स्नान करण्याची पद्धत (भाग २)

अनुक्रमणिका

२ इ. स्नान करतांना मांडी घालून बसावे.
२ इ १. शास्त्र
२ इ २. लाभ
२ इ ३. पाटावर बसून स्नान केल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

२ ई. ‘टब’मध्ये स्नान करणे (टबबाथ), तुषार स्नान करणे (शॉवर बाथ) आणि पाटावर बसून स्नान करणे यांमुळे होणारे सूक्ष्मातील परिणाम
२ उ. डोक्यावरून स्नान करावे
२ उ १. शास्त्र – डोक्यावरून स्नान केल्याने जिवाच्या देहावर आलेल्या आवरणाचे मूळ बिंदूतून विघटन होणे
२ उ २. अनुभूती
२ उ ३. श्लोक म्हणत पितळी रजोगुणी तांब्याने पाणी डोक्यावर ओतणे
२ ऊ. पाटावर बसून स्नान करणे आणि पाटावर बसून नामजप करत अथवा श्लोक म्हणत स्नान करणे यांमुळे होणारे सूक्ष्मातील लाभ
२ ऊ १. अन्य सूत्र
२ ए. ९ द्वारे प्रतिदिन सकाळी स्नानाच्या वेळी स्वच्छ करावीत.’ – दक्षस्मृती


२ इ. स्नान करतांना मांडी घालून बसावे.

२ इ १. शास्त्र : ‘उभ्याने स्नान केल्याने आपल्या अंगावरील मालीन्यासह भूमीवर आदळणारा पाण्याचा प्रवाह भूमीतील त्रासदायक शक्तीच्या स्थानांना जागृत करतो. त्यामुळे भूमीतून त्रासदायक शक्तीचा कारंजा उसळून परत आपल्या देहाला रज-तमयुक्त बनवतो. यासाठी स्नान करतांना मांडी घालून बसावे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

२ इ २. लाभ
अ. ‘मांडी घालून बसल्यावर देहाचा आकार त्रिकोणी होतो; त्यामुळे स्नानातून संरक्षककवच सुलभतेने निर्माण होते.

आ. मांडी घालून स्नान केल्याने देहावरील आवरण हे ब्रह्मांड त्रिशंकूच्या (टीप १) बाह्य आवरणाशी संलग्न होते. त्यामुळे जिवाला जास्त प्रमाणात चैतन्य मिळते आणि त्याच्या देहावरील काळ्या आवरणाचे विघटन होते.

इ. मांडी घातल्याने काही प्रमाणात सुषुम्नानाडीची जागृती होते. त्यामुळे स्नानातून प्राप्त होणारे चैतन्य शरिरात जास्त काळ टिकून रहाते.’
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ६.५.२००८, सायं ७.४७)

टीप १ – ईश्वराकडून येणार्‍या लहरी त्रिशंकूच्या (त्रिकोणी) स्वरूपात येतात. मांडी घालून बसल्यावर जिवाची त्या लहरींशी संलग्नता होऊन त्याला त्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करता येतात.

२ इ ३. पाटावर बसून स्नान केल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र :

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर ‘क्लिक’ करा !

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा. (श्रावण अमावास्या, कलियुग वर्ष ५१११ (२०.८.२००९))

२ ई. ‘टब’मध्ये स्नान करणे (टबबाथ), तुषार स्नान करणे (शॉवर बाथ)
आणि पाटावर बसून स्नान करणे यांमुळे होणारे सूक्ष्मातील परिणाम

‘पुढील सारणीतील आकडे टक्क्यांमध्ये आहेत.

