.’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग २) (धर्मसंदेश देणारी श्रीकृष्णाची चित्रे अनुभूतींसह)’

Leave a Comment