ब्रश वापरण्यापेक्षा बोटाने दात का घासावेत ?

सध्या ब्रशने दात घासण्याची पद्धत अतिशय प्रचलित आहे. ब्रश वापरण्यापेक्षा बोटाने दात घासावेत; ब्रशने दात घासल्याने होणारे तोटे; तसेच बोटाने, आणि त्यातही अनामिकेने दात घासल्याने होणारे लाभ काय हे या लेखातून जाणून घेऊयात.

दात घासण्याची क्रिया

१. एका ठिकाणी उकिडवे बसून अथवा उभे राहून दात घासावेत

एका ठिकाणी उकिडवे बसून अथवा उभे राहून दात घासल्याने ते योग्यरीत्या घासले जातात; म्हणून फिरत फिरत दात घासू नयेत.

२. ब्रश वापरण्यापेक्षा बोटाने दात घासावेत.

२ अ. सजीव बोट शरिराला जास्त जवळचे असणे

निर्जीव ब्रशपेक्षा सजीव बोट शरिराला जास्त जवळचे असते.

२ आ. ब्रशने घासून पृथ्वीतत्त्वप्रधान दातांची काळजी घेण्यापेक्षा हाताच्या बोटाने आपतत्त्वप्रधान हिरड्यांची काळजी घेणे जास्त उपयुक्त, तसेच लाभदायक असणे

ब्रशने दात घासल्यास केवळ दातच स्वच्छ होतात आणि दोन दातांमध्ये असलेले अन्नकण बाहेर येतात; मात्र ज्या हिरड्यांत दातांचा उगम होतो, त्या हिरड्यांवर ब्रशचा काहीच परिणाम होत नाही. हिरड्या चांगल्या असतील, तर दात चांगले असण्याची शक्यता जास्त असते. बोटाने दात घासतांना दात स्वच्छ होतातच, तसेच बोटांमुळे हिरड्यांचे आपोआप मर्दन होते आणि त्यांना आरोग्य लाभते. पृथ्वीतत्त्वापेक्षा आपतत्त्व जास्त सूक्ष्म असल्याने ते जास्त प्रभावशाली असते. याप्रमाणेच पृथ्वीतत्त्वप्रधान दातांपेक्षा आपतत्त्वप्रधान हिरड्यांची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे असते.

२ इ. ब्रशने दात घासण्यापेक्षा बोटाने किंवा दातूनने स्वच्छ केल्याने शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर लाभ होणे

१. ‘ब्रशचे केस कृत्रिम असल्यामुळे त्यांतून रज-तम कणांचे प्रक्षेपण होते. ब्रशच्या केसांच्या स्पर्शामुळे हिरड्या आणि दात यांवर रज-तम लहरींचे आवरण निर्माण होते. त्यामुळे दात केवळ स्थुलातून स्वच्छ होतात; परंतु सूक्ष्मातून ते अस्वच्छच असतात. याउलट बोटाने दात घासल्यावर देहातील चांगल्या शक्तीचे बोटाच्या पेरातून प्रक्षेपण होऊन हिरड्यांमध्ये संक्रमण होते. या प्रक्रियेमुळे हिरड्या आणि दात यांना सात्त्विकतेचा लाभ होतो. त्यामुळे दात स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही स्वच्छ होतात.

२. बोटाच्या पेराचा हिरड्यांवर दाब आल्यामुळे हिरड्यांचे मर्दन केल्याप्रमाणे परिणाम होतो. त्यामुळे हिरड्या बळकट होण्यास साहाय्य होते.

३. कडुलिंबाच्या काड्यांचा ‘दातून’ म्हणून वापर केल्यामुळे दात चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात, तसेच कडुलिंबातील रस आणि चैतन्य यांचा लाभ हिरड्या अन् दात यांना होऊन ते बळकट होतात.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री १०.४०)

२ ई. दात घासतांना कुठल्या बोटाचा वापर करावा ?

२ ई १. ‘आचारेन्दु’ या ग्रंथात सांगितलेली पद्धत

अनामाङ्गुष्ठावुत्तमौ ।
मध्यमायाः कनिष्ठिकायाश्च विहितप्रतिषिद्धत्वाद् विकल्पः ।
तर्जनी तु सर्वमते निन्द्या । – आचारेन्दु

अर्थ : दंतमंजन अनामिका आणि अंगठा यांनी लावणे उचित होय. मध्यमा आणि कनिष्ठिका यांचा काही ठिकाणी निषेध सांगितला असल्याने त्यांचा वापर विकल्पाने करू शकतो. तर्जनी मात्र सर्वांच्या मते निंद्य असल्याने तिचा वापर करू नये.

अधिक विश्लेषण –
अ. दात घासतांना अनामिकेचा उपयोग करावा. काही कारणास्तव अनामिकेचा उपयोग करू शकत नसलो, तर मध्यमा किंवा कनिष्ठिका यांचा उपयोग करावा.

आ. दात आतून घासतांना अंगठ्याचा उपयोग करावा.

२ ई २. मधल्या बोटातून प्रक्षेपित होणार्‍या तेजदायी तत्त्वामुळे हिरडी आणि दातांच्या पोकळ्या यांतील रज-तमयुक्त कणांचे विघटन होणे

‘आयुर्वेदिक चूर्णाने हाताच्या मधल्या बोटाने बाहेरच्या अंगाने दात घासतांना मधल्या बोटातून प्रक्षेपित होणार्‍या तेजदायी तत्त्वाच्या बळावर हिरडी आणि दातांच्या पोकळ्या यांतील रज-तमयुक्त कणांचे घर्षणाच्या क्रियेतून निर्माण झालेल्या तेजाच्या साहाय्याने तेथेच विघटन होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

२ उ. अनामिकेने (करंगळीजवळील बोटाने) दात घासल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर ‘क्लिक’ करा !

