आनंद

Article also available in :

अनुक्रमणिका

१. व्याख्या

२. समानार्थी शब्द

३. आनंद आणि शांती

४. आनंद मिळावा, अशी इच्छा का होते ?

५. आत्मा (जीव) आनंदरूप असूनही त्याला आनंदाची अनुभूती का येत नाही ?

६. जिवाला आनंदाचा कंटाळा का येत नाही ?

७. सप्तलोक आणि आनंद

८. काळ आणि आनंद

 


मानवाच्या प्रत्येक कृती/विचार यांमागील हेतु ‘आनंदप्राप्ती’ हाच आहे. परंतु आपण कधी याचा विचार केला आहे का की, ‘तत्त्वत: आपल्याला आनंदच का हवाहवासा वाटतो, दु:ख का नाही ?’ या लेखात आपण आनंदाच्या विविध व्याख्या, आनंद मिळावा, अशी इच्छा का होते ?; जिवाला आनंदाचा कंटाळा का येत नाही ?; आत्मा (जीव) आनंदरूप असूनही त्याला आनंदाची अनुभूती का येत नाही ? इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे अभ्यासूया.

१. व्याख्या

१ अ. आनंद म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडची जीवात्म्याला शिवदशेत किंवा शिवात्म्याला अनुभूतीस येणारी अनुकूल संवेदना.

१ आ. यसि्मनि्स्थतो न दुःखेन गुरुणाप्यविचाल्यते । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक २२

अर्थ : महाभयंकर दुःखानेही मन विचलित न होता आनंदमय रहाणे, म्हणजे आत्मानंद होय.

१ इ. सुखमात्यनि्तकं यत्तत् बुदि्धग्राह्यमतीनि्द्रयम् ।

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक २१, २२

अर्थ : जे मिळवल्यावर अन्य सुख मिळवण्याची इच्छाच होत नाही, जे इंद्रीयजन्य नसते अन् ज्याची शुद्ध बुद्धीला थोडीफार ओळख होऊ शकते, त्याला आत्मानंद म्हणतात.

१ ई. चित्तात समाधानवृत्ती नांदू लागली की, चित्तात सहजपणे जी वृत्ती उमटते, तिला ‘आनंद’ असे म्हणतात. जेव्हा चित्तात साति्त्वकता ओतप्रोत भरून असते, तेव्हा रज-तमगुणाच्या कुठल्याही आविष्काराने चित्त साति्त्वकतेच्या अवस्थेपासून ढळत नाही. चित्ताच्या या अवस्थेत त्यात आत्मानंद सदैव प्रतिबिंबित झालेला असतो; मात्र येथे लक्षात ठेवले पाहिजे की, खरा आनंद सात्त्विकतेच्याही पलीकडे आहे.

 

२. समानार्थी शब्द

पारमार्थिक आनंद, आध्यात्मिक सुख, नित्य सुख.

 

३. आनंद आणि शांती

सचि्चदानंद (सत्-चित्-आनंद) हेसुद्धा ब्रह्माचे खरे स्वरूप नव्हे; कारण सचि्चदानंद हे भाव वृत्तीजन्य आहेत. ब्रह्म म्हणजे निवृत्ती, म्हणजेच शांती. विषय सुलभतेसाठी `ब्रह्म म्हणजे आनंदावस्था आणि परब्रह्म म्हणजे शांतीची अवस्था’, असे म्हणता येईल. निर्विकल्प समाधीत शांतीची अनुभूती येते,

‘शांतं उपासितम्’ असे एका उपनिषदात म्हटले आहे. उपासित म्हणजे साधनेने प्राप्त झालेल्या शिवदशेत आनंदाची आणि शिवात्मादशेत शांतीची अनुभूती येते.

 

४. आनंद मिळावा, अशी इच्छा का होते ?

‘आनंदाचे कोटी । साठविल्या आम्हा पोटी ।’
‘आनंदाचे डोही । आनंद तरंग । आनंदचि अंग । आनंदाचे ।।’- संत तुकाराम महाराज

भावार्थ : आनंद हा आपल्यातच साठवलेला असतो. साधना केल्यावर आपल्याला आनंदाची अनुभूती येते. शरीररूपी डोहात आनंदरूपी तरंग उमटतात. संपूर्ण शरीरभर आनंदच आनंद जाणवतो. स्वतःमध्ये असलेल्या आनंदाची अनुभूती आल्यावर चराचरातील आनंदाची अनुभूती येते. आनंद हा जिवाचा आणि विश्वाचा स्थायीभाव, स्वभाव, स्वधर्म आहे; म्हणून जिवाची स्वाभाविक प्रवृत्ती मूळ स्वरूपात जाण्याकडे, म्हणजे आनंद मिळवण्याकडे आणि मूळ स्वरूपात गेल्यावर येणार्‍या आनंदाची अनुभूती टिकवण्याकडे असते.

 

५. आत्मा (जीव) आनंदरूप असूनहीत्याला आनंदाची अनुभूती का येत नाही ?

यश्च मूढतमो लोके यश्च बुद्धेः परं गतः ।

तावुभौ सुखमेधेते कि्लश्यत्यन्तरितो जनः ।। – श्रीमद्भागवत, स्कन्ध ३, अध्याय ७, श्लोक १७

अर्थ : या जगात दोनच प्रकारचे लोक आनंदी असतात – १. पूर्ण अज्ञानी आणि २. बुद्धीच्या पलीकडे गेलेले. मधल्या श्रेणीतील लोक दुःखच भोगत असतात.

 

६. जिवाला आनंदाचा कंटाळा का येत नाही ?

याचे कारण असे की, आनंद हा जिवाचा स्वभाव आहे. जसे साखरेचा स्वभाव गोडी, तसे हे आहे.

 

७. सप्तलोक आणि आनंद

एका लोकातील आनंद हा दुसर्‍या लोकातील आनंदाच्या एक कोटी पट असतो, उदा. भुवलोकातील साधना करणार्‍या जिवाला मिळणारा आनंद हा भूलोकातील जिवाला मिळणार्‍या आनंदाच्या एक कोटी पट अधिक आहे.

 

८. काळ आणि आनंद

‘दुःखात देहाची जाणीव असते; म्हणून त्याचा काळ जास्त वाटतो. याउलट सुखात देहाची जाणीव नसते; म्हणून त्याचा काळ अल्प वाटतो; म्हणजे देहभावामुळे आपल्याला काळ भासतो. वास्तविक काळ असे काही नाहीच.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

८ अ. ग्रह आणि सुखदुःख

जे भोग भोगायचे असतील, त्यांना पोषक अशा ग्रहांच्या सि्थतीच्या वेळी व्यक्ती जन्माला येते; म्हणून ग्रहांमुळे व्यक्ती सुखदुःख भोगते, असे नसते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म – शाश्वत आनंदप्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे शास्त्र’

Leave a Comment