लोहचुंबकाप्रमाणे सर्वांना आकर्षित करवून घेऊन सनातन संस्थेचा मोठा व्याप सांभाळणारे प.पू. डॉक्टर ! – प.पू. रामानंद महाराज

आषाढ कृष्ण पक्ष त्रयोदशी, कलियुग वर्ष ५११२ (८.८.२०१०) या दिवशी प.पू. रामानंद महाराजांनी रामनाथी आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी प.पू. डॉक्टर आणि सनातन संस्था यांविषयी काढलेले उद्गार येथे देत आहे.

या लेखात प.पू. रामानंद महाराजांनी प.पू. डॉक्टरांचे कौतुक केले आहे. ‘तुमच्याकडे सर्व साधक सेवाभावाने सर्वकाही कसे करतात ?’, असे ते म्हणतात; पण प.पू. डॉक्टरांनी हे प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या कृपाशीर्वादानेच घडत असल्याचे म्हटले आहे. कृपाशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही. प.पू. भक्तराज महाराजांनी त्यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश यांची अहोरात्र सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतले. प.पू. रामानंद महाराजांमध्ये तर अखंडच शिष्यभाव होता. त्यांनी प.पू. भक्तराज महाराजांची अखंड सेवा केली. प.पू. भक्तराज महाराजांच्या देहत्यागानंतर त्यांनी आधीच घोषित केल्याप्रमाणे प.पू. रामानंद महाराज गुरुपदावर आरूढ झाले, तरीही त्यांच्यात शिष्यभावच होता. त्यामुळेच गुरुसेवेसाठी भक्त अल्प संख्येने उपस्थित असतांना इंदूर आणि मोरटक्का या दोन आश्रमांचा व्याप प.पू. रामानंद महाराज इतर सर्व कार्य करूनही स्वतःच आनंदाने सांभाळायचे. हीच त्यांची अजोड गुरुनिष्ठा आणि गुरुभक्ती !

प.पू. रामानंद महाराज : सर्वजण आपलं साधून करायला जातात. मला सगळे काय म्हणायचे, मी निवृत्त झालो ना की, मग तुमच्याकडे येईन; पण एक जणही आला नाही. निवृत्त झाल्यानंतर घरी जायचं आहे किंवा नातवाला शाळेत पोहोचवायचं आहे, कधी अमक्याची प्रकृती बरी नाही, ही सगळी कारणे असतात; पण असं कोणी म्हणत नाही, बाबा, मी जातो. नुसतं म्हणतात, आता निवृत्त झाल्यामुळे काही काम नाही. मी सेवा करतो. म्हणूनच म्हणतात, ‘जितना जिसके भागमें होता, उतनाही वो पाता ।’ सेवा करून घेणं किंवा सेवा करणं, हे आपल्या हातात नाही. परमेश्वराची इच्छा असेल, तरच ती होते. सेवा मी करतो, असं नाही. सेवा करून घेतात. कुणी असा ग्रह करून घेऊ नये की, आपण सेवा करतो. आता बाबांनी (प.पू. भक्तराज महाराजांनी) प.पू. डॉक्टरांकडून सेवा करवून घेतली. डॉक्टरांनी पुष्कळ सेवा केली आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. सगळं काही विसरून ते सेवा करत होते. त्यामागे काहीही स्वार्थ नव्हता. मला काही मिळेल, असेही नव्हते; पण त्यांना मिळाले. एवढा मोठा व्याप केलाय, हे काय छोटं आहे का !

मागे आमच्या आश्रमातील बाबूराव काही दिवस सुट्टीवर गेले होते. त्या वेळी आश्रमात कोण रहाणार, असे म्हटल्यावर सगळे म्हणाले, ‘आम्ही महिनाभर येऊन राहू. तुम्ही काही काळजी करू नका’. पण मी काळजी करतच राहिलो; कारण कुणीही आले नाही. केवळ चंदा आणि शुभांगी (दीक्षित) हे दोघेजणच महिनाभर येऊन राहिले. कोणीतरी सांभाळणारे पाहिजे ना ! मला ठाऊक नाही. तुमचा एवढा मोठा व्याप आहे आणि माझा छोटाच आहे, तरी कोणी येत नाही बघा. एवढा व्याप सांभाळायला तुम्हाला कसे काय लोक मिळतात काय माहीत ? एवढा व्याप चालवणं कठीण आहे ना !

प.पू. डॉक्टर : त्याचंच उत्तर द्या. बाबांचा आशीर्वाद तर आहेच; पण तुमच्या शब्दांत पाहिजे. तयार होऊन आपोआप कसे येतात ?

प.पू. रामानंद महाराज : आपलं आकर्षण आहे ना ! लोहचुंबक असतं ना ! ते लोहचुंबक तुमच्याकडे आहे. त्यामुळे लोकं तुमच्याकडे खेचली जातात. (प.पू. बाबांनीच ते लोहचुंबक दिले. प.पू. बाबांनंतर प.पू. रामानंद महाराजांनी त्या लोहचुंबकातील चैतन्य जागृत ठेवले. – (प.पू.) डॉ. आठवले)

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment