अनुक्रमणिका
१. कपडे धुण्याचे आणि धूतवस्त्र परिधान करण्याचे महत्त्व
२. कपडे धुण्याची योग्य कृती : हाताने कपडे धुतांना ते वाकून धुणे
३. कपडे धुण्याची अयोग्य कृती : उकिडवे बसून कपडे धुणे
४. नदीकाठी कपडे धुण्याचे महत्त्व
५. धुलाईयंत्रात (Washing Machine) कपडे धुण्याने ते रज-तमात्मक झाल्याने त्याचे होणारे परिणाम
६. धुलाई यंत्राच्या साहाय्याने कपडे धुणे आणि ओणवे राहून कपडे धुणे यांमुळे होणारे सूक्ष्मातील परिणाम
७. लाकडी काठीने कपडे वाळत घालणे
८. वाळलेले कपडे ठेवणे
९. पेहरावाच्या संदर्भातील आचार
आजच्या आधुनिक युगात धुलाई यंत्राने (Washing Machine ने) कपडे धुणे ही दैनंदिन बाब झाली आहे. या लेखात आपण कपडे हे धर्मानुसार कसे धुवावेत, धूतवस्त्र परिधान करण्याचे महत्त्व, लाकडी काठीने कपडे वाळत घातल्याने होणारे लाभ; तसेच वाळलेले कपडे ठेवण्याची पद्धत यांचे शास्त्र जाणून घेऊया. याबरोबरच पेहरावाच्या संदर्भातील आचारासंदर्भातही लेखात थोडक्यात विवेचन करण्यात आले आहे.
कपडे धुण्याच्या संदर्भातील आचार
१. कपडे धुण्याचे आणि धूतवस्त्र परिधान करण्याचे महत्त्व
१ अ. धुतलेले कपडे सात्त्विक असल्याने ते परिधान केल्यास व्यक्तीतील रज-तम घटून सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होणे
‘कपडे परिधान केल्यावर त्यांतील सुतामध्ये व्यक्तीच्या देहातील रज-तम लहरी आकृष्ट होतात. कपडे न धुता घातल्यास कपड्यात आकृष्ट झालेल्या रज-तम लहरींमुळे व्यक्तीतील रज-तम वाढते अन् व्यक्तीच्या भोवती असलेले वायूमंडल दूषित होते. त्यामुळे व्यक्ती आणि तिचे कपडे यांवर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता जास्त असते. वापरलेले कपडे धुतल्याने जलातील आपतत्त्वयुक्त ईश्वरी चैतन्यामुळे कपड्यांवर आध्यात्मिक उपाय होऊन त्यांतील रज-तम कण नष्ट होतात अन् सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. धुतलेले कपडे सात्त्विक असल्याने ते परिधान केल्यामुळे व्यक्तीतील रज-तम उणावून सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते.
१ आ. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्यांना घाणेरडे, कळकट आणि मळलेले कपडे घालण्यास आवडणे
वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्या काही व्यक्तींना धुतलेले कपडे घालण्यास आवडत नाही. त्यांना घाणेरडे आणि मळलेले कपडे घालण्यास आवडतात. रज-तमाने युक्त असलेले कपडे घातल्यामुळे अशा व्यक्तींना त्रास देणार्या मांत्रिकांना (बलाढ्य अनिष्ट शक्तींना) त्यांची त्रासदायक शक्ती वाढवण्यासाठी पोषक वातावरण मिळते; म्हणून असे कपडे घालण्याचे विचार मांत्रिकच त्या व्यक्तींच्या मनात घालतात.
१ इ. कपडे न धुता त्यांवर सुगंधित द्रव्याचा (अत्तराचा) फवारा मारल्यास कपड्यांतील रज-तम नष्ट न होणे आणि त्यामुळे वाईट शक्तींना आक्रमण करता येणे
हिंदु धर्मात धूतवस्त्र परिधान करण्याच्या संदर्भात सांगितले आहे. काही पंथांमध्ये लोक प्रतिदिन स्नानही करीत नाहीत, तर कपडे धुणे दूरच राहिले. काही लोक कित्येक दिवस कपडे न धुता त्यांवर सुगंधित द्रव्याचा फवारा मारून ते परत परत वापरतात. फवार्यामुळे कपड्यांना स्थुलातून सुगंध येत असला, तरी सूक्ष्मातून त्यातील रज-तम नष्ट झालेले नसते. त्यामुळे असे कपडे परिधान करणार्या व्यक्तीतील रज-तम वाढते आणि तिच्यावर होणारे वाईट शक्तींची आक्रमणेही वाढतात.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, दुपारी १.३०)
२. कपडे धुण्याची योग्य कृती : हाताने कपडे धुतांना ते वाकून धुणे
२ अ. कटीत वाकण्याने होणारी प्रक्रिया
‘वाकून कपडे धुतल्याने नाभीचक्र सतत जागृत स्थितीत राहून ते देहातील पंचप्राणात्मक वायूंच्या वहनाला पुष्टी देणारे ठरते. या मुद्रेमुळे तेजदायी उत्सर्जनास पूरक ठरणारी सूर्यनाडीही सतत जागृत अवस्थेत राहिल्याने या नाडीच्या त्या त्या कृतीत असलेल्या कार्यकारी सहभागामुळे कपडे धुतांना कपड्यांना होणार्या हस्तस्पर्शातून तेजदायी लहरींचे कपड्यांत संक्रमण होते आणि हे तेजदायी तत्त्व थोड्याच कालावधीत पाण्यातील आपतत्त्वाच्या साहाय्याने कपड्यांमध्ये वाहू लागते. या प्रक्रियेमुळे कपड्यांतील सूक्ष्म-स्तरावर असलेल्या रज-तमात्मक मलिनतेचेही उच्चाटन किंवा विघटन होण्यास साहाय्य झाल्याने कपडे खर्या अर्थाने सूक्ष्म-स्तरावर स्वच्छ, म्हणजेच पवित्र होतात.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
२ आ. ओणवे राहून (कमरेत वाकून)
कपडे धुतल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र
खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर ‘क्लिक’ करा !
३. कपडे धुण्याची अयोग्य कृती : उकिडवे बसून कपडे धुणे
३ अ. स्त्रिया : ‘स्त्रियांनी दोन्ही गुडघे पोटाशी धरून, म्हणजेच उकिडवे बसून कपडे कधीच धुऊ नयेत; कारण यामुळे देहातील योनीमार्गाच्या पोकळीचा संबंध सरळ भूमीलगतच्या रज-तमात्मक वायूमंडलाशी आल्याने पाताळातून उत्सर्जित होणार्या रज-तमात्मक लहरी या योनीमार्गाच्या पोकळीतून वेगाने देहात संक्रमित होतात. याचा जिवाला त्रास होऊ शकतो.
३ आ. पुरुष : पुरुषांच्या संदर्भातही अशा मुद्रेने देहातील अधोगामी मार्गाचा भूमीलगतच्या पट्ट्यात फिरणार्या त्रासदायक स्पंदनांशी सरळ संपर्क आल्याने त्यांना त्रास होण्याचीच शक्यता अधिक असते.
४. नदीकाठी कपडे धुण्याचे महत्त्व
पूर्वीच्या काळी नदीच्या प्रवाहाच्या साहाय्याने नदीकाठी कपडे धुतले जात. यामुळे पाण्याच्या प्रवाहात्मक शुद्ध स्पर्शाने कपड्यांतील रज-तमात्मक स्पंदनांतील पापाचेही पाण्यात परिमार्जन होत असे.
म्हणजेच ही कृती कपड्यांतील रज-तमात्मक अशा सूक्ष्म-परिणामालाही नष्ट करणारी होती. म्हणूनच त्या काळी ब्रह्मकर्मात धूतवस्त्राला पुष्कळ महत्त्व दिलेले असे.
५. धुलाईयंत्रात (Washing Machine मध्ये) कपडे धुण्याने ते रज-तमात्मक झाल्याने त्याचे होणारे परिणाम
खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !
सध्या वेळ नसल्याने, तसेच कपडे धुण्याचे कष्ट टाळण्यासाठी बरेच जण कपडे धुण्यासाठी धुलाईयंत्राचा वापर करतात. यंत्रात कपडे धुतल्याने कपड्यांमध्ये होणार्या यांत्रिक आणि वेगवान रज-तमात्मक विद्युत स्पंदनांमुळे कपड्यांत घनीभूत झालेल्या रज-तमात्मक लहरी जागृतावस्थेत येतात. पाण्याच्या स्पर्शाने आपतत्त्वात्मक लहरींच्या बळावर प्रवाहाच्या रूपात जोमाने कार्य करू लागतात. त्यामुळे
१. कपड्यांतून त्रासदायक स्पंदने वायूमंडलात प्रक्षेपित होऊ लागतात.
२. ‘धुलाईयंत्रातून कपडे धुतले’, असे जरी बाह्यतः वाटले, तरी ते सूक्ष्म-स्तरावर रज-तमात्मक स्पंदनांनी जास्त प्रमाणात भारित झालेले असल्याने असे कपडे अंगावर घातल्याने वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
५ अ. रज-तमात्मक परिणाम घालवण्यासाठीचे उपाय
कपडे धुतांना धुलाईयंत्रात उदबत्तीची विभूती किंवा पवित्र यज्ञातील विभूती टाकावी आणि कपड्यांतील रज-तमात्मकरूपी सूक्ष्म-मालीन्य नष्ट होण्यासाठी विभूतीतील देवत्वाला प्रार्थना करावी.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.१०.२००७, रात्री १०.२५)
(‘२००४ साली गोव्यातील फोंडा येथील सनातनच्या आश्रमात कपडे धुण्याच्या संदर्भात विविध प्रयोग केले होते. तेव्हा वर सांगितलेल्या कृतींनी कपडे धुतल्यास जास्त लाभ होतो, हे अनुभवास आले होते. प्रत्येक वेळी ईश्वर आधी अनुभूती देतो आणि मग ज्ञान देतो. २७.१०.२००७ या दिवशी मिळालेले ज्ञान हे याचे आणखी एक उदाहरण आहे.’ – डॉ. आठवले)
५ आ. आधुनिकतेकडे नव्हे, तर विनाशाकडे नेणारे विज्ञान !
विश्वाचा शोध घेणार्या ऋषीमुनींच्या हाताने कपडे धुण्याच्या पद्धतीला ‘रानटी’ म्हणून हिणवणारे अन् कपडे धुण्याच्या यंत्रांचा शोध लावून मानवजातीला विनाशाकडे नेणारे सध्याचे वैज्ञानिक हे पुढारलेले नाहीत, तर मागासलेले आहेत !
६. धुलाई यंत्राच्या साहाय्याने कपडे धुणे आणि
ओणवे राहून (कमरेत वाकून)कपडे धुणे यांमुळे होणारे सूक्ष्मातील परिणाम
‘पुढील सारणीतील आकडे टक्क्यांमध्ये आहेत.
यंत्राच्या साहाय्याने कपडे धुणे |
ओणवे राहून (कमरेत वाकून) कपडे धुणे |
|
---|---|---|
१. चैतन्य | – | १.२५ |
२. शक्ती | – | ३ |
३. त्रासदायक शक्ती दूर होणे |
०.२५ | २ |
४. वाईट शक्ती आकर्षित होणेअ. त्रासदायक आ. मायावी |
२.२५ |
–
– |
५. स्पंदनांचे कारण |
अ. वेळ वाचवण्यासाठी आणि कपडे धुण्याचे कष्ट टाळण्यासाठी यंत्राचावापर केल्यामुळे मायावी आणि विद्युत प्रवाहातील त्रासदायक स्पंदने कपड्यांमध्ये आकृष्ट होणे आ. यंत्रातून निर्माण होणार्या |
ओणवे राहून कपडे धुतल्यामुळे आणि देहाच्या सततच्या होणार्या हालचालींमुळे निर्माण होणारी शक्तीची स्पंदने कपड्यांमध्ये आकृष्ट होणेओणवे राहून कपडे धुतांना ते हाताने घासल्याने होणार्या नादातून चांगल्या शक्तीची स्पंदने कपड्यांमध्ये कार्यरत होणे आणि त्यामुळे कपड्यांतील त्रासदायक शक्तीचे उच्चाटन होणे |
६. कपड्यांवर होणारा परिणाम |
कपडे धुऊन झाल्यानंतर ते पिळण्यासाठी ड्रायरचा उपयोग करण्यात येणे, परिणामी ड्रायरमध्ये निर्माण होणार्या अतिदाबजन्य वायूस्वरूपातील त्रासदायक लहरी कपड्यांमध्ये संक्रमित होणे |
कपडे धुतल्यानंतर ते हाताने घट्ट पिळल्यामुळे कपड्यांमध्ये शक्तीची स्पंदने कार्यान्वित होणे |
७. परिणाम टिकून रहाण्याचा कालावधी |
२ घंटे | ४ घंटे |
८. व्यक्तीवर होणारे परिणामअ. मानसिक आ. आध्यात्मिक |
यंत्रातून प्रक्षेपित होणार्या नादाचा
व्यक्तीचे मन आणि बद्धी यांवर विपरीत परिणाम होणे अन् तो नाद नकोसा वाटणे १. यंत्राचा वापर होत असल्यामुळे न झाल्यामुळे देहातील चक्रे कार्यरत न होणे २. यंत्राच्या माध्यमातून धुतलेले |
कपडे धुतांना होणार्या नादाचा मन आणि बुद्धी यांवर फारसा परिणाम न होणेओणवे राहून कपडे धुतल्यामुळे देहातील मणिपुरचक्र कार्यरत होणे आणि कपडे धुण्यासाठी ऊर्जा प्राप्त होणे हाताने धुतलेले कपडे |
६ अ. कपडे सूर्यप्रकाशात वाळत घालण्याचा लाभ
कपडे सूर्यप्रकाशात वाळत घातल्यामुळे त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय होतात आणि ते परिधान करणार्या व्यक्तीला लाभ होतो. उन्हात वाळत घातलेल्या कपड्यांना एक प्रकारचा सूक्ष्मगंधही येतो.’
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (फाल्गुन कृ. ५, कलियुग वर्ष ५११३ (१२.३.२०१०))
‘मानव जितका अध्यात्माला धरून राहील, तितका तो सुखी असेल, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.’ – डॉ. आठवले (२८.१०.२००७)
७. लाकडी काठीने कपडे वाळत घालणे
‘शक्य असेल तर स्नान करून येतांनाच कपडे धुऊन यावेत. कपडे धुतल्यानंतर ते घरातील उंच टांगलेल्या लाकडी दांडीवर लाकडी काठीच्या साहाय्याने वाळत घालावेत. कपडे वाळत घालण्याच्या लाकडी दांड्या स्वतःतील सूक्ष्म-अग्नीच्या साहाय्याने वाळत घातलेल्या कपड्यांच्या भोवती संरक्षककवच निर्माण करतात. कपडे वाळत घालतांना ऊर्ध्व दिशेने टांगलेली लाकडी दांडी ही स्वतःतून वलयांच्या रूपात तेजदायी लहरी प्रक्षेपित करत असल्याने हे गतिमान आणि जास्तीतजास्त प्रक्षेपणक्षमता दाखवणारे कवचच कपड्यांना उपलब्ध करून दिले जाते; कारण कपडे दांडीवर पसरून वाळत टाकलेले असल्याने तेही जास्तीतजास्त प्रक्षेपण अवस्थेतच असतात. लाकडी काठीने कपडे वाळत घातल्याने धातूसदृश कोणत्याही वस्तूचा कपड्यांना होणारा रज-तमात्मक संसर्ग टाळला जातो.
८. वाळलेले कपडे ठेवणे
पूर्वीच्या काळी खडखडीत वाळलेले कपडे सायंकाळच्या आत योग्य पद्धतीने निर्या करून भिंतीवर असलेल्या लाकडी खुंटीवर ठेवले जात. ज्या खुंटीवर निर्या करून कपडे अडकवून ठेवले जात, त्या ठिकाणी कपड्यांच्या मध्यभागी निर्माण झालेल्या गोलाकार मंडलातून लाकडी आणि भूमीला समांतर असलेली खुंटी डोकावत असते. या खुंटीच्या केंद्रबिंदूतून तेजदायी लहरींचे वेगाने प्रक्षेपण झाल्याने घनीभूत अवस्थेतील कपड्यांच्या निर्यांतील लहरीही प्रक्षेपण अवस्थेत येत. लाकडातून निर्यांमध्ये संक्रमित झालेल्या अग्नीरूपी तेजलहरी घनीभूत होऊन सगुण रूप धारण करून भूमीच्या दिशेने आलेल्या टोकांतून पाताळातून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक स्पंदनांशी लढत असत. म्हणजेच जशी कृती असते, तशीच वास्तूतील इतर पूरक गोष्टींची रचना करून त्या त्या घटकांच्या कार्याला कवचात्मक असे पूरक आणि पोषक वातावरण निर्माण करून दिले जाते, हे लक्षात येते. अशा पद्धतीने सतत भूमीपासून दूर आणि ऊर्ध्व वायूमंडलाच्या संपर्कात लाकडातील अग्नीच्या सहकार्याने कपडे ठेवल्याने ते सतत शुद्ध राहून वाईट शक्तींच्या त्रासापासूनही मुक्त रहात.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
९. पेहरावाच्या संदर्भातील आचार
९ अ. सात्त्विक वस्त्र परिधान केल्याने देहाभोवती संरक्षककवच निर्माण होणे
‘वस्त्र परिधान करणे, हा एक संरक्षणात्मक आचार आहे. वस्त्रांच्या सात्त्विक रंगांच्या माध्यमातून, तसेच त्यांच्या परिधान करण्यातील आकारधारणेतून जिवाचे वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींच्या संक्रमणापासून संरक्षण होत असते; म्हणूनच स्नान झाल्यानंतर देह शुद्ध झाला असता, त्यावर धूतवस्त्र परिधान करून देहावर संरक्षक–कवच चढवले जाते; म्हणून सात्त्विक वस्त्रांना अधिक महत्त्व दिले जाते.’ – एक विद्वान(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.१२.२००७, दुपारी १.४३)
सात्त्विक वस्त्र या संदर्भात अधिक माहितीसाठी भेट द्या !
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’