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (पौष कृ. १२, कलियुग वर्ष ५१११ (११.१.२०१०))

२ उ १. सूक्ष्म-ज्ञानविषयकचित्रातील चांगली स्पंदने : २ टक्के’
– प.पू. डॉ. आठवले

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर ‘क्लिक’ करा !

२ ऊ. ब्रशने दात घासणे आणि अनामिकेने दात घासणे यांमुळे होणारे सूक्ष्मातील परिणाम

‘पुढील सारणीतील आकडे टक्क्यांमध्ये आहेत.

 

<!–

–>

ब्रशने दात घासणे अनामिकेने दात घासणे
१.चैतन्य १.२५
२.शक्ती
३.त्रासदायक शक्ती दूर होणे ०.२५
४.
वाईट शक्ती आकर्षित होणे
अ.त्रासदायक
आ.मायावी
२.७५

४.स्पंदनांचे कारण अ. ब्रशसारख्या कृत्रिम आणि निर्जीव घटकामध्ये पंचतत्त्वे आकृष्ट करण्याची क्षमता नसणे

आ. ब्रश हा प्लास्टिकसारख्या रासायनिक घटकांपासून बनलेला असल्यामुळे आणि दात घासतांना वापरण्यात येणारी पेस्ट हीही रासायनिक द्रव्यांपासून बनलेली असल्यामुळे त्यांमध्ये त्रासदायक स्पंदने आकृष्ट होणे

बोटासारख्या सजीव घटकामध्ये पंचतत्त्वे आकृष्ट करण्याची क्षमता असणे (टीप १)

बोटांमध्ये देहातील पंचतत्त्वांत्मक शक्ती सामावलेली असणे आणि दंतमंजनामध्ये नैसर्गिक अन् सत्त्वप्रधान घटक, उदा. कडुनिंब, त्रिफळा, बाभूळ, खैर इत्यादी असल्यामुळे त्यांमध्येही चांगल्या शक्तीची स्पंदने आकृष्ट होणे

५. कार्य अ. ब्रशने दात घासतांना त्याच्या तंतूंचे दातांवर घर्षण होऊन त्यातून निर्माण होणार्‍या नादातून तोंडातील पोकळीमध्ये त्रासदायक स्पंदने निर्माण होणे अनामिकेने दात घासतांना निर्माण होणार्‍या घर्षणातून बोटाच्या अग्रभागामध्ये अकार्यरत असणारी चांगली शक्ती कार्यरत होणे
५. कार्य आ. झोपेमुळे मुखातील पोकळीत रात्रभरात तमोगुणी वायूची निर्मिती होऊन त्रासदायक शक्ती आकृष्ट होणे आणि ब्रशने दात घासल्यामुळे त्यामध्ये वाढ होणे मुखातील पोकळीमध्ये रात्रभरात निर्माण होणारा तमोगुणी वायू अन् त्रासदायक शक्ती यांचे अनामिकेतून प्रक्षेपित होणार्‍या चांगल्या शक्तीमुळे उच्चाटन होणे
६.
दातांची स्वच्छता टिकून रहाण्याचा कालावधी
१५ ते २० मिनिटे ३ घंटे
७. जिवावर होणारे दुष्परिणाम किंवा त्याला होणारे लाभ

अ.शारीरिक

आ.मानसिक

इ.आध्यात्मिक

हिरड्या दुर्बल होणे, त्यांतून रक्त येणे, दातांची झीज होणे आणि त्यांची दुर्गंधी अल्प होणे

मानसिकदृष्ट्या ‘दात स्वच्छ झाले’, असे वाटणे

स्थूल दृष्टीने पाहिल्यास ‘ब्रशने दात घासणे’, ही कृती योग्य असली, तरी तिचाआध्यात्मिक स्तरावर लाभ न होणे आणि त्यामुळे केवळ अल्प काळासाठीच तोंडातील दुर्गंधी दूर होणे

हिरड्या बळकट होणे, दातांची झीज थांबणे आणि त्यांची दुर्गंधी दूर होणे

मनाला चांगले वाटणे

हाताच्या होणार्‍या मुद्रेमुळे आध्यात्मिक लाभ होऊन मुखातील पोकळीत निर्माण होणार्‍या त्रासदायक शक्तीचे प्रमाण न्यून होणे अन् मुखासह वाणीही शुद्ध होणे

 

टीप १ : मनुष्याचा देह हा पंचतत्त्वांपासून बनलेला असून त्यांतील अंशात्मक तत्त्वे त्याच्या हाताच्या बोटामध्ये समाविष्ट असतात. त्याच्याकडून होणार्‍या विविध मुद्रांतून त्याला ती प्राप्त होतात. अनामिकेने दात घासतांना तिच्या अग्रभागात आपतत्त्व असल्याने त्यात शक्तीचे प्रमाण अधिक असते.’
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (फाल्गुन शु. १४, ७.३.२०१२)

२ ए. ब्रशपेक्षा बोटाने दात घासणे योग्य असल्याचे दर्शवणारी अनुभूती

‘बोटाने दात घासण्याचा प्रयोग करून बघितल्यावर बोटातून प्रक्षेपित होणार्‍या शक्तीचा परिणाम ब्रशपेक्षा दातांवर अधिक काळ टिकून राहिल्यामुळे माझे अनावश्यक बोलण्याचे प्रमाण उणावत असल्याचे जाणवले.’ – कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment