सायंकाळी पाळावयाचे आचार

अनुक्रमणिका

१. सायंकाळी घरात धूप दाखवावा

२. सायंकाळी देवाजवळ दिवा लावून दिव्याला नमस्कार करावा

३. देवाजवळ दिवा लावल्यानंतर श्लोक म्हणावेत.

४. श्लोक म्हणून झाल्यानंतर काय करावे ?

 


प्रस्तूत लेखात आपण सायंकाळी पाळावयाच्या विविध आचारांमागील दडलेले अध्यात्मशास्त्र पाहूया. यांत सायंकाळी देवाजवळ आणि तुळशीसमोर दिवा का लावावा; ‘शुभंकरोति’ का म्हणावे, त्याने लहान मुलांना काय लाभ होतात, या कृतींमागील शास्त्र जाणून घेऊया.

 

१. सायंकाळी घरात धूप दाखवावा

१ अ. शास्त्र

‘या आचारातून वास्तूसह कपड्यांचीही शुद्धी होण्यास साहाय्य होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी  ९.४६)

 

२. सायंकाळी देवाजवळ दिवा लावून दिव्याला नमस्कार करावा

सायंकाळी संध्या करावी आणि देवाजवळ दिवा लावावा. याच वेळी अंगणात तुळशीजवळही दिवा लावावा. देवाजवळ लावलेला दिवा २४ घंटे तेवत असायला हवा. सायंकाळी दिव्याच्या वातीवर आलेली काजळी काढावी. सध्या बहुतेक जणांच्या घरात २४ घंटे दिवा तेवत ठेवलेला नसतो. त्यामुळे त्यांनी सायंकाळ झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावावा.

 

२ अ. तिन्हीसांजेला घरात अन् तुळशीजवळ दिवा लावल्याने
घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होणे
आणि त्या वेळी वातावरणातील वाईट शक्तींचा त्रास होऊ नये; म्हणून घरी थांबणे

‘तिन्हीसांजेला, म्हणजेच दिवेलागणीच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वातावरणातील वाईट शक्तींच्या संचारामुळे प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक लहरींपासून रक्षण होते. म्हणून शक्यतो दिवेलागणीच्या वेळेपूर्वी घरी यावे किंवा दिवेलागणीनंतर घरातून बाहेर पडू नये. बर्‍याचदा वाईट शक्तींची त्रास हा तिन्हीसांजेच्या वेळी सर्वांत जास्त प्रमाणात होते. अघोरी विद्येचे उपासक तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणार्‍या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात. म्हणून तिन्हीसांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात, हत्या (खून) होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात. या काळाला ‘कातरवेळ’ म्हणजेच ‘त्रासदायक किंवा विनाशाची वेळ’, असे म्हणतात.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.२.२००५, दुपारी १.२८)

२ आ. सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर ‘क्लिक’ करा !

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (ज्येष्ठ शु. १२, कलियुग वर्ष ५११२ (२३.६.२०१०)

 

३. देवाजवळ दिवा लावल्यानंतर श्लोक म्हणावेत.

३ अ. श्लोक

१. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदाम् ।

शत्रुबुदि्धविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ।।

अर्थ : दीपज्योती, शुभ आणि कल्याण करते, त्याचप्रमाणे आरोग्य आणि धनसंपदा देते आणि शत्रूबुद्धीचा नाश करते; म्हणून हे दीपज्योती तुला नमस्कार असो.

 

२. दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।

दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ।।

अर्थ : दिव्याचा प्रकाश हा परब्रह्मरूप आहे. दीपज्योती जगाचे दुःख दूर करणारा परमेश्वर आहे. दीपक माझे पाप दूर करो. हे दीपज्योती, तुला नमस्कार असो.

३ आ. श्लोकपठणाचे लाभ

१. ‘शुभं करोति०…’ यांसारखे श्लोक म्हणून दिव्याच्या स्तुतीतून वाईट शक्तींना परतवण्याचे मारक कार्य साधले जाते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

२. ‘स्तोत्रपठणामुळे निर्माण होणार्‍या सात्त्विक स्पंदनांनी घराची शुद्धी होते.

३. दिवेलावणीनंतर केलेल्या स्तोत्रपठणामुळे मुलांचे पाठांतर चांगले होते, वाणी शुद्ध होते आणि उच्चार स्पष्ट होण्यास साहाय्य होते.’

३ आ १. तिन्हीसांजेच्या वेळी ‘शुभं करोति’ म्हटल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर ‘क्लिक’ करा !

 

३ ई. इतर सूत्रे

१. तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायूमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते.

२. वायूमंडलात कार्यरत असणार्‍या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय (भीती) निर्माण करतात.

३. तिन्हीसांजेच्या वेळी ‘शुभं करोति०’ म्हटल्यामुळे देहाभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते. तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने १२ घंटे सूक्ष्मातून कार्यरत रहातात.

४. मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते. तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास साहाय्य होते.’ – कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (श्रावण कृ. ६, कलियुग वर्ष ५११२ (३१.८.२०१०))

 

४. श्लोक म्हणून झाल्यानंतर काय करावे ?

श्लोक म्हणून झाल्यानंतर देवाची आरती आणि प्रार्थना करावी.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment