हाताच्या बोटात अंगठी घालण्याचे महत्त्व, तसेच स्त्रियांनी आणि पुरुषांनी कोणत्या बोटात अंगठी घालावी, याविषयीचे विवेचन या लेखातून समजून घेऊया.
१. इतिहास
हाताच्या एका बोटात किंवा अनेक बोटांत अंगठी घालण्याची पद्धत प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे आढळून येते. अंगठीवर स्वतःचे नाव कोरून तिचा उपयोग मुद्रा म्हणून करण्याची पद्धत रामायणा इतकी प्राचीन (त्रेतायुगापासून प्रचलित) आहे. हनुमान सीतेच्या शोधासाठी निघालेला असतांना श्रीरामाने आपल्या नावाची अंगठी ‘खूण’ म्हणून सीतेला देण्यासाठी त्याच्याकडे दिली होती.
२. उपयोग
अ. राजमुद्रा
पूर्वीच्या काळी राजे आपले चिन्ह अंगठीवर खोदून त्याचा छाप (शिक्का) आणि खूण (राजमुद्रा) म्हणून वापर करत. यामुळे अंगठीला ‘मुद्रिका’ असेही म्हटले जाते.
आ. संरक्षण
‘अंगठी हा केवळ हाताच्या बोटांचे सौंदर्य वाढवणारा एक अलंकार नसून तिच्यामागे संरक्षणाची कल्पनाही आहे.
१. मंतरलेली अंगठी (मंत्राने सिद्ध केलेली) बोटात घातल्याने पिशाचादिकांची बाधा होत नाही.
२. अंगठीमुळे बोटाचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून संरक्षण होते.’
– ईश्वर ( कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ८.१५)
इ. साधनेला पूरक
१. ‘अंगठी’ या माध्यमाद्वारे जीव इच्छाशक्तीच्या अधीन न जाता नियंत्रणात रहातो. या माध्यमामुळे जिवाला पंचज्ञानेंद्रियांवर नियंत्रण ठेवता येते.’
– श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, ३.९.२००५, रात्री ११.४०)
२. ‘अंगठीतील चैतन्यामुळे बोटांच्या मऊ भागावर दाब येऊन बिंदूदाबनाचे (अॅक्युप्रेशरचे) उपाय होतात आणि तेथील काळ्या शक्तीचा अडथळा दूर होऊन प्रत्येक बोटात चैतन्य पोहोचते.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ८.१५)
३. चांदीची आणि सोन्याची अंगठी
चांदीची अंगठी |
सोन्याची अंगठी |
|
१. व्यक्त होणारा घटक | रजोगुणप्रधानता | तेजाची कार्यमानता |
२. परिणाम | चांदीच्या रजोगुणी धर्मानुसार सतत क्रियाशील रहाता येणे | सोन्यातील तेजाच्या प्रवाहीपणाच्या स्पर्शाने उजवी नाडी कार्यमान अवस्थेत राहून सतत कार्यप्रवण रहाता येणे |
३. लाभ | चांदीतील रजोधर्मामुळे क्रियाशीलता वाढणे | सोन्यातील तेजाने देहाचे रक्षण |
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३१.१२.२००७, दु. ४.४९)
४. अंगठीच्या विविध धातूंनुसार मिळणार्या चैतन्याचे प्रमाण
धातू |
चैतन्याचे प्रमाण (टक्के) |
१. ‘सोने | ७० |
२. चांदी | ३५ |
३. तांबे | १५ |
४. पंचधातू | २५ |
५. इतर | ३ |
५. अंगठीच्या आकारानुसार तिच्यातून कार्यरत होणार्या चैतन्याचे प्रमाण
अंगठ्यांचे विविध आकार |
चैतन्याचे प्रमाण (टक्के) |
१. नागाकृती | ०.५ |
२. चौकोनी | २५ |
३. आयताकृती | ४५ |
४. वर्तुळाकृती | ३० |
५. त्रिकोणाकृती | ५० |
६. विविध चिन्हांकित अंगठ्यांमधून मिळणार्या चैतन्याचे प्रमाण
इंग्रजीशब्द |
ॐ |
स्वस्तिक |
गुरुकृपायोगाचे बोधचिन्ह (टीप १) |
|
१. स्त्रीला मिळणार्या चैतन्याचे प्रमाण (टक्के) | ०.५ | २५ | ३० | ५० |
२. पुरुषांना मिळणार्या चैतन्याचे प्रमाण (टक्के) | ०.३ | ४० | २० | ५० |
टीप १ – गुरुकृपायोगाचे चिन्ह हे सनातन संस्थेचे बोधचिन्ह आहे. ‘शिष्याला मोक्षप्राप्ती ही केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते’, असा या बोधचिन्हाचा अर्थ आहे.
७. अंगठी विविध बोटांमध्ये घातल्यावर ग्रहण होणार्या चैतन्याचे प्रमाण
बोट |
चैतन्याचे प्रमाण (टक्के) |
१. अंगठा | १५ |
२. तर्जनी | २५ |
३. मध्यमा | ४० |
४. अनामिका (टीप १ ) | ५० |
५. करंगळी | १०’ |
टीप १ – अलंकार हे श्रीविष्णूच्या क्रियाशक्तीचे प्रतीक आहे. तसेच अनामिका हे जिवाच्या कर्मयोगाचे प्रतीक आहे, म्हणजे जिवाने योग्य कर्म करणे, या अर्थाने त्या बोटामध्ये अंगठी घालण्यामागील उद्देश असू शकतो.
– एक अज्ञात शक्ती
८. अंगठी अनामिकेत का घालावी ?
अ. अंगठी अनामिकेत घातल्यावर चैतन्य ग्रहण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.
आ. ‘अंगठी प्रवाहीपणाचे प्राबल्य दर्शवणार्या आपतत्त्वाचे दर्शक असलेल्या अनामिकेत घातली जाते; कारण जिवाचा देहसुद्धा पृथ्वी आणि आप तत्त्वाच्या प्राबल्याने बनलेला असल्याने जिवाला अंगठीच्या प्रवाहीपणाच्या स्तरावर लाभ मिळू शकतो.
इ. जिवाच्या मूळ प्रकृतीदर्शक पृथ्वी-आपतत्त्वधारकतेला धरून बोटांतील आपतत्त्वधारकतेच्या संयोगाने कार्य करणार्या अनामिकेतच सोने किंवा चांदी यांची अंगठी घातली, तर जास्त लाभदायक ठरते.
ई. आपतत्त्वाच्या प्रक्षेपणाचे आणि संवर्धनाचे प्रतीक असलेल्या अनामिकेत सोन्या-चांदीपासून बनवलेल्या अंगठ्या घालणे श्रेयस्कर आहे.
९. पुरुषांनी उजव्या हाताच्या, तर स्त्रियांनी डाव्या हाताच्या अनामिकेत अंगठी घालणे योग्य
पुरुषत्वरूपी क्रियाधारकता स्वयं-क्रियेचे प्रतीक असल्याने पुरुष उजव्या नाडीचे प्रतिनिधित्व करणार्या उजव्या हाताच्या अनामिकेत अंगठी घालतात, तर स्त्रिया कर्मप्रधानस्वरूपाचे प्रतीक असल्याने डाव्या नाडीचे प्रतिनिधित्व करणार्या डाव्या हाताच्या अनामिकेत अंगठी घालतात. डावी नाडी तारक, म्हणजेच कर्मप्रधान आहे, तर उजवी नाडी मारक, म्हणजेच कृतीप्रधान आहे.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३१.१२.२००७, दुपारी ४.४९)
१०. उद्देशानुसार अंगठी विविध बोटांत घालणे
ग्रहपीडा टाळण्यासाठी ज्योतिषी वेगवेगळ्या ग्रहांच्या अंगठ्या घालण्यास सांगतात. या अंगठ्या त्या त्या ग्रहाशी संबंधित बोटात घालायच्या असतात.
११. सोन्याची अंगठी (सात्त्विकता : २ टक्के) घालून केलेले सूक्ष्मातील प्रयोग
एका साधिकेची सोन्याची अंगठी वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने घालून हा प्रयोग केला आहे.
अ. अंगठी हातात घेतल्यावर
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप चालू झाला.
आ. अंगठी बोटात घातल्यावर
बोटापासून खांद्यापर्यंत चांगल्या शक्तीचा प्रवाह जात आहे’, असे वाटणे
अंगठी डाव्या हाताच्या अनामिकेत घातल्यानंतर मला ढेकरा आल्या. नंतर जिभेवर आणि बोटाच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवू लागल्या. ‘बोटापासून खांद्यापर्यंत चांगल्या शक्तीचा प्रवाह जात आहे’, असे वाटले. तो गळ्यापर्यंत जाऊन ‘वाईट शक्तीने तिथे साठवलेली काळी शक्ती बाहेर पडत आहे’, असे वाटले.
२. अंगठीतून चांगली शक्ती संक्रमित होऊन ती श्वासनलिकेला जोडली जाणे आणि त्यामुळे त्याठिकाणीही चैतन्य पसरून घशाला आलेला शुष्कपणा उणावणे
अंगठीतून चांगली शक्ती संक्रमित होऊन हातातून वरच्या दिशेने श्वासनलिकेला जोडली गेली. त्यामुळे त्या ठिकाणीही चैतन्य पसरून घशाला आलेला शुष्कपणा उणावला आणि गळ्याकडील भागही चांगल्या शक्तीने भारित वाटू लागला. तेव्हा गळ्यावरील ताण न्यून होऊन त्या ठिकाणी मोकळे वाटू लागले.
इ. अनुभूती
लिखाण टंकलिखित करतांना बोटांची हालचाल वेगाने होणे आणि हातात जिवंतपणा वाटून हाताचे अस्तित्व वेगळे वाटणे
वरील लिखाण टंकलिखित करतांना माझ्या बोटांची हालचाल वेगाने होत होती. तेव्हा हातात जिवंतपणा वाटून हाताचे अस्तित्व वेगळे वाटत होते. ‘अंगठीमुळे माझी प्राणशक्ती वाढत आहे’, असे वाटले.
नमस्काराची मुद्रा करतांना अंगठी घातलेल्या हातातून पांढरा प्रकाश बाहेर पडतांना दिसला.’ – एक साधिका
ई. प्रयोगाचा निष्कर्ष
चांगली आध्यात्मिक पातळी असलेल्या व्यक्तीची अंगठी सात्त्विक स्पंदनांनी भारित झालेली असते. अशा सात्त्विक अंगठीमुळे साधिकेला चांगल्या संवेदना जाणवणे, नामजप चालू होणे यांसारख्या अनुभूती आल्या, तसेच शरिरातील काळी शक्ती बाहेर पडून तिला हलके वाटले.’