स्त्रियांनी अलंकार धारण करण्याचे महत्त्व आणि अलंकार धारण केल्यामुळे होणारे लाभ यांविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया. विधवा स्त्रियांनी अलंकार का घालू नये, याविषयीचे शास्त्रीयविवेचन या लेखात केले आहे.
१. स्त्रियांनी अलंकार परिधान करण्याचे महत्त्व आणि लाभ
अ. स्त्रियांनी अलंकार परिधान करणे, म्हणजे स्वतःतील देवत्व जागृत करणे
१. अलंकारांमुळे स्त्रीच्या शरिरात असलेल्या तेजतत्त्वरूपी आदिमायेचे आणि आदिशक्तीचे प्रकटीकरण होते.
२ शास्त्रीय पद्धतीने अलंकार परिधान करणे, म्हणजे देवतेच्या शक्तीरूपाची केलेली पूजा असणे : स्त्री हीदेवतेच्या अप्रकट शक्तीचे प्रतीक आहे. शास्त्रीय पद्धतीने अलंकार परिधान करणे, म्हणजे त्या शक्तीरूपाची केलेली पूजा आहे. अलंकारांद्वारे स्वतःमध्ये शक्ती प्रकट करून स्वतःसह इतरांनाही तिचा लाभ करून देणे, हेतिचे कार्य आहे.’
– एक अज्ञात शक्ती (सौ. रंजना गडेकर यांच्या माध्यमातून, २२.२.२००७, रात्री ७.५५)
३. अलंकार घातलेली स्त्री शक्तीजागृतीचे पूजनीय पीठ असणे : ‘अलंकार घातलेल्या स्त्रीकडे पाहिल्यावर पूज्यभाव निर्माण होतो. त्यामुळे स्वतःमधील आणि इतरांचीही शक्ती जागृत होते. हे एक लहानसे शक्तीजागृतीचे पूजनीय पीठ आहे आणि देवतेचे सतत स्मरण करून देणारी प्रतिमा आहे. स्थुलातील पूर्णत्वाच्या दिशेची ही वाटचाल सगुण उपासनेतून निर्गुणाकडे घेऊन जाणारी आणि निर्गुणाची अनुभूती देणारी आहे.’
– एक अज्ञात शक्ती (सौ. रंजना गौतम गडेकर यांच्या माध्यमातून, २२.२.२००७, रात्री ८.१५))
आ. स्व-उन्नती घडवून आणण्यासाठी अलंकारांचा वापर करणे
‘अलंकार परिधान करण्यामागे जिवाचा भाव असेल, तर जीव असत् कडून सत् कडे जातो. त्यामुळे प्रत्येक स्त्री-जिवाने संस्कृतीचे पालनकरून स्व-उन्नती घडवून आणण्यासाठी अलंकारांचा वापर केला पाहिजे.
इ. हिंदु धर्माने स्त्रीत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि तिच्यातील शक्तीतत्त्व टिकून रहाण्यासाठी केलेली अलंकारांची रचना
१. ‘विशुद्धचक्र : हे गळ्यात कंठमणी घालून जागृत ठेवले जाते.
२. अनाहतचक्र : हे मंगलसूत्राच्या वाट्यांच्या पोकळीतील तेजस्वरूप लहरींच्या स्पर्शाने जागृत ठेवले जाते.
३. नाभीप्रदेश : मेखलेचा, तसेच कांचीचा बंध नाभीप्रदेश, तसेच कटिबंधप्रदेशाला शक्तीतत्त्वाच्या बळावरकार्य करण्यास उद्युक्त करणारा असतो.
४. पाय : पायांतील पैंजणाचा नाद आणि जोडवी पाताळातून येणार्या त्रासदायक स्पंदनांपासून स्त्रीचे रक्षणकरतात.
वरील उदाहरणांतून हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येते.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, मार्गशीर्ष कृष्ण ८, कलियुग वर्ष५११० (२०.१२.२००८), दुपारी १२.१२)
ई. अलंकारांमुळे स्त्रीचे रज-तमात्मक लहरींपासून रक्षण होणे
‘स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे. स्त्री हीमूलतःच रजोप्रवृत्तीची असल्याने तिच्या अंगावर असणारे अलंकार तिचे प्राकृतिक स्वरूपात वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींच्या भ्रमणातून उत्पन्न होणार्या ऊर्जेपासून रक्षण करतात. प्रत्येक अलंकार स्त्रीला कवचरूपी (चिलखतरूपी) संरक्षण देतो; कारण स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त संवेदनशील असल्याने ती वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींना चटकन प्रतिसाद देते; म्हणून पूर्वापार अलंकार वापरून तिचे संरक्षणकेले जाते.
उ. अलंकारांमुळे वाईट शक्तींना प्रतिबंध होण्यास साहाय्य होणे
१. अलंकारांमुळे त्या त्या अवयवाभोवती चैतन्याचा आकृतीबंध बनतो आणि वाईट शक्तींना पुढे प्रवेश करणे कठीण होते, उदा. पायांत पैंजण अन् हातांत बांगड्या घातल्याने वाईट शक्तींना पाय आणि हात यांद्वारे शरिरात सहज प्रवेश करता येत नाही.
२. आजकाल लग्न झालेल्या काही स्त्रियांच्या मनात ‘हातांत पाटल्या-बांगड्या घालू नयेत; रात्री झोपतांना बांगड्या आणि मंगळसूत्र काढून ठेवावे’, असे विचार येतात. असे विचार वाईट शक्तींनीच स्त्रियांच्या मनात घातलेले असतात. त्यामुळे वाईट शक्तींना स्त्रियांवर आक्रमण करणे सोपे जाते. प्रत्यक्षात पाटल्या, बांगड्या आणि मंगळसूत्र यांमुळे हात अन् गळा या अवयवांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते.
३. काही स्त्रियांना घाम येत नसतांना गळ्यावर पुरळ उठते आणि ‘मंगळसूत्र घातल्याने पुरळ उठले आहे’, असे वाटून त्या सोन्याचे मंगळसूत्र काढून खोटे (सोने न वापरता बनवलेले आणि वजनाने हलके असलेले) मंगळसूत्र घालतात. याचाही वाईट शक्तींना लाभ होतो. मंगळसूत्रामुळे गळ्याचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते.
४. वाईट शक्तींचा त्रास होत असतांना स्त्रियांना अंगावरील अलंकार काढावेसे वाटतात. पूर्वी राण्यांना राग आल्यावर त्या क्रोधागारात जाऊन अंगावरील सर्व अलंकार काढून टाकत असल्याचेही आपण वाचले आहे.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १७.१२.२००५, रात्री ८.०२)
ऊ. सोन्याच्या आणि चांदीच्या अलंकारांमुळे वाईट शक्तींपासून रक्षण होणे
ऊ १. अलंकारातील सोने आणि चांदी या धातूंमुळे त्या त्या प्रकारच्या वाईट शक्तींचे आक्रमणपरतवले जाणे
‘स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असल्याने त्यांच्यावर चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या शक्तींचा लवकर परिणाम होतो अन् तो जास्त काळ टिकतो. अलंकार बनवण्यासाठी वापरण्यात येणार्या सोने आणि चांदी या धातूंमुळे त्या त्या प्रकारच्या वाईट शक्तींचे आक्रमण परतवले जाते अन्त्रासदायक लहरींपासून स्त्रीचे रक्षण होते. स्त्रियांतील सात्त्विकता वाढावी आणि वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षणव्हावे, यासाठी स्त्रियांनी अलंकार घालावेत.
ऊ २. शक्तीमान वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी कटीच्या (कमरेच्या) वरच्या भागातीलअलंकार सोन्याचे असणे
सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या अलंकारांपैकी कटीपासून (कमरेपासून) वरच्याभागात घालायचे अलंकार सोन्याचे असतात. तेजाचे संवर्धन करणार्या सोन्याचा वापर भूमीपासून वरिष्ठस्तरात (टीप १) कार्य करणार्या शक्तीमान वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी केला गेल्यामुळे देहाच्यामध्यम आणि वरिष्ठ स्तरांतील सर्व दागिने सोन्याचे असतात. (मणिपूरचक्रापासून वरच्या चक्रांमध्ये चांगली शक्ती ग्रहण करण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते; म्हणून नाभीपासून वरच्या भागांवर तेज प्रक्षेपित करणारे सोन्याचे अलंकार धारण केले जातात.) सोन्यामुळे त्या त्या पट्ट्यातील क्रियाशक्तीरूपी वरिष्ठ वाईट शक्तींचे आक्रमण परतवले जाते.
टीप १ – भूमीपासून ८ ते १० फूट वरच्या दिशेने म्हणजे वरिष्ठ स्तर, ५ ते ६ फूट वर म्हणजे मध्यम स्तरआणि २ ते ३ फूट वर म्हणजे भूमीलगतचा भाग.
ऊ ३. पाताळातून प्रक्षेपित होणार्या कनिष्ठ लहरींपासून रक्षण होण्यासाठी कटीभागाच्या(कमरेच्या) आणि पावलांच्या अलंकारांमध्ये चांदीचा वापर केला जाणे
सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या अलंकारांपैकी कटीपासून (कमरेपासून) खालच्या भागात घालायचे अलंकार चांदीचे असतात. चांदीची रजोगुणी चैतन्ययुक्त इच्छालहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने त्या त्या कार्याला पूरक अशा धातूचे अलंकार त्या त्या अवयवासाठी वापरले जातात. पाताळातून प्रक्षेपित होणार्या पृथ्वी आणि आप तत्त्वयुक्तत्रासदायक लहरींपासून रक्षण होण्यासाठी कटीप्रदेशाच्या अन् पावलांच्या अलंकारांमध्ये चांदीचा विशेषत्वानेवापर केला जातो.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१२.२००५)
ए. सौभाग्यालंकार म्हणजे स्त्रियांना त्यांच्या पातिव्रत्याची जाणीव करून देणारे माध्यम
१. ‘कुंकू, मंगळसूत्र, कंकण, जोडवी आदी घटकांच्या साहाय्याने रजोगुणाच्या सामर्थ्यावर विवाहित स्त्री अल्पकालावधीत पुरुषप्रधान शिवस्वरूप कर्तृस्वरूपाशी एकरूप होऊ शकते; म्हणून स्त्रीतील क्रियाशीलत्व जागृतकरून पतीच्या कर्तृभावात त्याला पुरेपूर साहाय्य करून कृती आणि कर्म यांची रजोगुणाच्या साहाय्याने योग्यसांगड घालण्यासाठी विवाहित स्त्रियांना त्या त्या अलंकारांचे कर्मबंधत्व घातले गेले.
२. स्त्रीला सौभाग्यालंकारांच्या माध्यमातून होणार्या तेजदायी लहरींच्या स्पर्शातून तिच्यातील पातिव्रत्याचीसतत जाणीव करून देण्याचे प्रयोजन केले गेले.
३. सौभाग्यालंकारांच्या बाह्य भानातून समाज एकपत्नीत्व आणि पातिव्रत्याचे संगोपन करून स्वैराचारापासूनमुक्त राहील, अशी योजना करणे कलियुगात अपरिहार्य ठरले.
४. सौभाग्यालंकार म्हणजे अनिष्ट शक्तींच्या भुक्त दृष्टीपासून रक्षण करण्याचा केलेला प्रयत्न :कलियुग हे रज-तमप्रधान असल्याने हा काळ स्वैराचाराला अनुकूल आणि साधनेला प्रतिकूल असा आहे. यायुगात स्त्रीरूपी पवित्रतेला किंवा सौभाग्यशीलतेला अलंकाररूपी तेजस्वितेचे कोंदण घातलेले आहे. यातेजस्वितेच्या बळावर तिच्या शीलाचे रक्षणही होते. सौभाग्यवती स्त्री ही मंगळसूत्र, कंकण, तसेचकुंकू या सौभाग्यालंकारांनी संरक्षित केलेली असल्याने तिला एक प्रकारे अनिष्ट शक्तींच्या भुक्त दृष्टीपासूनविभक्त करण्याचा प्रयत्न कलियुगात केला गेला आहे.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.१.२००८, दुपारी ५.०६)
२. विधवांनी अलंकार परिधान का करू नयेत ?
अ. सौभाग्यरूपी धारणेचा लय होतो, तेव्हा वैराग्यभावनेचा उदय होतो !
‘ज्या वेळी सौभाग्यरूपीधारणेचा लय होतो, त्या वेळी खर्या अर्थाने स्त्रीतील उत्पत्तीविषयक तेजधारणेने नटलेले बीज लोप पावतेआणि त्याच ठिकाणी वैराग्यभावनेचा उदय होतो. तेजस्वीतेचा लय होणे, म्हणजेच अलंकाररूपी शृंगारत्वत्यागून अलंकारविरहित वैराग्यजीवनास आरंभ करणे.
आ. स्त्रीमध्ये वैराग्यभाव लवकर निर्माण होण्यासाठी कलियुगात अलंकारत्यागाची संकल्पना दृढहोणे
हा वैराग्यभाव स्त्रीमध्ये लवकर निर्माण होण्यासाठी कलियुगात अलंकारत्यागाची संकल्पना दृढझाली. पूर्वीच्या काळी स्त्रिया तेजरूपी साधनेने परिपक्व असल्याने त्यांच्यात हळूहळू साधनेच्यापुढच्या पुढच्या टप्प्याला वैराग्यभाव निर्माण होत असे; परंतु आता साधनेच्या अभावामुळे अलंकारत्यागातूनविधवा स्त्रीमध्ये वैराग्यभावाची निर्मिती होऊन तिचा लवकर मोक्षप्राप्तीकडे प्रवास व्हावा, या उद्देशानेबाह्यांगाने विधवा स्त्रीसाठी अलंकारत्यागस्वरूपाची आवश्यकता भासली. अलंकारांच्या स्पर्शाने स्त्रीतीलरजोगुण सतत जागृत अवस्थेत रहातो, तर अलंकारविरहिततेच्या भावनेतून रजोगुणाचा लय होऊन वैराग्यभावलवकर निर्माण होण्यास साहाय्य होते.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.१.२००८, दुपारी ५.०६)
३. व्यक्तीमत्त्वानुसार अलंकारांची निवड
‘व्यक्ती आपल्या व्यक्तीमत्त्वाला पूरक अशा अलंकारांची निवड करते. सात्त्विक व्यक्ती सात्त्विकअलंकारांची, राजसिक व्यक्ती राजसिक अलंकारांची, तर तामसिक व्यक्ती तामसिक अलंकारांची निवडकरते. सात्त्विक अलंकारांकडे पाहून भाव, चैतन्य, आनंद किंवा शांती यांची अनुभूती येते. राजसिकअलंकारांतून शक्तीची अनुभूती येते, तर तामसिक अलंकारांकडे पाहून त्रास होतो.’
– डॉ. जयंत आठवले (१३.१.२००८)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अलंकारशास्त्र’