 

‘टब’मध्ये स्नान करणे तुषार स्नान करणे पाटावर बसून स्नान करणे
१. चैतन्य
२. शक्ती
३. त्रासदायक शक्ती दूर होणे

४. वाईट शक्ती आकर्षित होणे
अ. त्रासदायक

आ. मायावी

२.७५

३.०६

१.२५

५. स्पंदनांचे कारण ही तमोगुणी पद्धत असल्यामुळे आणि झोपून स्नान करण्यामुळे
देहाला प्राप्त झालेल्या स्थितीमुळे
त्रासदायक शक्ती आणि मायावी
शक्ती आकृष्ट होणे
ही तमोगुणी पद्धत असल्यामुळे आणि उभ्याने स्नान करण्याच्या देहाच्या स्थितीमुळे अल्प प्रमाणात शक्ती आणि अधिक प्रमाणात त्रासदायक स्पंदने आकृष्ट होणे सत्त्वगुणी भारतीय आचारानुसार मांडी घालण्याच्या आसनबद्धतेच्या
देहाच्या स्थितीमुळे देवाकडून शक्तीची स्पंदने आकृष्ट होणे
६. परिणाम
अ. शारीरिक
स्थूलता वाढणे आणि अधिक काळ पाण्यामध्ये राहिल्यामुळे हाडे दुखणे देहाची योग्यप्रकारे स्वच्छता झाल्यामुळे अनेक शारीरिक
विकारांपासून रक्षण होणे
आ. मानसिक मायावी स्पंदनांमुळे देहाकडून सुखदायी हालचाली होणे त्यामुळे या पद्धतीने स्नान करायला आवडणे आणि देहबुद्धी वाढणे मनात सुख, ताण अन् माया यांच्या संमिश्र भावना निर्माण होणे आणि करमणुकीचे अन् मायेचे विचार येणे मनाला कार्यासाठी चालना मिळणे आणि मन सकारात्मक रहाणे
इ. आध्यात्मिक
१. त्रासदायक
शक्तीचे आक्रमण
झोपण्याच्या स्थितीमुळे देहाभोवती रज-तमात्मक शक्तीचे आवरण निर्माण होणे त्यामुळे देहशुद्धीचा मूळ उद्देश साध्य न होता त्रासदायक शक्तीच्या स्पंदनांनी देहात प्रवेश करणे उभे रहाण्याच्या स्थितीमुळे स्नान करतांना आकृष्ट होणारी शक्तीची स्पंदने पायातून बाहेर पडल्यामुळे देहामध्ये शक्तीची स्पंदने निर्माण न होता त्रासदायक शक्तीचे देहावर अल्प काळात आक्रमण होणे मांडी घालण्याच्या स्थितीमुळे देहात शक्तीची कार्यरत स्पंदने निर्माण होऊन ती सातत्याने कार्यरत रहाणे.
त्यामुळे देहाभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन देहावर त्रासदायक
शक्तीचे आक्रमण न होणे
२. पाण्यातून
त्रासदायक
स्पंदनांनी देहात
प्रवेश करणे /
न करणे
पाण्यात दीर्घकाळ झोपल्यामुळे
देहातून पाण्यात प्रक्षेपित झालेली
त्रासदायक स्पंदने काही वेळानंतर
पाण्यातून पुन्हा देहात प्रवेश करणे
तुषार पद्धतीने स्नान करतांना वहात्या पाण्यामुळे वातावरणातून पाण्यात त्रासदायक शक्तीची स्पंदने आकृष्ट होणे, त्यांनी देहात प्रवेश करणे आणि ही क्रिया सातत्याने कार्यरत रहाणे बालदीमध्ये पाणी घेऊन तेवढ्याच पाण्याने स्नान करत असल्याने त्यामध्ये शक्तीची स्पंदने कार्यरत होणे; म्हणून त्या पाण्याच्या माध्यमातून त्रासदायक शक्तींचे आक्रमण न होणे
३. देहावरील
त्रासदायक
शक्तीचे आवरण
आवरण न घटता त्यात वाढ होणे आवरण केवळ ०.८५ टक्क्यांनी
न्यून होणे
बसून स्नान करण्याच्या कृतीतून देहातील कुंडलिनी चक्रे अल्प कालावधीसाठी कार्यरत होणे आणि त्यामुळे देहावरील आवरण दूर होणे
७. परिणाम टिकून
रहाण्याचा कालावधी
२ घंटे १ घंटा ४ घंटे’

 

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (फाल्गुन कृ. २/३, कलियुग वर्ष ५११३ (१०.३.२०१२) )

२ उ. डोक्यावरून स्नान करावे

२ उ १. शास्त्र – डोक्यावरून स्नान केल्याने जिवाच्या देहावर आलेल्या आवरणाचे मूळ बिंदूतून विघटन होणे : ‘जिवाच्या देहावर आलेल्या आवरणाचा मूळ बिंदू जिवाचे सहस्त्रारचक्र किंवा ब्रह्मरंध्र असते. डोक्यावरून स्नान केल्याने जिवाच्या देहावर आलेल्या आवरणाचे मूळ बिंदूतून विघटन होते. त्यामुळे जिवावर आलेल्या आवरणाचे लवकर विघटन होते.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १९.६.२००७, दुपारी ३.५१)

२ उ २. अनुभूती – देवाने सुचवल्याप्रमाणे डोक्यावरून स्नान केल्याने कानांवर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दुर्गंधाच्या माध्यमातून निघून जाणे : ‘२०.१०.२००७ या दिवशी सकाळी उठल्यापासून माझ्या दोन्ही कानांना दडे बसल्याप्रमाणे झाले. कानांवर आवरण आल्यासारखे वाटले. नंतर डोक्यावरून स्नान करण्याचा विचार मनात आला. ‘तसे नको करूया’, असे वाटले; पण ‘देव सांगत आहे’; म्हणून मी तसे केल्यावर माझ्या केसांना पुष्कळ दुर्गंध येत होता. स्नान झाल्यावर लक्षात आले की, कानांवर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण निघून गेले आहे. तेव्हा देवाने उपाय सुचवल्यामुळे माझी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’

– एक साधिका, पनवेल.

२ उ ३. श्लोक म्हणत पितळी रजोगुणी तांब्याने पाणी डोक्यावर ओतणे
२ उ ३ अ. शास्त्र – ब्रह्मरंध्राला जागृती येऊन चैतन्याचे संपूर्ण देहात अल्प कालावधीत संक्रमण होण्यास साहाय्य होणे : ‘घंगाळ्यातून पितळी रजोगुणी तांब्याच्या साहाय्याने पाणी काढून मग ते विविध श्लोक म्हणत पाण्यात सात्त्विकतेचे संवर्धन करत डोक्यावर ओतावे. यामुळे ब्रह्मरंध्राला जागृती येऊन चैतन्याचे संपूर्ण देहात अल्प कालावधीत संक्रमण होण्यास साहाय्य होते.

२ उ ३ आ. तांबे आणि पितळ यांचे वैशिष्ट्य : पाणी साठवण्यासाठी सत्त्वगुणी तांबे हा धातू, तर पाणी काढण्यासाठी आणि क्रियेला वेग देण्यासाठी रजोगुणी पितळी तांब्या वापरला जातो, म्हणजेच हिंदु धर्मात प्रत्येक गोष्टीचा त्याच्या कार्यकारी तत्त्वरूपी गुणधर्माप्रमाणे त्या त्या ठिकाणी कसा वैशिष्ट्यपूर्णरीत्या चपखलपणे वापर करून घेतला आहे, हे लक्षात येते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

२ ऊ. पाटावर बसून स्नान करणे आणि पाटावर बसून नामजप
करत अथवा श्लोक म्हणत स्नान करणे यांमुळे होणारे सूक्ष्मातील लाभ

‘पुढील सारणीतील आकडे टक्क्यांमध्ये आहेत.

