अनिष्ट टाळण्यासाठी करावयाचे विविध नामजप कोणते आणि नामजपाने खर्या अर्थाने आचारांचे पालन कसे करता येते यांविषयी या लेखातून जाणून घेऊया.
काही कृती करतांना किंवा
अनिष्ट टाळण्यासाठी करावयाचे नामजप
जीवनात प्रत्येक कृती करतांना भगवंताचे विविध रूपांत प्रकटीकरण होत असते. त्यानुसार विशिष्ट कृती करतांना जिवाने विशिष्ट देवतेचा नामजप केल्यास त्याला त्याचा अधिक लाभ होतो. ‘बृहत्स्तोत्ररत्नाकर’ यात दिल्याप्रमाणे कोणती कृती करतांना कोणत्या देवतेचा नामजप करायचा, हे पुढील सारणीत दिले आहे.
जो वरील नामांचे नित्यनियमाने त्या त्या वेळी पठण करतो, तो सर्व संकटांतून वाचतो आणि पापांपासून मुक्त होऊन विष्णुलोकात पूज्य मानला जातो, असे शास्त्रात सांगितले आहे.
नामजपाने अकर्म कर्म होऊन
खर्या अर्थाने आचारांचे पालन करता येणे
दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती नामजपासह केल्याने ते अकर्म कर्म होते. प्रत्येक कृती अकर्म कर्म झाल्याने त्या कर्माचे चांगले-वाईट असे कोणतेच फळ मिळत नाही. त्यामुळे खर्या अर्थाने आचार पाळणे शक्य होते अन् आचारांचे पालन करता करता ईश्वराशी एकरूप होता येते.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’