४. श्रीकृष्णाने समृद्ध अशी स्वर्गभूमी दाखवून
भोगभूमी आणि योगभूमी यांतील भेद लक्षात आणून देणे
४ अ. चित्राची पार्श्वभूमी
‘अमेरिकेत मुलीकडे आल्यापासून साधारण एक आठवडा मी एकही आध्यात्मिक उपाय केला नाही. त्यामुळे माझ्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आले आणि मी बालकभावाचे एकही चित्र काढू शकले नाही. मला नवीन ठिकाणी एकटे सोडून दिल्यामुळे मी श्रीकृष्णाला काकुळतीने विनवत होते. त्या वेळी श्रीकृष्ण प्रत्येक क्षणी माझ्यासमवेत असून मलाच त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नसल्याचे त्याने लक्षात आणून दिले.
४ आ. चित्राचे विश्लेषण
१. भूमातेचे औदार्य आणि तिची भरभरून देण्याची वृत्ती लक्षात येणे
चित्रात मी श्रीकृष्णाच्या खांद्यावर बसून फिरतांना मार्गाच्या एका बाजूला पिकलेल्या भोपळ्यांनी बहरलेले, तर मार्गाच्या दुसर्या बाजूला सूर्यफुलांनी बहरलेले शेत दिसले. यावरून भूमातेचे औदार्य आणि तिची भरभरून देण्याची वृत्ती लक्षात आली.
२. भोपळ्यांना चित्र-विचित्र आकार देऊन त्यांचा उपयोग ‘हॅलोविन’ नावाच्या वाईट शक्तींना आकर्षित करणार्या उत्सवामध्ये केला जाणे
पाश्चिमात्य देशांत साजर्या केल्या जाणार्या ‘हॅलोविन’ नावाच्या वाईट शक्तींना आकर्षित करणार्या उत्सवामध्ये याच भोपळ्यांना चित्र-विचित्र आकार देऊन त्यांचा उपयोग केला जातो.
(‘हॅलोविन’ किंवा ‘ऑल हॅलोस इव्ह’ हा उत्सव पाश्चात्त्य लोक ३१ ऑक्टोबर या दिवशी साजरा करतात. या वेळी पिकलेला लाल भोपळा कोरून विक्षिप्त आकाराचे तोंडवळ्याप्रमाणे दिसणारे कंदील बनवून ते घराच्या पुढच्या बाजूला लावतात. तसेच स्वतःही विचित्र आणि भयावह वेश परिधान करतात. या दिवशी इतरांना घाबरवणे, भयानक गोष्टी सांगणे, भयानक चित्रपट पहाणे किंवा भुतांनी पछाडलेल्या ठिकाणी जाणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. – संकलक)
३. श्रीकृष्णाने भोगभूमी आणि योगभूमी यांतील भेद सांगणे
या चित्रात श्रीकृष्णाने मला सर्वत्र समृद्धी असलेली अशी पाश्चात्त्यांची भोगभूमी, म्हणजेच सुखसुविधांनी संपन्न असलेली स्वर्गभूमी दाखवली. त्याद्वारे श्रीकृष्णाने प्रवृत्ती मार्गाकडे नेणारी ही स्वर्गभूमी आणि निवृत्ती मार्गाकडे नेणारी हिंदूंची पुण्यभूमी, म्हणजेच योगभूमी यांतील भेद मला सांगितला.
पाश्चात्त्यांची भोगभूमी |
हिंदूंची योगभूमी |
|
१. वातावरण |
रज-तमात्मक | सात्त्विक |
२. रहाणीमान |
जेवण, वेशभूषा, भाषा इत्यादी सर्व गोष्टींत रज-तमाचे प्राबल्य (रज-तमयुक्त) असणे | जेवण, वेशभूषा, भारतातील भाषा इत्यादी सर्व गोष्टी सात्त्विक (सत्त्वप्रधान) असणे |
३. मनाची स्थिती |
सर्व सुखसुविधांनी युक्त अशा जीवनाचा मनाला मोह होणे आणि मन अधिकाधिक मायेत अडकणे | कोणत्याही सुखसुविधा उपलब्ध नसल्यामुळे मनाला प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेणे शक्य होऊन परिणामी ते हळूहळू अध्यात्माकडे वळणे |
४. सत्संग |
सत्संग मिळण्याची शक्यता जवळजवळ नसणे | जिज्ञासूंना अगदी सहजतेने सत्संग मिळणे |
५. संतांचा जन्म |
नसणे | ऋषीमुनी, संत आणि अवतारी पुरुष यांची जन्मभूमी असणे |
६. पंथ/ धर्म अ. आ. |
पंथ मानवनिर्मित असणे लोक आचरत असलेला हा पंथ इतरांना सामावून न घेणारा, म्हणजेच व्यापक नसून मर्यादित असणे |
‘सनातन’ धर्म ईश्वरनिर्मित असून तो नित्य नूतन असणे, म्हणजेच त्याला जन्म किंवा मृत्यू नसणे सनातन हिंदु धर्म केवळ ‘धर्म’ नसून ती एक जीवनपद्धती असून ती सर्वांना सामावून घेणारी, विशाल आणि व्यापक असणे |
७. सण- उत्सवांमुळे |
उत्सव साजरे करण्यामागे कोणतेही आध्यात्मिक महत्त्व नसणे, वास्तविक येथे होत असलेल्या उत्सवांच्या माध्यमातून वाईट शक्तींचे आक्रमण होणे | प्रत्येक सण किंवा उत्सव याच्यामागे आध्यात्मिक महत्त्व असून त्यांतून व्यक्तीला आध्यात्मिक लाभ मिळणे |
८. जीवनाची वाटचाल |
प्रवृत्तीमार्गाकडे होणे | निवृत्तीमार्गाकडे होणे |
४. लक्षात आलेली अन्य सूत्रे
अ. भारतातील थोड्याफार प्रमाणात वाळलेल्या आणि लहान आकाराच्या कोथिंबिरीच्या पानांचा सुगंध पाश्चात्त्य देशात उपलब्ध असलेल्या ताज्या अन् मोठ्या आकारातील कोथिंबिरीच्या पानांच्या सुगंधापेक्षा अधिक असतो.
आ. भारतात आढळणार्या खारींपेक्षा पाश्चात्त्य देशातील खारी आकाराने मोठ्या असतात; परंतु भारतातील खारींच्या पाठीवर श्रीरामाने प्रेमाने हात फिरवल्यामुळे उमटलेले सोनेरी रंगाचे तीन पट्टे येथील खारींच्या पाठीवर नाहीत.’
– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (१.१०.२०१२, पहाटे ४)
४ इ. चित्राचे वैशिष्ट्य
‘पुण्यबळाचा संचय करून सुखभोगात बुडून गेलेल्या जिवांपेक्षा पुण्यबळ क्षीण असूनही भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रामाणिकपणे सतत धडपड करणारा सामान्य साधक देवाला अतिशय प्रिय आहे. प्रारब्धानुसार मिळणार्या स्वर्गसुखात न अडकता मनुष्याने क्रियमाणाचा योग्य वापर करून भगवंताच्या प्राप्तीसाठी कष्ट केले, तर अंतरंगात भक्तीचा मळा फुलून येतो. पुण्याच्या बळावर साधना करण्यापेक्षा सेवाभावाने केलेली दास्यभक्ती भगवंताला सर्वांत प्रिय असल्याची शिकवण चित्रातून मिळते.’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)
५. भारतात साजरा होणारा ‘नवरात्रोत्सव’
अन् पाश्चात्त्य देशांत साजरा होणारा ‘हॅलोविन’ यांमधील भेद
ऑक्टोबर मासात भारतात नवरात्रोत्सव, तर अमेरिकेत ‘हॅलोविन’ साजरा केला जातो. ‘हॅलोविन’ संदर्भातील काही विचित्र गोष्टी मला अमेरिकेत सर्वत्र पहावयास मिळत आहेत. या विविध गोष्टींचा अभ्यास करायला सांगून ‘भगवान श्रीकृष्ण मला काही तरी शिकवत आहे आणि यातूनच तो मला सतत शिकण्याच्या स्थितीत कसे रहायचे, हे सांगत आहे’, असे मला वाटले.
या दोन भिन्न भूखंडांमध्ये साजरा होणार्या परस्परविरोधी दोन उत्सवांतून भगवान श्रीकृष्णाने मला पुढील गोष्टी शिकवल्या.
अमेरिकेतील ‘हॅलोविन’ |
भारतातील ‘नवरात्रोत्सव’ |
|
१. सजावटअ. प्रवेशद्वार आ. घर इ. दिवा लावणे |
सर्वसाधारणपणे मृतदेहावर वाहिल्या जाणार्या पुष्पचक्रने सजवले जाते.
कृत्रिम कोळी, जळमटे, भुते, थडग्यावरील दगड, हाडांचे सांगाडे इत्यादी तामसिक गोष्टींनी घराची सजावट करतात.
वातावरणात तमोगुणी (त्रासदायक) स्पंदने प्रक्षेपित करणारा, पिकलेला लाल भोपळा कोरून त्यापासून बनवलेल्या विक्षिप्त आकाराच्या तोंडवळ्याचा दिवा लावला जातो. |
रांगोळी काढून झेंडूच्या फुलांनी सजवले जाते. त्यामुळे चैतन्याच्या लहरी आकृष्ट होऊन वाईट शक्तींना आत येण्यापासून प्रतिबंध होतो. आंब्याची पाने, फुले यांनी घराची सजावट करतात. त्याचप्रमाणे देवता, भक्त यांच्या प्रतिकृती आणि पारंपारिक बाहुल्या यांची मांडणीही करतात. वातावरणात चैतन्याच्या लहरी प्रक्षेपित करणारा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला जातो. |
२. मुलांची वेशभूषा |
जादूगार, व्हँपायर (रक्तशोधक वटवाघूळ), चेटकीण, भुते, हाडांचे सांगाडे अशी तामसिक वेशभूषा केली जाते. | श्रीकृष्ण, दुर्गादेवी यांसारख्या देवतांसारखी किंवा मीरा, अंडाळ या भक्तांसारखी सात्त्विक वेशभूषा केली जाते. |
३. मुलांसाठी देण्यात येणारा प्रसाद / खाऊ |
मुले फसवणूक करून किंवा घरोघरी जाऊन तामसिक आणि शरिराला अपायकारक अशा चॉकलेटची मागणी करतात. | मोड आलेल्या कडधान्यांपासून प्रसाद बनवतात. तो पौष्टिक आणि सात्त्विक असतो. |
४. परिणामअ. आ. |
मुलांच्या मनावर तामसिक संस्कार बिंबवले जातात. कोणतीही पूजा किंवा विधी होत नसल्यामुळे |
लहान मुलांच्या मनावर सात्त्विक संस्कार बिंबवले जातात. या काळात करण्यात येणारे विविध पूजाविधी, तसेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवींची पूजा यांमुळे मन अंतर्मुख होण्यास साहाय्य होते.’ |
– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (६.१०.२०१२)
५ अ. चित्राचे वैशिष्ट्य
‘भगवान श्रीकृष्णाने त्याच्या परमभक्ताला, म्हणजेच अर्जुनाला गीतादर्शन करून सूक्ष्म-जगताचे ज्ञान दिले होते. त्याचप्रमाणे त्याने प्रिय बालिका भक्तास अध्यात्मजगतात मुक्तविहार करण्यासाठी स्वतःसमवेत घेतले आणि रज-तम प्रधान आसुरी कृती अन् सत्त्वप्रधान दैवी कृती यांतील भेद आणि त्यांचे परिणाम यांविषयीचे ज्ञान साजर्या होणार्या दोन सणांच्या स्थूल अन् सूक्ष्म दर्शनाद्वारे करून दिले आहे.’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)