 

पाटावर बसून स्नान करणे

पाटावर बसून नामजप
करत अथवा श्लोक
म्हणत स्नान करणे

१. चैतन्य

 

२. शक्ती
३. त्रासदायक शक्ती दूर होणे
४. चांगली स्पंदने टिकून
राहण्याचा अधिकतम
कालावधी
४ घंटे ८ घंटे
५. जिवाला होणारे लाभ
अ. शारीरिक जिवाला मिळणार्‍या
चांगल्या शक्तीमुळे
त्याच्यावरील त्रासदायक
शक्तीचे आवरण दूर
होऊन त्याला दिवसभर
दैनंदिन कार्य करण्यासाठी
शक्ती प्राप्त होणे
सूक्ष्म-देहांवरील त्रासदायक
शक्तीचे आवरण दूर होऊन
जिवाला सात्त्विक स्पंदने
प्राप्त होणे आणि दिवसभर
दैनंदिन कृती करण्यास
चैतन्य मिळणे
आ. मानसिक नामस्मरणामुळे मनाची शुद्धी होणे, मन अंतर्मुख होऊन मनातील विचारांचे प्रमाण
अल्प होणे आणि ईश्वरी
विचार स्फुरणे
इ. आध्यात्मिक १. कुंडलिनी चक्रे चक्रे अल्प कालावधीसाठी कार्यरत होणे आणि जिवाला सगुण स्तरावर लाभ होणे चक्रे दीर्घ कालावधीसाठी
कार्यरत होणे, जिवावरील
त्रासदायक शक्तीचे आवरण
दूर होऊन त्याच्या चक्रांची
शुद्धी होणे आणि त्याला
सगुण-निर्गुण स्तरावर लाभ होणे

 

२ ऊ १. अन्य सूत्र : केवळ स्नान करणे, ही कृती नित्यकर्म केल्याप्रमाणे आहे; परंतु ते करतांना देवाला स्मरून आणि नामजप करत केल्यामुळे ते कर्म कुशल कर्म घडते. अशा प्रकारे आपल्या प्रत्येक दैनंदिन नित्यकर्मामध्ये देवाला स्मरणे, हा मनुष्यजन्माचा मूळ उद्देश असतो.’
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (फाल्गुन कृ. २/३, कलियुग वर्ष ५११३ (१०.३.२०१२))

२ ए. ९ द्वारे प्रतिदिन सकाळी स्नानाच्या वेळी स्वच्छ करणे

‘२ कान, २ डोळे, २ नाकपुड्या, १ तोंड, १ गुद आणि १ उपस्थ (जननेंद्रिय) अशी ९ द्वारे आहेत. प्रतिदिन सकाळी स्नानाच्या वेळी ती स्वच्छ करावीत.’ – दक्षस्मृती

२ ए १. शास्त्र – नऊ द्वारांतून बाहेर पडणार्‍या रज-तमात्मक लहरींचे पाण्यात विलीनीकरण होऊन सात्त्विक लहरी त्या त्या द्वारातून आत घेण्यास देह समर्थ बनणे : ‘नऊ स्थाने देहातून बाह्य वायूमंडलात ऊत्सर्जित होणार्‍या रज-तमात्मक लहरींच्या वेगवान वायूप्रक्षेपण क्रियेशी संबंधित असल्याने या स्थानांची किंवा द्वारांची पाण्याच्या साहाय्याने, म्हणजेच स्पर्शाने स्वच्छता केली असता, या द्वारांतून बाहेर पडणार्‍या रज-तमात्मक लहरींचे पाण्यात विलीनीकरण साधले जाते. यामुळे देह खर्‍या अर्थाने शुद्ध होतो आणि सात्त्विक लहरी त्या त्या द्वारातून आत घेण्यास समर्थ बनतो. म्हणून प्रतिदिन सकाळी स्नान करतांना भोवती असणार्‍या सात्त्विक वायूमंडलाच्या सामर्थ्यावर पाण्याच्या सर्वसमावेशक स्पर्शाने ती सर्व स्थाने शुद्ध, म्हणजेच स्वच्छ करावीत, असे म्हटले आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, रात्री ८.२८)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment