‘व्हॅक्यूम क्लीनर’ने (Vacuum Cleaner) आणि कमरेत वाकून केरसुणीने केर काढणे : एक तौलनिक अभ्यास

पाश्चात्त्य देशात निर्वात यंत्राने (Vacuum Cleaner) ने केर काढला जातो. हीच पद्धत आता भारतातील मध्यमवर्गीय घरांमध्येही रूढ होत आहे. असे असले तरी, कटीत (कमरेत) वाकून केरसुणीने केर का काढावा याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण करून दोन्ही कृतींतील तौलनिक अभ्यास प्रस्तूत लेखात करण्यात आला आहे.

१. केर गोळा करणार्‍या निर्वात यंत्राने (व्हॅक्यूम क्लीनरने) वातावरणात रज-तमाचे प्रदूषण वाढविणे

‘केर गोळा करणार्‍या निर्वात यंत्राने वातावरणाच्या आकर्षणशक्तीयुक्त तेज-वायूयुक्त वेगधारी ऊर्जेतून भूमीशी संलग्न असलेला कचरा संपूर्णतः ओढून किंवा शोषून घेतला जातो. वायूच्या या भूमीला घासून जाणार्‍या तेज-वायूयुक्त झोताने भूमीवरील कणन्कण कचरा यंत्ररूपी टोपलीत ओढून घेतला, तरी वातावरणाच्या या तेज-वायूरूपी घर्षणात्मक स्तरावर भूमीला होणार्‍या स्पर्शाने पाताळातील वाईट शक्तींची त्रासदायक शक्तीची स्थाने कार्यरत होऊन त्याच वेळी कारंज्याप्रमाणे वायूमंडलात त्रासदायक शक्तीचा फवारा उडवतात. म्हणजे बाह्य स्तरावर मनुष्याला ‘सर्व परिसर स्वच्छ झाला’, असे वाटते; परंतु तशी प्रक्रिया न होता संपूर्ण वायूमंडल त्रासदायक वेगधारी ऊर्जेने भारित होते. या त्रासदायक ऊर्जेचे भूमीपासून कार्यक्षेत्र जवळजवळ पाच ते सहा फूट इतक्या उंचीएवढे निर्माण झाल्याने साधारण पुरुषभर उंचीचे क्षेत्र त्रासदायक स्पंदनांनी भारित होते. त्यामुळे बाह्यतः या स्वच्छ परिसरात फिरणारा मनुष्य संपूर्णतः त्रासदायक शक्तीच्या स्पंदनांत रहातो आणि या त्रासदायक आवरणाखालीच तो दिवसभर आपले व्यवहार पूर्ण करतो. त्यामुळे तो ज्या ठिकाणी जाईल, त्या ठिकाणी असलेले वायूमंडल आणि त्याच्या संपर्कात येणारे मनुष्यदेहसुद्धा सूक्ष्म-स्तरावर दूषित बनवतो.

त्यामुळेच विदेशात प्रचलित असलेल्या स्वच्छता करण्याच्या यांत्रिक पद्धती या सूक्ष्म-स्तरावर वायूमंडलाला दूषित बनवण्यातच अग्रेसर बनल्याने तेथील वातावरण बाह्यतः सर्व सुखसोयींनी अद्ययावत आणि स्वच्छतेचा पुरस्कार करणारे वाटले, तरी सूक्ष्म-स्तरावर रज-तमात्मक प्रक्रियेची निर्मिती करण्याच्या स्तरावर अती मागासलेले आहे अन् त्यामुळे विदेशातील स्वच्छता करण्याच्या यांत्रिक पद्धती प्रत्येक जिवाला रज-तमात्मक स्पंदनांनी भारित करण्याचे कार्य करून नरकप्राप्ती करून देणार्‍या आहेत, हेच यातून सिद्ध होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१०.२००७, रात्री ८.३२ आणि २८.१०.२००७, रात्री ८.०८)

१ अ. आधुनिकतेकडे नव्हे, तर विनाशाकडे नेणारे विज्ञान !

विश्वाचा शोध घेणार्‍या ऋषीमुनींच्या केरसुणीने केर काढण्याच्या पद्धतीला ‘रानटी’ म्हणून हिणवणारे आणि केर गोळा करणार्‍या निर्वात यंत्राचा (व्हॅक्यूम क्लीनरचा) शोध लावून मानवजातीला विनाशाकडे नेणारे आजकालचे वैज्ञानिक हे पुढारलेले नाहीत, तर मागासलेले आहेत !

‘मानव जितका अध्यात्माला धरून राहील, तितका तो सुखी असेल’, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.’ – डॉ. आठवले (२८.१०.२००७)

२. कटीत (कमरेत) वाकून केरसुणीने केर काढल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर ‘क्लिक’ करा !

कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (२१.१२.२००९)

३. यंत्राच्या साहाय्याने केर काढणे आणि कटीत (कमरेत)
वाकून केरसुणीने केर काढणे यांमुळे होणारे सूक्ष्मातील परिणाम

 

यंत्राच्या साहाय्याने केर काढणे

कटीत (कमरेत) वाकून
केरसुणीने केर काढणे

१. चैतन्य

१.७५

२. शक्ती

३. त्रासदायक शक्ती दूर होणे

०.२५

४. वाईट शक्तीआकर्षित होणे

अ. त्रासदायक

आ. मायावी

५. कार्य आणि त्याचापरिणाम

आ. यंत्राच्या माध्यमातूननिर्माण होणार्‍या नादातूनस्थूल आणि सूक्ष्म या दोन्हीस्तरांवर वातावरणात त्रासदायक नादलहरींचेप्रक्षेपण होणे

केर काढतांना केरसुणीचे भूमीशी घर्षण झाल्यामुळेनिर्माण होणार्‍या नादामुळेभूमीलगतच्या त्रासदायक शक्तीच्या उच्चाटनासाठीआवश्यक तेवढा नाद निर्माणहोऊन त्यातून शक्तीलहरीप्रक्षेपित होणे

६.जिवावरहोणारेपरिणाम

अ. शारीरिक

आळशीपणा वाढणे आणित्यामुळे देहाला स्थूलपणायेणे

स्नायूंना लवचिकता प्राप्त होणे

आ. मानसिक

१. यंत्रातून प्रक्षेपितहोणार्‍या नादाचा मन आणिबद्धी यांवर विपरीत परिणाम होणे अन् तो नाद नकोसा वाटणे
२. मनात अनावश्यकआणि तमोगुणी विचार येण्यास आरंभ होणे

केर काढतांना होणार्‍या नादाचामन आणि बुद्धी यांवर परिणामन होणे

इ. आध्यात्मिक

त्रासदायक शक्ती प्रवाहितहोणे आणि ती व्यक्तीसरळ उभी असल्यानेतिची चक्रे जागृत न झाल्याने त्या त्रासदायकशक्तीला प्रतिकार न होणे

कटीत वाकल्यामुळे या मुद्रेमुळे देहातील मणिपुरचक्र कार्यरतहोऊन देहात चांगली शक्ती निर्माण होणे आणि केरातूनआक्रमण करणार्‍या त्रासदायकशक्तीपासून रक्षण होणे

७. वास्तूवर होणारापरिणाम

ही तमोगुणी पद्धत असूनयंत्र हे विद्युत ऊर्जेवरकार्यान्वित होतअसल्यामुळे यंत्राच्या माध्यमातून त्रासदायकआणि मायावी शक्तीच्यास्पंदनांचे प्रक्षेपण होणे

हिंदु धर्मामध्ये केर काढण्यासाठीवापरण्यात येणार्‍या केरसुणीचीपूजा करण्यात येत असल्यामुळेतिच्यामध्ये देवतातत्त्व आकृष्ट होणे आणि अशा केरसुणीच्यासाहाय्याने केर काढल्याने चांगल्याशक्तीची स्पंदने आकृष्ट होणे

८. परिणाम टिकूनरहाण्याचाकालावधी

२ घंटे

४ घंटे

 

४ अ. इतर सूत्रे

अ. केरसुणीने केर काढल्यामुळे जिवाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो आणि वास्तूशुद्धीही होते. यावरून लक्षात येते की, आपले पूर्वज आध्यात्मिकदृष्ट्या प्रत्येक गोष्ट किती अभ्यासपूर्ण करत होते. यातूनच हिंदु धर्माची महानता लक्षात येते.

आ. निर्जीव यंत्रापेक्षा सजीव मानवाच्या माध्यमातून देवतातत्त्व ग्रहण करणे आधिक शक्य असते; म्हणून केरसुणीने केर काढणे लाभदायक आहे.’ – कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (फाल्गुन कृ. ४, कलियुग वर्ष ५११३ (११.३.२०१२)

५. केराची विल्हेवाट कशी लावावी ?

१. ‘केर काढून झाल्यावर तो घराच्या बाहेर असलेल्या कचराकुंडीत टाकून त्याचे एकत्रितरीत्या अग्नीच्या साहाय्याने दहन करावे (जाळून टाकावा).

२. केर लगेच बाहेर टाकणे शक्य नसल्यास तो घराच्या कोपर्‍यात ठेवलेल्या कचरापेटीत टाकावा. कोपर्‍यामध्ये असलेल्या इच्छाशक्तीतत्त्वात्मक लहरींच्या घनीभूत धारणेत ती ती त्रासदायक स्पंदने अवगुंठित (एकत्रित) करण्याची क्षमता असल्याने केरातील त्रासदायक स्पंदने सर्वत्र पसरत नाहीत.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.१०.२००७, दुपारी ५.२०)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment